‘या’ सरकारी योजनेमध्ये पैसे गुंतवा आणि मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सोडा! वाचा योजनेची ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
ppf scheme

भविष्यातील कुठल्याही प्रकारच्या आर्थिक गरजेसाठी तुम्हाला आजपासून गुंतवणूक करायला सुरुवात करणे खूप गरजेचे असते. तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय मधून जो काही पैसा कमावता त्या पैशांची बचत करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते.

यामध्ये मुलांचे शिक्षण तसेच लग्नकार्य, अचानकपणे उद्भवणारा वैद्यकीय खर्च इत्यादी करिता गुंतवणुकीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे बरेच व्यक्ती हे मुलांचे उच्च शिक्षण व लग्नकार्य इत्यादी करिता आत्तापासून गुंतवणुकीला सुरुवात करतात व भविष्यकालीन दृष्टिकोनातून चांगला पैसा उभा राहील हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.

गुंतवणुकीचे जे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी चांगला परतावा आणि गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून योग्य पर्यायाची निवड केली जाते. अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील थोडे थोडे पैसे गुंतवून मुलांसाठी मोठा फंड तयार करायचा असेल तर सरकारी योजना तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते.

ही सरकारी योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना ही होय. याच योजनेला पीपीएफ असे देखील म्हटले जाते. जर आपण पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी 2019 च्या पॅरा तीन नुसार पाहिले तर कोणतेही पालक किंवा कायदेशीर पालक अल्पवयीन मुलाच्या नावाने या योजनेत खाते उघडू शकतात व यामध्ये एकल किंवा दोन्ही पालक अल्पवयीन मुलांच्या खात्यात योगदान देऊ शकतात.

 मुलांच्या नावाने उघडता येते पीपीएफ खाते

तुम्हाला देखील तुमच्या अल्पवयीन मुलांच्या नावाने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ खाते उघडू शकतात. या खात्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे पंधरा वर्षाचा लॉकिन कालावधी हा होय.

यामध्ये मूल जेव्हा अठरा वर्षाचे झाले की खाते बंद करायचे की पुढे वाढवायचे हे मुलाला ठरवता येते. गुंतवणुकी करिता पीपीएफ हा एक चांगला पर्याय असून तुम्ही यामध्ये की लवकरात लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका जास्त फायदा तुम्हाला मिळू शकतो.

 पीपीएफ योजनेत किती मिळतो व्याजदर?

या योजनेत एका कुटुंबाचे अनेक पीपीएफ खाते देखील असू शकतात. प्रत्येक सदस्य त्याच्या नावाने एक पीपीएफ खाते उघडू शकते. तुम्ही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेचे खाते उघडू शकतात.

या योजनेमध्ये जास्तीत जास्त एका आर्थिक वर्षात दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते व चक्रवाढ व्याजाखाली व्याजाचे पैसे मिळतात. सध्या या योजनेत 7.1% ते 8.8% च्या दरम्यान व्याजदर मिळत असून वार्षिक व्याजदर हा 7.1% आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe