Monsoon Update: भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दहा जूनला मान्सून तळकोकणात दाखल झाल्याचे स्पष्ट केले होते.

दहा जूनला तळकोकणात च्या वेंगुर्ल्यात दाखल झालेला मान्सून (Monsoon) अवघ्या एका दिवसात मुंबईमध्ये दाखल झाला. तोपर्यंत मान्सूनचा प्रवास (Monsoon News) अतिशय वाऱ्याच्या वेगाने होत होता.

यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना (Farmer) तसेच सामान्य जनतेला मान्सून लवकरच आपल्या भेटीला येईल याबाबत शाश्वती निर्माण झाली होती.

मात्र त्यानंतर मान्सून साठी पोषक वातावरण तयार न झाल्याने असं म्हणण्यापेक्षा मान्सूनचा पाऊस कोसळण्यासाठी सिस्टिम निर्माण न झाल्यामुळे मान्सूनने काही काळ विश्रांती घेतली आहे.

आता मान्सून मुंबईत दाखल होऊन चार दिवस उलटत आली तरीदेखील मान्सूनच्या पावसाची अपेक्षित अशी हजेरी राज्यात बघायला मिळत नाहीये.

यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे तर कृषी क्षेत्राशी संबंधित उद्योग धंदे देखील अमावस्याच्या काळोख्याप्रमाणेच जाणवू लागली आहेत.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने येत्या 48 तासात मान्सूनसाठी परिस्थिती पूरक व पोषक बनत असल्याचे स्पष्ट केले असून येत्या 48 तासात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते, पाऊस पडण्यासाठी काही बाबींची आवश्यकता असते. जसे की पावसासाठी ला निनो सक्रिय लागतो. मात्र सध्या अल निनो सक्रिय आहे.

याशिवाय देखील पाऊस (Rain) कोसळण्यासाठी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार व्हावे लागते मात्र सध्या समुद्रात ही सिस्टीम तयार झालेली नाही. यामुळे सध्याची एकंदरीत परिस्थिती मान्सून पावसासाठी प्रतिकूल असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, यावर्षी केरळ मध्ये तीन दिवस लवकर पोहोचलेला मान्सून राज्यातील दक्षिण कोकणात 10 जूनला दाखल झाला. दहा जूनला दक्षिण कोकणातील वेंगुर्ल्यात आणि तिथून अवघ्या 24 तासांच्या आत मान्सून हा मुंबईमध्ये दाखल झाला.

मात्र वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा मान्सून अगदी वाऱ्याच्या वेगाने आता बेपत्ता झाल्याचे दिसत आहे. कारण की सोमवार मंगळवार बुधवार सलग तीन दिवस राज्यात कुठेच पाऊस बघायला मिळाला नाही.

शिवाय मुंबईत आता कडक ऊन पडायला लागले आहे.मात्र, असे असले तरी भारतीय हवामान विभागाने मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याचे स्पष्ट केले आहे.

यामुळे पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे. मान्सून पुढील प्रवासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा गाठणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

एवढेच नाही तर येत्या पाच दिवसात पश्चिम किनाऱ्यावर ऑफ-शोअर ट्रफ (कमी दाबाचे क्षेत्र) आणि पश्चिमेकडील वाऱ्याच्या प्रभावाखाली येत्या पाच दिवसांत राज्यात वादळाची शक्यता निर्माण झाली आहे.