Monsoon Update: महाराष्ट्रात मान्सून (Monsoon) जरी 10 जूनला दाखल झाला असला तरीदेखील जुनचा पहिला पंधरवडा हा राज्यातील जनतेला पावसाविना काढावा लागला. दहा जूनला तळकोकणातील वेंगुर्ल्यात दाखल झालेला मान्सून तिथून अवघ्या 24 तासात राजधानी मुंबईत आला मात्र मुंबईत आल्यानंतर मानसून (Monsoon News) साठी पोषक वातावरण तयार न झाल्याने मान्सून जणूकाही गायब झाला.

तद्नंतर जवळपास पंधरा दिवस मान्सून हा महाराष्ट्रातुन गायब झाल्याचे चित्र होते. मात्र आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. मोसमी पावसासाठी (Rain) आता पोषक वातावरण तयार होत असल्याने पावसाची दमदार हजेरी राज्यात बघायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या असून पेरणीच्या कामाला आता वेग आला आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक कमावलेले परभणीचे सुपुत्र हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी आजचा आपला मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) सार्वजनिक केला आहे.

पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) साहेबांच्या मते, आज गुरुवार 23 जून रोजी राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. 23 ते 27 जून महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव डख (Panjab Dakh Weather Report) यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय पंजाबराव डख साहेबांनी सांगितले की, दोन जुलै पर्यंत राज्यात सर्वदूर पावसाची नोंद केली जाणार आहे.

अर्थात 2 जुलैपर्यंत राज्यातील जवळपास सर्व भागात पावसाची हजेरी लागणार असल्याचे पंजाबराव साहेबांनी स्पष्ट केले आहे. खरं पाहता रामराव डख साहेबांनी या आधी सांगितले होते की 19 जून पासून राज्यातील अनेक भागात भाग बदलत जोरदार मोसमी पाऊस हजेरी लावणार आहे. पंजाबराव डख साहेबांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून 19 तारखे पासून राज्यातील बहुतेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडायला आता सुरुवात झाली आहे.

यामुळे पंजाबराव डख साहेबांचा हा नवीनतम अंदाज शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार असून आता शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्ट बघायला मिळत आहेत. राज्यात मोसमी पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून जनतेला मोठा आराम मिळाला आहे. शिवाय राज्यात पेरणीच्या कामाला मोठा वेग आला असून शेतकरी बांधव आता अगदी वाऱ्याच्या वेगाने पेरणीची कामे करू लागले आहेत. एकंदरीत मान्सूनने राज्याचा सर्व भाग व्यापला असून आता मान्सूनचा पाऊस राज्यातील विविध भागात कोसळत असल्याचे चित्र आहे.