Canara Bank Personal Loan: कॅनरा बँक देईल 25 हजार ते 10 लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन! वाचा ऑनलाइन अर्ज प्रक्रिया,पात्रता

Ajay Patil
Published:
canara bank personal loan

Canara Bank Personal Loan:- जीवनामध्ये अचानकपणे काही कारणास्तव पैशांची गरज भासली तर लागणारा आवश्यक पैसा उभा करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून पर्सनल लोन घेतले जाते. पर्सनल लोन हे विविध बँकांच्या माध्यमातून दिले जाते व प्रत्येक बँकांचे व्याजदर आणि पात्रतेचे नियम इतर काही गोष्टी या वेगवेगळ्या असतात.

आता डिजिटायझेशनच्या या युगामध्ये बँकांकडून किंवा इतर नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून पर्सनल लोन घेणे अतिशय सोपे झाले असून तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने देखील यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता व तुम्ही बँकांचे नियम व अटी पूर्ण करत असाल तर मिनिटांमध्ये पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात.

याच पद्धतीने कॅनरा बँक देखील ग्राहकांना पाच मिनिटांमध्ये 25 हजारापासून ते दहा लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन देते व याकरिता तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या कर्ज प्रक्रियेचीच माहिती आपण या लेखात घेऊ.

 कॅनरा बँक देते पंचवीस हजार ते दहा लाखापर्यंत पर्सनल लोन

तुम्हाला देखील जर कॅनरा बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुमचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तुम्हाला जर कॅनरा बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर त्याकरिता दोन मार्ग आहेत व त्यातील एक म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात आणि दुसरा म्हणजे तुमच्या जवळच्या कॅनरा बँकेच्या शाखेत जाऊन ऑफलाइन  पद्धतीने अर्ज करू शकतात.

 कॅनरा बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आवश्यक पात्रता

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराचे किमान वय हे 21 व कमाल 60 वर्ष असणे गरजेचे आहे.

2- अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे मासिक उत्पन्न किमान 25000 असणे आवश्यक आहे.

3- तसेच उमेदवार हा व्यापारी किंवा नोकरी करणारा असावा.

4- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पर्सनल लोन घेण्यासाठी अर्जदाराच्या सिबिल स्कोर 700 किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

 कॅनरा बँकेकडून पर्सनल लोन घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

कॅनरा बँकेकडून पर्सनल लोन घेण्याकरिता अर्जदाराचे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, पत्त्याचा पुरावा, मोबाईल नंबर, मागील सहा महिन्यांची सॅलरी स्लिप म्हणजेच पगाराची स्लिप, रेशन कार्ड आणि स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो

 पर्सनल लोनवर कॅनरा बँक किती व्याजदर आकारते?

कॅनरा बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर या कर्जावर बँकेकडून 8.80% ते 12.05% पर्यंत वार्षिक व्याजदर आकारला जातो. महत्त्वाचे म्हणजे यापेक्षा देखील कमी व्याजदरात तुम्हाला कर्ज मिळू शकते. तुम्हाला कोणत्या व्याजदराने कर्ज मिळेल हे एखाद्या वेळेस कर्जाच्या रकमेवर देखील अवलंबून असते.

 कॅनरा बँकेकडून पर्सनल लोन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल?

1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला कॅनरा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

2- त्यानंतर त्या ठिकाणी होम पेजवर क्लिक करावे लागेल.

3- तुम्हाला वैयक्तिक कर्जाच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

4- त्यानंतर एक फार्म तुमच्यासमोर ओपन होईल व त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती नमूद करावी लागेल.

5- तसेच तुम्हाला तुमची सर्व महत्त्वाची कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करावे लागतील व अर्ज सादर करावा लागेल.

6- अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला कॅनरा बँकेच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधण्यात येईल.

7-  तुम्हाला पर्सनल लोन विषयी संपूर्ण माहिती दिली जाईल.

8- बँकेकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.

9- पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला कर्ज मंजुरी मिळेल.

10- तर मंजूर झालेली कर्जाची रक्कम बँक खात्यात सहजपणे ट्रान्सफर केली जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe