Punjabrao Dakh Havaman Andaz: राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या आतुरतेने हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांच्या हवामान अंदाजाची वाट पाहत असतात. ज्या पद्धतीने शेतकरी बांधव मान्सूनची (Monsoon) चातकाप्रमाणे वाट पाहतो अगदी त्याचप्रमाणे बळीराजा पंजाबराव डक साहेबांच्या हवामान अंदाजाची (Panjabrao Dakh News) देखील वाट पाहत असतो.

दरम्यान आता मान्सूनची चाहूल राज्याला लागली आहे. भारतीय हवामान विभागानुसार मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. मात्र असे असले तरी राज्यातील एकूण जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यात अजूनही 60 टक्के पावसाची कमी नोंद झाली आहे.

यामुळे शेतकरी बांधव पेरणीयोग्य पावसाची (rain) वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव मान्सूनचा (Monsoon News) वेध घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाचा अंदाज तसेच पंजाबरावांचा अंदाज देखील मोठ्या बारकाईने बघत असतात.

या पार्श्वभूमीवर आम्ही देखील रोजाना पंजाबराव डख साहेबांचा अंदाज (Panjab Dakh Weather Report) तसेच भारतीय हवामान विभागाचा अंदाज आपल्या वाचक मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

आज पासून पावसाची जोरदार बॅटिंग :- पंजाबराव डख साहेबांच्या नवीन अद्ययावत सुधारित अंदाजानुसार, आज 16 जून रोजी तसेच उद्यापासून 19 जून पर्यंत पुर्व विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार असल्याची दाट शक्यता आहे.

निश्चितच हवामान विभागाने देखील नुकतेच विदर्भात मान्सूनचे आगमन झाल्याचे स्पष्ट केले आहे. पंजाबराव डख साहेबांनी देखील पूर्व विदर्भात मान्सूनच्या पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

20 जून नंतर नुसता धो-धो:- शेतकऱ्यांच्या मध्यात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या पंजाबराव डख यांच्या मते, 20 जूननंतर पावसाचा जोर वाढणार आहे.

20 ते 26 जून पर्यंत पुर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागात अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव डख साहेबांनी नमूद केले आहे. याशिवाय पंजाबराव डख साहेबांनी शेतकरी बांधवांना हा सुधारित अंदाज लक्षात घेऊन लागवडीचा सल्ला दिला आहे.

23 तारखेपासून राज्यात सर्वत्र पावसाची होणार जोरदार बॅटिंग:- राज्यात 23 जून ते 26 जून हे चार दिवस खुप जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

या पावसात ओढे नाले तुंब भरून वाहतील, राज्यात सगळी कडे पावसाचं दनक्यात आगमन होणार असल्याची शक्यता डख यांनी वर्तवली आहे. जोरदार पाऊस होऊन पेरण्या होतील अशी माहिती पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.