Top-Up Loan: तुम्हाला माहिती आहे का टॉप-अप लोन म्हणजे नेमके काय असते? कसा करता येतो अर्ज? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
top up loan

Top-Up Loan:- आपण आपल्याला ज्या काही आर्थिक गरजा उद्भवतात त्या गरजा भागवण्याकरिता आपल्याकडे पैसे नसले तर आपण कर्जाचा आधार घेत असतो. याकरिता आपण बऱ्याचदा बँकांकडून किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतो. यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक म्हणजेच पर्सनल लोन जास्त करून घेतले जाते.

या व्यतिरिक्त जर आपल्याला स्वतःचे घर वगैरे घ्यायचे असेल तर आपण होम लोन घेत असतो. होम लोनच्या मदतीने कित्येक लोक आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करतात. परंतु आपल्याला माहिती आहे की जर आपण नवीन घर घेतले तर त्यामध्ये आपल्याला इतर इंटरियर डिझाईन किंवा फर्निचर सारख्या गोष्टीची गरज भासते. या गोष्टींची गरज पूर्ण करण्याकरिता आपल्याला पैशांची आवश्यकता भासते व अशा स्थितीमध्ये टॉप-अप कर्ज हे आपल्याला फायद्याचे ठरते.

 टॉप अप लोन म्हणजे काय?

जर आपण टॉप अप कर्जाचा विचार केला तर ही जास्तीची म्हणजेच अतिरिक्त कर्जाची रक्कम असते व तुम्ही जे काही बँकेकडून होम लोन घेतलेले असते त्या होम लोन वर हे टॉप अप लोन घेता येते.

यामध्ये प्रामुख्याने सर्व बँका आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून ग्राहकांना टॉप-अप कर्जाची सुविधा देण्यात येते. टॉप अप लोनचे स्वरूप एक पर्सनल लोन सारखेच असते व ते तुम्हाला कमीत कमी व्याजदरामध्ये मिळते. जर आपण याच्या परतफेडीचा कालावधी पाहिला तर तो गृह कर्ज म्हणजेच होम लोनवर अवलंबून असतो.

 टॉप अप लोनकरिता असलेले नियम आणि अटी

टॉप अप लोन देण्यापूर्वी बँक तुमचे कर्जाचे हप्ते कसे भरले आहे त्याचा रेकॉर्ड चेक करते. जर तुमचे होमलोनचे रेकॉर्ड चांगले असेल तर तुम्हाला अगदी सहजपणे टॉप अप लोन मिळते. यामध्ये बँकांचे वेगवेगळे नियम असू शकतात. साधारणपणे एकूण होम लोनच्या रकमेच्या टॉप-अप लोनची रक्कम आणि प्रॉपर्टीच्या मार्केट व्हॅल्यूच्या 70% पर्यंत असू शकते.

 यासाठी तुम्ही कसा करू शकता अर्ज? तुम्ही ज्या बँकेतून होमलोन घेतले असेल त्या बँकेला भेट देणे तुम्हाला गरजेचे आहे किंवा बँकेच्या वेबसाईटच्या माध्यमातून देखील तुम्ही टॉप अप लोन साठी अर्ज करू शकतात. तुमच्या होम लोन वर टॉप उपलब्ध असल्यामुळे लोन घेतल्यानंतर तुम्हाला होम लोनच्या हप्त्यांसोबत टॉप-अप लोनचे देखील मासिक हप्ते भरावे लागतात.

जर आपण या लोनचे फायदे पाहिले तर याकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची गॅरंटर किंवा सिक्युरिटीची गरज भासत नाही. कारण तुमचे आधीच बँकेत असलेले होम लोन वर हे टॉप अप लोन दिले जाते. हे कर्ज फर्निचर तसेच रिनोवेशन, बांधकाम किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी वापरता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe