Women Business Idea: महिलांनो! घरी बसून लाखो रुपये कमवायचे असतील तर सुरू करा हा व्यवसाय, वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Women Business Idea :- बऱ्याचदा व्यवसाय म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येते ती त्याकरता लागणारी जागा तसेच टाकावी लागणारे भांडवल इत्यादी होय. परंतु असे अनेक व्यवसाय आहेत की ते आपल्याला अगदी घरात बसून चांगल्या प्रकारे आर्थिक नफा मिळवून देऊ शकतात. एवढेच नाही तर कमीत कमी भांडवल याकरिता लागत असते. त्यातल्या त्यात महिला वर्गाचा विचार केला तर अनेक महिला घर काम करणाऱ्या असतात व घरचे संपूर्ण काम आटोपल्यानंतर त्यांच्याकडे बराच असा मोकळा वेळ त्यांच्याकडे असतो.

या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून घेण्याकरिता महिला वर्ग घरातून अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू करू शकतात. त्यातील अनेक व्यवसाय गृह उद्योग या कॅटेगरीत येतात व कमीत कमी खर्चामध्ये चांगला नफा मिळवून देण्याची क्षमता देखील यामध्ये असते. त्यामुळे महिलांचा मोकळ्या वेळेचा चांगला उपयोग तर होतोच परंतु हातात पैसा देखील  यायला लागतो.

अगदी याच अनुषंगाने जर आपण विचार केला तर महिलांकरिता ब्युटी पार्लरचा व्यवसाय हा खूप फायदेशीर व्यवसाय असून तुम्ही अगदी घरात आणि कमी भांडवलात सुरू करू शकता असा हा व्यवसाय आहे. त्यामुळे ब्युटी पार्लर व्यवसाय विषयी महत्त्वाच्या टिप्स आपण या लेखात पाहणार आहोत.

 ब्युटी पार्लरचा व्यवसाय तुम्ही कसा सुरू करू शकता?

ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही उपयुक्त उपकरणांची तुम्हाला गरज भासते. कारण आता आधुनिक पद्धतीचे ब्युटी  पार्लरमध्ये अनेक कामांसाठी अनेक छोट्या-मोठ्या मशिनरीचा वापर केला जातो व याकरिता तुम्हाला थोडीफार गुंतवणूक करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला फेशियल चेअर, हेअर ड्रायर, ड्रेसिंग टेबल, स्किन अॅनलाईझर, हेअर क्लिपर, बॉडी मसाजर, शाम्पू व्हॅस युनिट, मिरर तसेच हेड स्टीमर इत्यादी साहित्य लागते.

तसेच महिलांसाठी आवश्यक असणारे फेस वॉश, हेअर डाय तसेच फेशियल आयब्रो थ्रेड इत्यादी ब्युटी पार्लरमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी असणे आवश्यक आहे. यासोबतच डाई डिवाइस, हेअर स्प्रे, हेअर शाम्पू, स्किन लोशन तसेच हेअर जेल, टॉवेल तसेच सर्जिकल ग्लोज इत्यादी साहित्य लागते.

 काही महत्वाची काळजी

तुम्ही ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करण्या अगोदर कच्चामाल खरेदी कराल तेव्हा तुम्ही चांगला दर्जाचा आणि चांगल्या कंपनीने बनवलेला ब्रॅण्डेड माल घेणे गरजेचे आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रँडेड कंपन्यांचे मशीन किंवा उत्पादने घ्याल तेव्हा तुमचे ब्युटी पार्लरचे सौंदर्य खुलून दिसेल.

तसेच तुमच्या दुकानाची सजावट खूप आकर्षक असणे गरजेचे आहे जेणेकरून ग्राहकांना तिथे चांगला अनुभव येईल व सेवा देखील तुम्ही चांगली देऊ शकतात. तुमचा स्वभाव मैत्रीपूर्ण आणि खूप नम्रता पूर्ण असणे गरजेचे आहे. त्यामुळे बरेच ग्राहक तुमच्या पार्लरमध्ये येतील.

 ब्युटी पार्लर टाकण्यासाठी जागेची निवड कुठे करावी?

ब्युटी पार्लर व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर चांगले आणि गर्दीच्या ठिकाणी असेल अशा ठिकाणी दुकान उघडणे गरजेचे आहे. ठिकाणी महिला ग्राहक जास्तीत जास्त प्रमाणात जातात येतात  अशी बाजारपेठेची जागा निवडून खूप गरजेचे आहे. तसेच एखादा मोठा मॉल किंवा शाळा, सदर बाजार इत्यादी जवळ तुम्ही जागा शोधून ब्युटी पार्लर सुरू करू शकतात.

 ब्युटी पार्लर व्यवसाय तुम्ही कोणत्या सेवा देऊ शकता?

ब्युटी पार्लर व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही आयब्रो, फेशियल, हेअर पफिंग, ब्लिचिंग तसेच वॅक्सिंग, मसाज, हेअर कटिंग, हेअर कलरिंग, स्ट्रेटनिंग, मेकअप, ब्रायडल मेकअप कधी सेवा देऊन उत्तम पद्धतीने हा व्यवसाय चालवू शकतात.

 ब्युटी पार्लर उघडण्यासाठी लागणारी गुंतवणूक आणि नफा

साधारणपणे ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला ४० हजार ते जास्तीत जास्त 70 हजार रुपये खर्च येऊ शकतो. परंतु तुम्ही अगदी सुरुवातीपासून देखील तीस ते चाळीस हजार रुपये महिना कमवू शकतात. कालांतराने ग्राहक जसेजसे वाढत जातील तसं तसं प्रत्येक महिन्याला मिळणारा नफा हा तुमचा वाढू शकतो. त्यामुळे कमीत कमी खर्चात आणि घरात बसून तुम्ही ब्युटी पार्लरचा व्यवसाय करून लाखो रुपये कमवू शकतात.