Vegetable Processing: मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले आहेत का? मग भाजीपाला न विकता फक्त करा ‘हे’ काम आणि मिळवा दुप्पट नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vegetable Processing:- शेतीच्या बाबतीत किंवा पिकाच्या उत्पादनाच्या बाबतीत जर पाहिले तर पिकांपासून भरघोस उत्पादन मिळवणे हे शेतकऱ्यांच्या हातात आहे. परंतु त्या पिकवलेल्या उत्पादनाला बाजारपेठेमध्ये चांगला दर मिळणे ही गोष्ट मात्र शेतकऱ्यांच्या हातात नसल्यानेच आज शेतकरी जे काही आर्थिक बिकट परिस्थितीमध्ये अडकलेले दिसतात ते यामुळेच.

रात्रंदिवस राबराब राबून रक्ताचे पाणी करून शेतकरी शेतीमधून उत्पादन मिळवतात.परंतु बाजारपेठेत गेल्यावर मात्र कवडीमोल दर मिळतो व हातात दमडी देखील मिळत नाही अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची झालेली दिसून येते.

त्यामुळे शेतकरी बंधूंनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळणे ही काळाची गरज आहे. कृषी प्रक्रिया उद्योगा व्यतिरिक्त तुम्ही काही सोप्या प्रक्रिया देखील शेतीमालावर किंवा भाजीपालावर घरच्याघरी केल्या तरी देखील घसरलेल्या दरात भाजीपाला पिके विकण्यापेक्षा 

अशा पद्धतीने सोप्या प्रक्रिया करून जर तुम्ही भाजीपाला बाजारपेठेत विकला तर नक्कीच त्या माध्यमातून दुप्पट नफा मिळवता येणे शक्य आहे.

 भाजीपाला संबंधित ही सोपी प्रक्रिया केल्याने मिळू शकतो दुप्पट नफा

 आपल्याला माहित आहे की सध्या मेथीची भाजी चा विचार केला तर वाळवलेली मेथीची भाजी बाजारामध्ये विकली जात आहे. साधारणपणे 100 ग्रॅम वजनाचे वळवलेले मेथीच्या भाजीचे पाकीट 15 ते 20 रुपयांना विकले जाते व यालाच चांगली अशी आकर्षक पॅकिंग केलेली आहे व त्यावर कसुरी मेथी असे नाव प्रिंट करून त्याची विक्री केली जात आहे.

बरीच रेस्टॉरंट तसेच काही ढाब्यांवर देखील ही कसुरी मेथीचा वापर पराठ्यांमध्ये घालण्यासाठी केला जातो. म्हणजेच अशा वाळवलेल्या पाल्याची भाजी केली तर ती ताजी भाजी सारखीच होते व विशेष म्हणजे अशा भाजीच्या चवीत देखील कुठल्याही प्रकारचा फरक दिसून येत नाही.

कारण यामध्ये  भाजीपाल्याच्या मध्ये जो काही पाण्याचा अंश असतो तो काढून टाकलेला असतो. कारण जर पाणी जास्त प्रमाणात राहिले तर भाजीपाल्याचा जो काही पाला असतो तो खराब होण्याची किंवा कुजण्याची शक्यता असते.

परंतु काही आवश्यक प्रक्रिया करून जर त्यातले पाणी काढून टाकले तर हा पाला कोरडा होतो व बरेच दिवस त्याचे साठवणूक किंवा तो टिकवता येऊ शकतो. या दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्या शेतामध्ये जो काही आपण पालेभाज्या पिकवतो त्यापैकी कोण कोणत्या पालेभाज्या तुम्ही त्याला वाळवून वापरता येते यावर शेतातच प्रयोग करणे गरजेचे आहे.

अशा पद्धतीने या पालेभाज्या वाळवून नंतर योग्य वेळेला वापरण्याची सवय लोकांना लागणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही पालेभाज्याच नव्हे तर फळभाज्या देखील वाळवून विक्री करू शकतात. या पद्धतीने फळभाज्या वाळवण्याकरिता शेतकऱ्यांनी अनेक सोलर ड्रायर जुगाड करून बनवलेले आहेत.

तसेच आपल्याला माहित आहे की अनेक शेतकरी महिला या पारंपारिक पद्धतीने हरभऱ्याची भाजी देखील वाळवतात व बरेच दिवसापर्यंत घरात भाजी म्हणून त्याचा वापर केला जातो. परंतु जर याला तुम्हाला व्यावसायिक स्वरूप द्यायचे असेल

आणि एकाच वेळी जास्त प्रमाणामध्ये भाजीपाला वाळवायचा असेल तर बाजारामध्ये अनेक प्रकारचे आणि स्वस्तात मिळतील असे सोलर ड्रायर उपलब्ध आहेत. याचा वापर करून तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून भाजीपाला सुकवून त्याची विक्री करू शकतात.

अशा प्रकारची भाजीपाल्यावरची प्रक्रिया महिला बचत गटांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. हे दिसायला तेवढे सोपे वाटते परंतु तर व्यावसायिक दृष्टिकोनातून भाजीपाला वाळवून जर विक्री केली तर याला एक मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक स्वरूप येऊ शकते व दुपटीचा नफा मिळू शकतो.