Monsoon 2022: मित्रांनो 10 जून रोजी मान्सूनचे दक्षिण कोकणात दणक्यात आगमन झाले. मान्सून वाऱ्याच्या वेगाने राज्यात दाखल झाला. दक्षिण कोकणातील वेंगुर्ला मध्ये 10 जून ला दाखल झालेला मान्सून अवघ्या 24 तासात मुंबईमध्ये दाखल झाला. यामुळे या वर्षी मान्सून (Monsoon) लवकरच संपूर्ण राज्यात येईल अशी परिस्थिती होती. हवामान तज्ञ देखील असाच अंदाज वर्तवत होते.

मात्र सध्या राज्यातील काही भागात मान्सूनची (Monsoon News) हजेरी लागली असून पाऊस (Rain) पडत आहे. मात्र असे असले तरी राज्यातील अनेक भागात अजूनही पाऊस बघायला मिळतं नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) चिंतेत भर पडली असून अजूनही शेतकरी बांधव पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत आहेत. राज्यात मान्सून आगमन झाल्याचे भारतीय हवामान विभाग दावा करत आहे.

मात्र असे असताना राज्यात सर्वत्र पाऊस का पडत नाही असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. यामुळे शेतकरी बांधवांची पेरणीची कामे खोळंबली आहेत. एवढेच नाही तर कृषी संबंधित सर्व उद्योग धंदे देखील अमावस्येचा काळोखाप्रमाणे भासत आहेत. यामुळे राज्यात सर्वत्र मान्सूनचा (Monsoon Rain) पाऊस का पडत नाही याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यात मान्सून दाखल होऊनही पाऊस का पडत नाही याबाबत वरिष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुले यांनी काही महत्वपूर्ण माहिती सार्वजनिक केली आहे. चला तर मग मित्रांनो हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेली ही बहुमूल्य माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढगांचे एकूण 10 प्रकार असतात आणि या ढगाच्या वर्गीकरणनुसार मान्सूनची निर्मिती होतं असते. मान्सूनचा पाऊस पडण्यासाठी आवश्यक सिस्टीम या ढगामध्ये तयार होते आणि मग पावसाची निर्मिती होते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, जमिनीपासून साधारण 6 हजार 500 फुट उंचीपर्यंत चार ढग असतात. स्ट्रॅटस, स्ट्रॅटोक्यूमुलस, क्यूमुलस, क्यूमुलोनिंबस हे ते चार प्रकारचे ढग असून हे सर्वात निम्न पातळीवर असतात.

याशिवाय आकाशात साधारणपणे 6 हजार 500 ते 20 हजार फुट उंचीपर्यंत तीन प्रकारचे ढग आढळतात. अल्टोकुमुलस,अल्टोस्ट्रॅटस,निंबोस्ट्रॅटस अशी त्यांची नावे असून. हे ढग आकाशात मध्यम पातळीवर असतात. तसेच आकाशात साधारण 20 हजार फुट उंचीच्या वर असलेल्या उच्च पातळीवर एकूण तीन प्रकारचे ढग असतात. सिरस, सिर्रोकुमुलस, सिर्रोस्ट्रॅटस हे ढग असतात.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, जमिनीपासून साधारण 6 हजार 500 फुट उंचीपर्यंतचे व सर्वात निम्न पातळीवरील असलेले चार प्रकारचे ढग आहेत. या ढगांच्या निर्मितीसाठी सध्या आवश्यक असलेल्या अनुकूल वातावरणीय परिस्थितीचा अभाव आहे. यामुळं मोसमी पाऊस पडण्यासाठी वातावरणात जोर नाही. 

शिवाय जिथे मान्सून पोहोचलाच नाही अशा ठिकाणी पूर्वमोसमी पावसासाठी देखील वातावरण तयार होतं नसून वातावरणात अपेक्षित असा जोर बघायला मिळतं नाही. म्हणून सध्याची परिस्थिती पाहता ढगांच्या निर्मितीनंतर साधारण 21 ते 22 जूननंतर म्हणजेच जून महिना अखेरीस मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे. याशिवाय जुलैच्या पहिल्या आठवड्यात मध्यम ते चांगल्या स्वरूपातला पावसाची अपेक्षा असल्याचे देखील जेष्ठ हवामान विशेषज्ञ माणिकराव खुळे यांनी माहिती दिली आहे.