Investment Plan: मुलाच्या जन्मानंतर गुंतवणुकीची ही स्ट्रॅटेजी अवलंबा आणि अठराव्या वर्षापर्यंत मुलाला 50 लाखाचा मालक करा

Ajay Patil
Published:
investment

Investment Plan:- पैसे कमावण्याला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व आहे त्या पैशांची बचत आणि गुंतवणुकीला आहे. परंतु पैशांची गुंतवणूक करताना व्यवस्थित अशी स्ट्रॅटेजी ठेवून जर केली तर नक्कीच त्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर फायदा मिळतो. कारण आज केलेली गुंतवणूक हे उद्याच्या आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असल्यामुळे योग्य पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते.

तसेच महत्त्वाचे म्हणजे मुलांच्या दृष्टिकोनातून केलेली गुंतवणूक ही खूप महत्त्वाची असते. कारण आजकालच्या महागाईच्या कालावधीमध्ये मुलांचे लग्न तसेच शिक्षण इत्यादी गोष्टींकरिता खूप मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो. म्हणून मुलांच्या जन्मानंतर लगेच गुंतवणुकीला सुरुवात करणे खूप गरजेचे असते.

मुलाचा जन्म झाल्यानंतर एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर त्याचा फायदा खूप मोठा होतो. त्यामुळे या लेखामध्ये आपण गुंतवणुकीची एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी बघणार आहोत  जी तुमच्या मुलाच्या जन्मानंतर केलेल्या गुंतवणुकीतून त्याला अठरा वर्षात 50 लाखाचा मालक करू शकते.

 म्युच्युअल फंड एसआयपी हा गुंतवणुकीसाठी आहे चांगला पर्याय

म्युच्युअल फंड एसआयपी हा एक गुंतवणुकीसाठीचा उत्तम असा पर्याय असून यात केलेल्या गुंतवणुकीमुळे तुम्ही महागाईवर मात करू शकतात आणि भविष्यासाठी एक चांगला फंड तयार करू शकतात. जर तुम्ही तुमच्या मुलाच्या जन्मानंतर फक्त पाच हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि त्यात दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढ केली तरी तुम्ही अठरा वर्षात पन्नास लाख रुपयेपेक्षा जास्तचा निधी जमा करू शकता.

 पाच टक्क्यांचा टॉप ऑफ येतो फायद्यात

समजा तुम्ही पाच हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि तिला दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढवली तर तुम्हाला खूप मोठा फायदा या माध्यमातून मिळतो. कारण टॉप अप एसआयपी ही एक अशी सुविधा आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या नेहमीच्या रकमेत आणखी काही रक्कम जोडू शकतात.

उदाहरणच घ्यायचं झाले तर  तुम्ही पाच हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि त्यामध्ये वार्षिक 5% ने वाढ केली तर तुम्हाला सुरुवातीच्या वर्षाला बारा महिन्यांसाठी पाच हजार रुपये जमा करावे लागतील व पुढच्या वर्षी मात्र पाच हजार रुपयांच्या पाच टक्के वाढवावी लागेल व ती 250 रुपये इतकी होईल.

म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षी तुम्हाला एसआयपीमध्ये पाच हजार दोनशे पन्नास रुपये जमा करावे लागतील व त्याच्या पुढच्या वर्षी पाच हजार दोनशे पन्नास रुपयांचे पाच टक्के म्हणजेच 262.5 रुपये म्हणजे 263 रुपये तुम्हाला वाढ करावी लागेल व यामध्ये तुम्हाला पाच हजार पाचशे तेरा रुपयांची एसआयपी चालवावी लागेल. अशाप्रकारे तुम्हाला दरवर्षी एकूण रकमेवर पाच टक्के टॉप-अप करावे लागेल.

 50 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम कशी जमा होईल?

तुम्ही जर 18 वर्षांकरिता पाच हजार रुपयांची एसआयपी वार्षिक पाच टक्के टॉप अप चालवल्यास तुम्ही एकूण 18 वर्षात 16 लाख 87 हजार 943 रुपये गुंतवाल. एसआयपीवर सरासरी दीर्घकालीन परतावा 12% मानला जातो. या दराने तुम्हाला 34 लाख 57 हजार 451 रुपये फक्त व्याजापोटी मिळतील. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलाच्या 18 वर्षानंतर 51 लाख 45 हजार 394 रुपये जमा होतील. अशाप्रकारे तुम्ही त्याच्या वयाच्या 18 वर्षानंतर त्याला पन्नास लाखांचा मालक बनवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe