एकदा 7500 रुपये खर्च करून 25 वर्ष फुकट मिळवता येईल वीज! पण कसे व काय करावे लागेल त्यासाठी? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
solar panel

घरामध्ये आपण अनेक प्रकारच्या विद्युत उपकरणांचा वापर करतो व या उपकरणांना जी काही वीज वापरली जाते त्याची बिल साहजिकच आपल्याला प्रत्येक महिन्याला भरणे गरजेचे असते. परंतु सध्या विजेचे दर वाढल्यामुळे आपल्यावर दर महिन्याला मोठ्या प्रमाणावर वीज बिलाचा आर्थिक बोजा पडतो व आपले बजेटच एखाद्या वेळेस विस्कटते.

त्यामुळे या समस्यावर उपाय म्हणून आता सोलर पॅनल घराच्या छतावर बसवणे व त्या माध्यमातून तयार विजेचा वापर करून वाढीव विज बिलाच्या समस्येपासून कायमची सुटका करून घेणे हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या क्षमतेची सोलर पॅनल उपलब्ध आहेत व त्यांचा खर्च देखील वेगवेगळा आहे.

परंतु यामध्ये तुम्हाला काळजी करण्याची गरज नसून सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून तुम्ही सोलर पॅनल बसवण्यावर अनुदान मिळवून कमीत कमी खर्चामध्ये देखील सोलर पॅनल बसवू शकतात व मोफत वीज मिळवू शकतात.

 पीएम सूर्यघर मोफत वीज योजना करेल तुम्हाला मदत

आपल्याला माहित आहे की,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांअगोदर पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेची घोषणा केलेली होती व या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देणे व लोकांना स्वस्त दरामध्ये ही ऊर्जा उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश ठेवण्यात आलेला आहे.

एवढेच नाही तर या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार जवळपास एक कोटी घरांवर सोलर रूफटॉप बसवणार आहे व याकरिता 60% पेक्षा जास्त सबसिडी देण्यात येत आहे. तुम्ही या योजनेचा फायदा घेऊन घराच्या छतावर सोलर पॅनल बसून पंचवीस वर्षे मोफत वीज मिळू शकतात.

 7500 मध्ये तुम्हाला 25 वर्ष मोफत वीज कशी मिळेल?

या योजनेच्या माध्यमातून तुम्ही जर तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवले तर जेव्हा दिवसा सूर्यप्रकाश असतो तेव्हा तुमच्या घरी या पॅनलच्या मदतीने वीज तयार करू शकाल व त्याचा वापर करू शकाल. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही जर तुमच्या घराच्या छतावर 1 kW चा सोलर पॅनल बसवला तर तुम्हाला तो साधारणपणे पन्नास हजार रुपयांमध्ये मिळतो.

केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून या पॅनलवर सरकारकडून तुम्हाला 60% पर्यंत अनुदान मिळू शकते व  या पॅनलच्या पन्नास हजार रुपये किमती पैकी तुम्हाला तब्बल 30 हजार रुपयांचे अनुदान मिळेल. म्हणजेच तुम्हाला वीस हजार रुपये खर्च करून 1 kW चा सोलर पॅनल बसवता येईल.

तसेच यामध्ये तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून देखील 25% वेगळे अनुदान मिळते. अशा पद्धतीने तुम्ही वीस हजार मधून देखील साडेबारा हजार रुपये तुमचे कमी होतील व फक्त साडेसात हजार रुपयांमध्ये तुम्ही सोलर पॅनल बसवू शकतात व पंचवीस वर्षे मोफत वीज मिळवू शकतात.

कारण कुठलेही सौर पॅनल पूर्ण क्षमतेने 25 ते 30 वर्ष टिकते व टाटा व अदानी सारख्या ज्या काही कंपन्या आहेत त्या त्यांच्या सोलर पॅनलवर पंचवीस वर्षांची वारंटी देखील देतात. या 1 kW च्या सौर पॅनलच्या मदतीने तुम्ही घरातील दोन कुलर तसेच दोन पंखे, एक फ्रिज, एक वाशिंग मशीन, टीव्ही तसेच दोन किंवा तीन एलईडी बल्ब अगदी सहजपणे चालवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe