पेट्रोल-डिझेलवर तोडगा निघणार? गडकरींनी दिले दिलासादायक आश्वासन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : दिवसोंदिवस पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel) दरात प्रचंड वाढ होत असून सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे. तसेच यामुळे आर्थिक व्यवस्था देखील कोलमडत आहे.

यावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले की ऑटोमोबाईल (Automobile) कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की ते सहा महिन्यांत फ्लेक्स इंधन वाहनांचे उत्पादन सुरू करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

‘ईटी ग्लोबल बिझनेस समिट’ला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (video conference) संबोधित करताना, गडकरी म्हणाले की, सरकार १०० टक्के स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांपासून सार्वजनिक वाहतूक चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे.

पेट्रोलमध्ये इथेनॉल २० टक्के मिसळले जाते, ज्यामुळे ते मिश्रित इंधन बनते आणि ते सामान्य पेट्रोलच्या तुलनेत अर्ध्या किमतीत उपलब्ध असल्याचे ते ,म्हणाले आहेत.

तसेच नितिन गडकरी म्हणाले, “या आठवड्यात, मी सर्व प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांच्या SIAM चे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यांनी मला आश्वासन दिले की ते एकापेक्षा जास्त इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी फ्लेक्स-इंधन इंजिन तयार करतील. गडकरी यांच्या मते, लवकरच भारतातील बहुतांश वाहने १०० टक्के इथेनॉलवर चालतील.