Business Idea:- नोकऱ्यांची उपलब्धता कमी असल्यामुळे स्वतःचा एखादा छोटा मोठ्या व्यवसायाला सुरुवात करणे ही काळाची गरज आहे. व्यवसाय करायचा म्हणजे तो अगदी मोठ्या प्रमाणावर किंवा मोठ्या स्वरूपात करावा असं काही नसते. फक्त व्यवसायाचे स्वरूप ठरवताना किंवा व्यवसायाची निवड करताना त्या व्यवसायाला असलेली मागणी आणि बाजारपेठ इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन जर व्यवसायाची उभारणी केली तर नक्कीच या माध्यमातून चांगला पैसा मिळू शकतो.
जर आपण व्यवस्थित अभ्यास करून व्यवसाय निवडला तर नक्कीच छोट्याशा गुंतवणुकीत चांगला पैसा मिळवून देणारा व्यवसाय आपण उभारू शकतो. त्या अनुषंगाने या लेखामध्ये आपण अशाच एका व्यवसायाची माहिती घेणार आहोत जो फक्त एकदाच गुंतवणूक करून तुम्हाला आयुष्यभर चांगला पैसा देऊ शकतो. हा व्यवसाय म्हणजे तुम्ही भारतीय रेल्वे सोबत करू शकतात.
भारतीय रेल्वेसोबत करा हा व्यवसाय
भारतीय रेल्वे ही वाहतुकीच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाची असून दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. साहजिकच रेल्वेने प्रवास करताना आपल्याला तिकीट घ्यावे लागते व या तिकीटाशी संबंधित हा व्यवसाय असून तुम्ही देखील आयआरसीटीसीच्या माध्यमातून तिकिटांची खरेदी करू शकता आणि या तिकिटाची विक्री करून चांगले कमिशन मिळू शकतात.
म्हणजेच तुम्ही आयआरसीटीसीच्या माध्यमातून तिकीट देण्यासाठी तिकीट एजंट बनू शकतात. याकरिता तुम्हाला आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिकीट एजंट करिता अर्ज करावा लागतो. यामध्ये तुम्ही तिकीट एजंट बनून प्रवाशांकरिता तिकीट बुक करून चांगली कमाई करू शकतात.
या व्यवसायातील गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर तुमच्याकडे फक्त लॅपटॉप किंवा कम्प्युटर असणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या आसपासच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ तिकीट एजंट म्हणून व्यवसायाला सुरुवात करू शकतात.
महिन्याला कमवू शकतात मोठी रक्कम
तुम्ही आयआरसीटीसी तिकीट एजंट झाल्यानंतर तुम्हाला बऱ्याच प्रकारचे फायदे मिळतात. त्यामध्ये तुम्ही कमीत कमी महिन्याला 50 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकतात. या व्यवसायामध्ये तुम्ही जी काही तिकीट बुकिंग कराल त्यावर कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही.
या व्यवसायामध्ये तुम्हाला प्रत्येक तिकिटावर वेगवेगळे कमिशन मिळते व ते कमिशन 20 टक्क्यांपर्यंत असते. जर तुम्ही एसी क्लासचे तिकीट बुक केले तर प्रत्येक बुकिंग वर 40% पर्यंत कमिशन मिळते. अशाप्रकारे हा व्यवसाय तुम्ही अगदी घरी बसून देखील करू शकता व चांगला पैसा कमवू शकतात. विशेष म्हणजे गुंतवणूक कमी आणि बसून काम करता येते.