Monsoon Update: राज्यात 19 तारखेपासून मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा सक्रिय झाला असून मोसमी पावसाला (Rain) आता सुरवात झाली आहे. यामुळे पेरणीसाठी खोळंबलेल्या शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्ट झळकत आहेत. तसेच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला देखील मोसमी पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांनी धूळपेरणीचा जुगार खेळला होता अशा शेतकरी बांधवांना देखील पावसाच्या आगमनामुळे मोठा दिलासा मिळाला आहे शिवाय ज्या शेतकरी बांधवांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या त्या शेतकरी बांधवांना आता येत्या काही दिवसात पेरणी करता येणे शक्य होणार आहे. साहजिकचं मान्सूनच्या (Monsoon News) येण्याने पुन्हा सर्वकाही प्रफुल्लित होऊन गेला आहे.

राजधानी मुंबई समवेतचं सर्वत्र आता अल्हाददायक वातावरण पाहावयास मिळत आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने आता उकाड्यापासून जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पंजाबराव डख साहेबांचा (Panjabrao Dakh) मान्सून अंदाज समोर आला आहे. पंजाबराव डख साहेबांनी (Panjabrao Dakh News) आज 24 जून रोजी राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.

पंजाबरावांच्या (Panjabrao Dakh Havaman Andaz) मते, आज पासून 27 जूनपर्यंत राज्यात काही भागात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच 24, 25, 26, 27 तारखेला राज्यात भाग बदलत मोठा पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे. पंजाबराव (Panjab Dakh Weather Report) यांनी सांगितलेल्या नवीन अंदाजानुसार, दोन जुलै पर्यंत राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस हजेरी लावणार आहे. एवढेच नाही शेतकरी बांधवांच्या पेरण्या देखील आता आटोपल्या जातील अशी आशा पंजाबराव यांनी वर्तवली आहे.

दरम्यान पंजाबराव डख साहेबांनी शेतकरी बांधवांना एक अनमोल सल्ला देखील याप्रसंगी दिला आहे. पंजाबराव यांच्या मते, शेतकरी बांधवांनी पेरणी साठी घाई करू नये आणि जमिनीची ओल तपासूनच पेरणी करावी. हवामान विभागाने तसेच कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना असाचं काहीसा सल्ला दिला आहे. सध्या राज्यात सर्वत्र पेरणीची कामे करत असताना शेतकरी बांधव नजरेस पडत आहे. अनेक ठिकाणी तर शेतकरी बांधवांनी पेरणी करून टाकली आहे. यामुळे शेतशिवार आता लवकरच हिरवेगार होणार आहे एवढे नक्की.

परभणीचे सुपुत्र हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजाची शेतकरी बांधव मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या काही वर्षात पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा होत असल्याचा दावा शेतकरी बांधव करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे सांगितले जात आहे, हेच कारण आहे की शेतकरी बांधव हवामान विभागाचा अंदाज बरोबरच पंजाबराव डख साहेबांच्या अंदाजावर आपली शेतीची कामे करत असतात.