बँक खात्यात एक रुपया देखील नाही तरी नका घेऊ टेन्शन! गुगल पे चे ‘हे’ फीचर वापरा आणि खात्यात पैसे नसताना देखील पेमेंट करा,कस ते वाचा?

Ajay Patil
Published:
google pay features

तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशनचे युग असल्यामुळे इंटरनेटच्या मदतीने अनेक कामे आता चुटकीसरशी तुम्ही घरी बसल्या करू शकतात. अशा प्रकारचे तंत्रज्ञान आता प्रत्यक्ष क्षेत्रात वापरले जात असल्यामुळे अनेक अवघड कामे आता सोपे झालेले आपल्याला दिसून येतात.

याचप्रमाणे जर आपण यूपीआयचा वापर पाहिला तर गेल्या एक ते दोन वर्षापासून यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून सध्या बहुसंख्य लोक आता खिशात रोख पैसे न ठेवता छोटे-मोठे पेमेंट हे गुगल पे तसेच फोन पे सारख्या यूपीआय प्लॅटफॉर्मच्या मदतीने करतात.

या पद्धतीने एखाद्याला पैसे ट्रान्सफर करू शकतात किंवा कोणाकडून पैसे तुमच्या खात्यात मागवू शकतात व यासोबतच कर्जाचे हप्ते तसेच विजेचे बिल किंवा मोबाईल रिचार्ज यासारख्या अनेक सुविधांचा लाभ तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घेऊ शकता. या यूपीआय प्लॅटफॉर्ममध्ये गुगल पे हे एक महत्त्वाचे असून बरेच व्यक्ती यूपीआय पेमेंट करिता गुगल पे चा वापर करतात.

याच महत्त्वाच्या असलेल्या गुगल पे ने आता एक फिचर आणले असून यामुळे आता वापरकर्त्यांना पेमेंट करणे खूप सोपे होणार आहे. गुगल पे ने बाय नाऊ पे लेटर नावाचे फिचर आणले असून ते वापरकर्त्यांसाठी खूप फायद्याचे ठरणार आहे.

 बँक अकाउंटमध्ये पैसे नसताना देखील करता येईल पेमेंट

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रसिद्ध असलेले यूपीआय प्लॅटफॉर्म गुगल पे च्या माध्यमातून बाय नाऊ पे लेटर नावाचे फिचर आणले असून त्याच्या मदतीने आता वापरकर्त्यांना त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जर पैसे नसतील तरी देखील दुकानदाराला काही वस्तू खरेदी केल्यानंतर पेमेंट करता येणार आहे.

कारण बऱ्याचदा खात्यामध्ये पैसे नसताना पेमेंट करायला समस्या निर्माण होतात व अशावेळी खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते. अशा समस्येच्या कालावधीमध्ये हे फीचर्सचा वापर  खूप फायद्याचा ठरणार आहे. या फिचरचा वापर करून तुम्ही जेव्हा पेमेंट करणार तेव्हा तुमच्या खात्यातून पैसे कट होणार नाहीत.

परंतु याकरिता तुम्हाला इन्स्टॉलमेंटचा पर्याय वापरता येणार आहे. म्हणजे तुम्ही सुलभ हप्त्यांमध्ये या फीचरचा वापर करून वापरलेली रक्कम तुम्हाला हळूहळू हप्त्यांमध्ये परत करता येणार आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण क्रेडिट कार्ड वापरतो अगदी त्याचप्रमाणे याचा फायदा होणार आहे.

 गुगल वॉलेट देखील आहे महत्त्वाचे

गुगलच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वीच वॉलेट एप्लीकेशन लॉन्च करण्यात आले होते व हे डिजिटल वॉलेट असल्यामुळे खूप जास्त लोकांनी याचा वापर करणे सुरू केलेले आहे. या वॉलेटमध्ये तुम्ही सर्व कार्डाचे तपशील देखील जोडू शकतात. तसेच तुम्ही पेमेंट एप्लीकेशन सोबत देखील या वॉलेटला कनेक्ट करू शकणार आहात व तुम्हाला यामुळे पेमेंट करणे सोपे होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe