रियल इस्टेट हे क्षेत्र झपाट्याने वाढत असून प्रचंड प्रमाणात उलाढाल या क्षेत्रात होत असते. भारतातील जे काही महत्त्वाची शहरे आहेत या शहरांमध्ये जर आपण जमिनींचे भाव पाहिले तर ते डोके चक्रावणारे असे आहेत. रियल इस्टेट व्यवसायामध्ये अनेक डेव्हलपर्स आणि व्यावसायिक संस्था महत्त्वाच्या शहरांमध्ये जमिनी खरेदी करतात. या जमिनीचा वापर निवासी वापराकरता किंवा काही महत्त्वाच्या कामांकरिता केला जातो.
त्यामुळे काही कोटी रुपयांमध्ये जमिनीचे व्यवहार पार पडतात. नेमके यावर्षी कुठल्या शहरांमध्ये काय दराने जमिनीचे सौदे झाले यासंबंधीचा जर आपण ऍनारॉकचा रिसर्च पाहिला तर आपल्याला कळेल की नेमके कोणत्या शहरामध्ये किती किमतीमध्ये जमिनीचे सौदे झाले. यासंबंधीचेच महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
रियल इस्टेट क्षेत्राची 2023 मधील कामगिरी
2023 मध्ये जर आपण रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि काही व्यावसायिक संस्था यांचे जमिनीचे व्यवहार पाहिले तर ते विक्रमी किमतीत पार पडलेत. जर आपण ऍनारॉक रिसर्च चा विचार केला तर त्यानुसार यावर्षी कमीत कमी दोन जमिनीच्या करारांची किंमत एका एकरला 100 कोटी रुपये होती. तसेच जानेवारी ते ऑगस्ट हा कालावधी पाहिला तर संपूर्ण देशात 2018 एकर करीता 59 जमिनीचे स्वतंत्र्य व्यवहार पार पडले. याचे उदाहरणच घ्यायचे झाले तर हैदराबाद या शहरातील राजपुष्पा प्रॉपर्टीजने साडेतीन एकर जमीन तब्बल 362 कोटी रुपयांना खरेदी केली.
राजपुष्पा प्रॉपर्टीजने ही जमीन निवासी प्रकल्प उभारण्याकरिता खरेदी केलेली आहे. तसेच गुरुग्राम या ठिकाणी गोदरेज प्रॉपर्टीजने 7.91 एकर जमीन 900 कोटी रुपयांना खरेदी केली. तसेच मुंबईतील अजमेरा रिअल्टीने जवळपास दीड एकर जमीन 76 कोटी रुपयांना खरेदी केली. यावरून आपल्याला जमिनीच्या भावाच्या अंदाज बांधता येतात. तसेच अहमदाबाद शहराचा विचार केला तर या ठिकाणी 740 एकर करिता तीन सर्वात मोठे जमिनीचे करार पार पडले. तसेच लुधियाना आणि बेंगलोर मध्ये 300 पेक्षा अधिक एकर मध्ये प्रत्येकी एक सौदा पार पडला.
2023 मध्ये कसे राहिले जमीन खरेदीचे व्यवहार अथवा जमीन करार
जर आपण 2023 मधील जानेवारी ते ऑगस्ट हा कालावधी पाहिला तर यामध्ये 59 जमीन करारांपैकी अंदाजे टॉप सात शहरांमध्ये निवासी विकासाकरिता 283 एकर पेक्षा जास्त जमिनीकरिता 38 करार प्रस्तावित आहेत. चेन्नई तसेच अहमदाबाद आणि लुधियाना या ठिकाणी देखील टाऊनशिप प्रकल्पांकरिता 1166 पेक्षा अधिक एकर करिता पाच करार निश्चित करण्यात आले आहेत.
तसेच नोएडा, गुरुग्राम, पुणे आणि बेंगलोर या ठिकाणी 62 एकर पेक्षा जास्त जमिनीचे चार करार झाले आहेत. चेन्नई तसेच रायगड आणि गुरुग्राम यासारख्या शहरांमध्ये प्लॉटिंग करिता केलेल्या विकासासाठी 154 एकर पेक्षा जास्त जमिनीचे तीन स्वतंत्र करार पार पडले. बेंगलोर मध्ये उत्पादनाकरिता 300 एकर पेक्षा जास्त एक मोठा करार पार पडला.
2023 मधील काही महत्त्वाच्या शहरातील जमीन करार
जर आपण मोठ्या शहरांचा विचार केला तर हैदराबाद या ठिकाणी 18 एकर पेक्षा जास्त जमिनीकरिता दोन स्वतंत्र करार करण्यात आले. परंतु ते जानेवारी ते ऑगस्ट 2023 या कालावधी दरम्यान व्यवहार केलेल्या एकूण जमिनीपैकी फक्त एक टक्के इतकेच आहे. एनसीआर ने तेरा स्वतंत्र व्यवहार केले असून ते एकूण व्यवहार केलेल्या जमिनींपैकी चार टक्के आहेत.
यामध्ये गुरुग्राम येथे 61.6 एकर करिता नऊ सौद्यांचा समावेश आहे. नोएडा मध्ये 19 एकर पेक्षा जास्त आणि दिल्ली या ठिकाणी एक प्रस्तावित विकासामध्ये सौदा करण्यात आला आहे. हे सगळे व्यवहार प्रामुख्याने निवासी, किरकोळ तसेच व्यावसायिक आणि प्लॉटेड विकास यांच्यासाठी करण्यात आले आहेत. बेंगलोर ने देखील 400 एकर पेक्षा जास्त जमिनीकरिता आठ स्वतंत्र सौदे केले असून एकूण व्यवहार केलेल्या जमिनीपैकी हे प्रमाण 20% च आहे.
पुण्यामध्ये देखील पाच वेगळे करार झाले असून 44 एकर जमिनीचे संपूर्ण शहरांमध्ये व्यवहार केलेल्या एकूण व्यवहारांच्या फक्त दोन टक्के एवढाच भाग आहे. हे देखील निवासी आणि इतर वापराच्या विकासासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये जर विचार केला तर काही मोठ्या जमिनीच्या करारांची किंमत 100 कोटी रुपये प्रति एकर पेक्षा जास्त झाली आहे. यावरून आपल्याला अंदाज बांधता येतो की शहरांमध्ये जमिनीचे भाव काय आहेत?