व्यवसाय सुरू करणे ही आत्ता काळाची गरज असून वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावर मात करण्यासाठी व्यवसायाशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे केंद्र सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन मिळावे याकरिता अनेक योजना राबवत आहे
व या योजनांच्या माध्यमातून युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करून प्रोत्साहन देखील दिले जात आहे. त्यामुळे जर तुमचा देखील व्यवसाय सुरू करण्याचा प्लान असेल व तुमच्याकडे पैसा मात्र नसेल तर सरकारच्या काही योजना अशा आहेत की त्या माध्यमातून तुम्हाला ताबडतोब कर्ज मिळू शकते व तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकतात.
व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजना करतील मदत
1- स्टँड अप इंडिया योजना– ही योजना समाजातील महिला आणि एससी/ एसटी प्रवर्गातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरिता लॉन्च करण्यात आलेली योजना आहे व या अंतर्गत लाभार्थ्यांना दहा लाखापासून ते एक कोटी पर्यंतची कर्ज सुविधा मिळते हे कर्ज सात वर्षाच्या कालावधी करिता दिले जाते.
तसेच या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन जर व्यवसाय सुरू केला तर पहिले तीन वर्ष आयकरामधून देखील सूट मिळते व त्यानंतर या योजनेत घेतलेल्या कर्जावर बेस रेट्स तीन टक्के इतका व्याजदर आकारला जातो. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर स्टँडअप इंडियाच्या https://www.standupmitra.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण अर्ज करता येतो.
2- राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ योजना– या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्राला प्रोत्साहन देणे हे आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन प्रकारचे कर्ज दिले जाते व यातील पहिला प्रकार म्हणजे मार्केटिंग सहाय्य योजना हे असून या कर्जाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या उत्पादनाची जाहिरात करू शकतात
व तुमचे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या योजनेची खूप मदत होते. तसेच या योजनेच्या अंतर्गत मिळणारे दुसरा कर्जाचा प्रकार म्हणजे क्रेडिट सहाय्य कर्ज होय. या माध्यमातून तुम्ही कच्चामाल खरेदी करू शकता आणि तुमच्या उत्पादनात वाढ करू शकतात. या अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागेल.
3- क्रेडिट गॅरंटी फंड योजना– केंद्र सरकारच्या माध्यमातून क्रेडिट गॅरंटी फंड योजना सुरू करण्यात आलेली आहे व या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे स्टार्टअपला प्रोत्साहन आणि चालना देणे हा आहे. या योजनेच्या अंतर्गत स्टार्टअप कंपन्यांना कमाल पाच कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते व यावर तुम्हाला दोन टक्के रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून द्यावी लागते.
परंतु आता ही रक्कम 0.37% पर्यंत कमी करण्यात आली आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही https://www.cgtmse.in या पोर्टलला भेट देऊ शकतात. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या नवीन असलेल्या स्टार्टअप चा वार्षिक अहवाल सादर करावा लागतो. तसेच शिक्का व स्वाक्षरी असलेले हमीपत्र देखील सादर करावे लागते.
4- एमएसएमई कर्ज योजना– व्यवसाय करता वर्किंग कॅपिटलची गरज पूर्ण व्हावी याकरिता केंद्र सरकारने ही योजना सुरू केली असून या अंतर्गत कोणत्याही नवीन किंवा सुरू असलेल्या उद्योगाला एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळते. जर या अंतर्गत कर्ज मंजूर व्हायला आठ ते बारा दिवसाचा कालावधी लागतो.
एमएसएमई कर्ज तुम्हाला कोणत्याही बँकेत मिळू शकते. याकरिता तुम्हाला पॅन आणि आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे लागतात. तसेच एमएसएमई कर्जाकरिता अर्ज करणाऱ्या सर्व सह अर्जदारांना त्यांचा निवासी पत्त्याचा पुरावा देखील सादर करावा लागतो.