15 वर्षासाठी गुंतवणुकीकरिता सुकन्या समृद्धी योजना चांगली राहील की सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना? कुठे मिळेल जास्त व्याज?

पोस्ट ऑफिसच्या जर आपण योजना बघितल्या तर यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ योजना आणि सुकन्या समृद्धी योजना या महत्त्वाच्या योजना असून या दोन्ही योजनांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण आपल्याला वाढताना दिसून येते.

Ajay Patil
Published:
post office scheme

SSY vs PPF:- गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर पोस्ट ऑफिसच्या योजनांना आता गेल्या काही वर्षांपासून गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे व या योजनांच्या माध्यमातून परतावा देखील चांगला मिळतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आता पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली जात आहे.

पोस्ट ऑफिसच्या जर आपण योजना बघितल्या तर यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ योजना आणि सुकन्या समृद्धी योजना या महत्त्वाच्या योजना असून या दोन्ही योजनांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण आपल्याला वाढताना दिसून येते.

या दृष्टिकोनातून पंधरा वर्षांसाठी जर गुंतवणूक करायची असेल तर सुकन्या समृद्धी योजनेतून जास्त व्याज मिळेल की सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेतून? हा देखील मोठा प्रश्न असून याबाबतची माहिती थोडक्यात आपण बघणार आहोत.

दोन्ही योजनांमध्ये किती मिळतो व्याजदर?
गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर दोन्ही योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर कुठल्याही प्रकारची जोखीम किंवा धोका नाही. या दोन्ही योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर ठराविक कालावधीत तुम्हाला निश्चित परतावा मिळतो.

इतकेच नाही तर या दोन्ही योजनांमध्ये जो काही व्याजदर मिळतो तो केंद्र सरकारच्या माध्यमातून ठरवला जातो. यामध्ये पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये वार्षिक 7.1% दराने व्याज मिळते.

तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये वार्षिक 8.2% दराने व्याज मिळते. व्याजदरानुसार बघितले तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पैसे गुंतवून अधिकचा नफा मिळवता येणे शक्य आहे.

दोन्ही योजनेमध्ये कोणाला करता येतो अर्ज?
दोन्ही योजनांच्या बाबतीत जर बघितले तर सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून जास्तीचा परतावा मिळवता येणे शक्य आहे. परंतु यामध्ये लक्षात ठेवावे की केवळ दहा वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीच सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज करू शकतात.

जेव्हा मुलगी 21 वर्षाची होते त्यानंतर ही योजना परिपक्व होते. त्या तुलनेत मात्र पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये कोणत्याही भारतीय नागरिकाला गुंतवणूक करता येते.

दोन्ही योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळतो?
दोन्ही योजनेमध्ये एक वर्षात एकूण दीड लाख रुपये गुंतवल्यास पंधरा वर्षामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 22 लाख 50 हजार रुपये इतकी होते. परंतु यामध्ये सुकन्या समृद्धी योजनेत 8.2% व्याजदर मिळतो व पंधरा वर्षानंतर तुम्हाला जमा झालेली रक्कम आणि व्याज मिळून एकूण 69 लाख 80 हजार 100 रुपये मिळतात. जवळपास यामध्ये 47 लाखांपेक्षा जास्त व्याज मिळते

त्या तुलनेत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ योजनेत तुम्ही पंधरा वर्षापर्यंत वार्षिक दीड लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला पंधरा वर्षानंतर एकूण 40 लाख 68 हजार दोनशे नऊ रुपये मिळतात व यावर तुम्हाला 18 लाख रुपये पेक्षा जास्त व्याज मिळते. दोन्ही योजनांमध्ये मिळणारे व्याजाचा विचार केला तर सुकन्या समृद्धी योजनेत जास्त व्याज मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe