Gold Rate: सोन्याचे दर पोहोचले गगनाला! का वाढत आहे सोन्याचे दर? कसा ठरवला जातो सोन्याचा भाव? वाचा एका क्लिकवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate:- सध्या सोने व चांदीच्या दराने प्रचंड प्रमाणात उसळी घेतली असून कधी नव्हे एवढे सोने व चांदीच्या दरात वाढ झाल्याचे सध्या स्थिती आहे.सोने जवळपास 70 हजारच्या पुढे असून चांदीने देखील अशीच काहीशा प्रमाणात उसळी घेतली आहे. सोन्याच्या चढ्यादराचा फायदा हा सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फायदाचा ठरताना दिसून येत आहे.

परंतु ज्या घरामध्ये लग्न आहे अशा मंडळीसाठी मात्र सोन्याचे वाढलेले दर हा डोकेदुखीचा विषय ठरत आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की नेमके सोन्याचे दर इतक्या मोठ्या प्रमाणावर कस काय वाढलेत? सोन्याचे दर नेमका कसा ठरवला जातो? तर यासंबंधीची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 सोन्याचा भाव कसा ठरत असतो?

जर आपण मार्केटमधील कुठल्याही वस्तूचा बाजार भाव पाहिला तर तो अर्थशास्त्राच्या मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांतावर अवलंबून असतो. म्हणजेच मागणीच्या मानाने पुरवठा कमी झाला तर वस्तूचे भाव वाढतात व याउलट मागणीच्या मानाने पुरवठा वाढला तर वस्तूच्या किमती कमी होतात.

अगदी हीच बाब सोन्याच्या बाबतीत देखील लागू होते. सोन्याचे होणारे उत्पादन आणि बाजारात असलेली मागणी याचा परिणाम या भाव वाढीवर दिसून येत आहे. सध्या उत्पादन कमी आणि मागणी वाढल्यामुळे भाव आपोआपच वाढत आहे. दुसरे कारण जर पाहिले तर आंतरराष्ट्रीय पातळीवर लंडन येथे दररोज सोन्याचा दर हा ठरत असतो.

याची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी ही लंडन बुलियन मार्केट असोसिएशनकडे असून ही संस्था इतर आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या संघटनांच्या मदतीने सोन्याचे दर ठरवते. जगातील प्रत्येक देशामध्ये सोन्याचे दर हे बदलत असतात व दिवसातून दोन वेळा सोन्याचे दर ठरवले जातात. जर लंडनच्या वेळेनुसार पाहिले तर सकाळी साडे दहा आणि दुपारी तीन वाजता सोन्याचे दर निश्चित केले जातात.

 भारतातील सोने महाग होण्यामागे डॉलर कारणीभूत

सध्या भारताचा विचार केला तर भारतामध्ये सोन्याच्या दराने उसळी घेतल्याचे आपल्याला दिसून येत आहे. लंडनमध्ये जे काही सोन्याचे दर ठरतात त्यानुसार जगात सोन्याचा दर निश्चित केला जातो. तसेच लंडनमध्ये ठरत असलेले सोन्याचे दर हे युरो, पाउंड आणि डॉलर मध्ये निश्चित होत असतात.

या अनुषंगाने जर आपण सध्या भारतीय रुपयाच्या तुलनेमध्ये अमेरिकन डॉलरची स्थिती पाहिली तर ती भक्कम आहे. म्हणजेच भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर महाग असल्यामुळे सोने देखील महाग झालेले आहे. म्हणजे सोप्या भाषेत समजायच्या राहिले तर भारतीय रुपयाचे जर अवमूल्यन झाले तर सोन्याचे दर वाढतात.

त्यामुळे गेल्या काही वर्षापासून भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलर भक्कम होत असताना दिसून येत आहे. डॉलरचे मूल्य हे भारतीय रुपयाच्या तुलनेत वाढत गेलेले आहे व याचा परिणाम सोन्याच्या दर वाढीवर झालेला आहे. या व्यतिरिक्त महागाई तसेच सोन्याचा साठा आणि त्याची मागणी इत्यादी गोष्टींचा देखील सोन्याच्या भावावर परिणाम होतो.

जर आपण सोन्याचे दर वाढीचा अंदाज पाहिला तर एक एप्रिल 2014 रोजी भारतात सोन्याचा भाव 29 हजार रुपये तोळा इतका होता. तर एक एप्रिल 2024 म्हणजेच बरोबर दहा वर्षांनी सोन्याचा भाव भारतात 69 हजार रुपये होता. डॉलरच्या दृष्टीने पाहिले तर दहा वर्षाच्या तुलनेत सोन्याचा भाव तब्बल ७४ टक्क्यांनी वाढला तर भारतीय चलनाच्या तुलनेत 140 टक्क्यांनी यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.