Investment:- सध्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा कल दिसून येतो व आता दिवसेंदिवस शेअर बाजारातील गुंतवणुक करण्याकडे ट्रेंड वाढताना दिसून येत आहे. आपल्याला माहित आहे की शेअर बाजारामध्ये अनेक नवनव्या कंपन्यांचे आयपीओ देखील दाखल होत असतात व अशा आयपीओ मध्ये देखील गुंतवणूक केली जाते.
अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील गुंतवणूक सुरू करायची असेल व ती देखील कमी पैशांमध्ये तर तुम्ही ते आता करू शकणार आहेत. कारण मोतीलाल ओसवाल असेट मॅनेजमेंट कंपनीने ‘ मोतीलाल ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड’ सुरू केला असून गुंतवणूकदारांना आजपासून म्हणजेच 13 जून ते 24 जून या कालावधीमध्ये या न्यू फंड ऑफर म्हणजेच एनएफओमध्ये अर्ज करता येणार आहे. या माध्यमातून तुम्ही रुपये पाचशे पासून संरक्षण संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकणार आहात.
संरक्षण संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार करू शकतील किमान 500 रुपयांची गुंतवणूक
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोतीलाल ओसवाल एसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून मोतीलाल ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड सुरू करण्यात आला असून या फंडामध्ये आज म्हणजेच 13 जून ते 24 जून पर्यंत या एनएफओ म्हणजेच न्यू फंड ऑफरमध्ये अर्ज करता येणार आहे.
हा फंड ओपन इंडेड ईटीएफ असून स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाल्यानंतर कधीही खरेदी आणि विक्री केला जाऊ शकतो. या फंडाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सूचीबद्ध असणाऱ्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा चांगला पर्याय देणारा हा पहिला इंडेक्स म्युच्युअल फंड आहे.
या फंडाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदारांना या संरक्षण निर्देशांक निधीमध्ये किमान 500 रुपये आणि त्यानंतर रुपये एकच्या पटीत कोणतीही रक्कम गुंतवता येणार आहे.
या निधीमधील पैसे संरक्षण संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवले जातील
जे गुंतवणूकदार मोतीवाला ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करतील असे गुंतवणूकदार त्यांचे पैसे सरळ संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवतील. निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स मध्ये जवळपास पंधरा कंपन्यांचा समावेश करण्यात आला असून ज्या निफ्टी टोटल मार्केटचा एक भाग आहे.
जर आपण निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्सची कामगिरी पाहिली तर 21 मे 2024 च्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच या एका वर्षात 177 टक्के आणि तीन वर्षात 89.5% CAGR परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.
एनएफओ कशाला म्हटले जाते?
जेव्हा कोणताही म्युच्युअल फंड लिस्टेड केला जातो तेव्हा त्याला न्यू फंड ऑफर म्हणजेच एनएफओ म्हटले जाते. आज जे काही सगळे म्युच्युअल फंड आहेत ते एनएफओच्या माध्यमातून लिस्टेड आहेत.