Business Idea For Student: कॉलेजचे विद्यार्थी असाल तर तुमच्या हातातील स्मार्टफोनचा वापर करा व ‘हे’ व्यवसाय करा! महिन्याला कमवाल हजारो रुपये

Ajay Patil
Published:
business idea for student

Business Idea For Student:- पैसे कमवण्याची सवय ही अगदी शालेय वयापासून स्वतःला लावणे खूप गरजेचे आहे. कारण शालेय जीवनापासून जर पैसे कमावण्याची सवय लागली तर जीवनामध्ये पैशांची कमतरता कधीच भासणार नाही हे मात्र निश्चित. त्यामुळे आपल्याला अनेक शालेय विद्यार्थी किंवा कॉलेज जीवनातील विद्यार्थी सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय करताना दिसून येतात.

तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना काहीतरी व्यवसाय करावा अशी इच्छा देखील असते. परंतु नेमका कोणता व्यवसाय करावा याबाबत मात्र बरेच विद्यार्थी गोंधळात पडतात. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यासोबतच कॉलेजमध्ये असा एकही विद्यार्थी सापडणार नाही की त्याच्याकडे स्मार्टफोन नाही.

हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून कॉलेजचे विद्यार्थी याच स्मार्टफोनचा वापर करून काही व्यवसाय करू शकतात व त्या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकतात. त्यामुळे या लेखात आपणास स्मार्टफोनच्या माध्यमातून करता येतील अशा व्यवसायाबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.

 स्मार्टफोनचा वापर करा आणि हे व्यवसाय सुरू करा

1- सोशल मीडिया इनफ्लून्सर सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर वाढला असून जवळपास प्रत्येक व्यक्ती आता सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागलेला आहे. तुम्हाला जर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये सहजासहजी पोहोचायचे असेल तर सोशल मीडिया त्यासाठी खूप महत्त्वाचा असा  प्लॅटफॉर्म आहे.

या सोशल मीडियामध्ये आपण अनेक लोकांचे रिल्स आणि व्हिडिओज बघत असतो. या प्रमाणे असे व्यक्ती असे रिल्स किंवा व्हिडिओ चालवतात. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही देखील अशा पद्धतीचे रिल्स किंवा व्हिडिओज बनवू शकतात. यामध्ये तुम्हाला फक्त स्मार्टफोन मध्ये गुंतवणूक करावी लागेल.

याकरिता तुम्हाला फक्त फेसबुक, इंस्टाग्राम किंवा youtube सारख्या सोशल मीडिया माध्यमातून नियमितपणे चांगले कंटेंट प्रसारित करावे लागतील. यामध्ये जशी जशी तुमचे फॉलोवर्स वाढतील तसे तसे तुम्हाला पैसे मिळायला लागतील. या प्रकारामध्ये तुमचे वाढलेले फॉलोवर्स आणि मिळालेले व्ह्यूज हा तुमचा पैसा कमवण्याचा मार्ग ठरतो. तसेच तुमचे youtube चैनल असेल व त्यावर जर जाहिराती ऑन केल्या तर तुम्ही या माध्यमातून डॉलर मध्ये पैसे कमवू शकतात.

2- कॅनव्हा डिजाइनर बऱ्याच विद्यार्थ्यांना ग्राफिक डिझाईनिंग करायला आवडते. परंतु अगोदर याकरिता काही विशिष्ट सॉफ्टवेअर असण्याची गरज होती व अशा प्रकारची सॉफ्टवेअर किमतीला देखील खूप महाग असायची. परंतु आता कॅनवा ही एक अशी वेबसाईट आणि एप्लीकेशन आले आहे ज्या माध्यमातून तुम्ही अगदी सहज आणि बेसिक असलेल्या नॉलेज मधून आकर्षक डिझाईन बनवू शकता.

तुम्ही थोडेफार पैसे खर्च करून कॅनवाची प्रीमियम मेंबरशिप घेतली तर यामध्ये तुम्हाला अनेक टूल्स आणि टेम्प्लेट उपलब्ध होतात व या माध्यमातून तुम्ही सहजपणे डिझाईन करू शकतात. कॅनव्हाचा वापर करून तुम्ही बॅनर, सोशल मीडिया डिझाईन तसेच छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप्स, लोगो तसेच ब्रोशर, ई बुक्स अशा कितीतरी गोष्टी करू शकतात. या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक काम व प्रोजेक्टचे चांगले पैसे मिळतात.

3- सोशल मीडिया मॅनेजमेंट आजकाल अनेक छोटे छोटे बिजनेस, एनजीओ तसेच अनेक संस्था व कंपन्या सोशल मीडियावर स्वतःचा प्रेझेन्स वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. या सगळ्या प्रयत्नातून संबंधित संस्था किंवा कंपन्यांना त्यामध्ये वाढ करायचे असते.

परंतु अशा संस्था किंवा छोटे बिजनेस किंवा एनजीओ यांना सोशल मीडियावरील नवनवीन ट्रेन्स तसेच पर्याय समजून घेणे शक्य होत नाही. परंतु आजकालचे तरुण हे सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असतात व त्यामध्ये असलेले लेटेस्ट अनेक वैशिष्ट्ये त्यांना  माहिती असतात.

त्यामुळे असे तरुण स्वतःच्या पर्सनल सोशल मीडिया सोबत अशी बिझनेस अकाउंट सुद्धा हँडल करू शकतात व त्याचे मासिक पैसे समोरच्याकडून घेऊ शकतात. जर व्यवस्थित आणि सातत्य ठेवून हा व्यवसाय केला तरी विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम असा पार्टटाईम व्यवसाय आहे.

4- व्हिडिओ क्लासेस किंवा ट्युशन तुमच्याकडे जर एखाद्या विशिष्ट विषयाचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान असलेल्या विद्यार्थ्यांची शिकवणी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ ट्युशनच्या माध्यमातून घेऊ शकतात. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ कॉल द्वारे प्रशिक्षण देऊ शकतात.

ज्या भागामध्ये क्लासेस किंवा इतर पर्याय उपलब्ध नाहीत अशा शहरात किंवा ग्रामीण भागामध्ये तुम्ही हा पर्याय वापरून चांगला पैसा मिळवू शकतात. कारण अशा भागामध्ये तुम्हाला चांगले विद्यार्थी मिळू शकतात. या प्रकारामध्ये तुम्ही विषयानुरूप महिन्याची फी आकारू शकतात. यामध्ये तुम्ही झूम किंवा गुगल मीट सारख्या पर्यायांचा वापर करून ट्युशन घेऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe