Monsoon Update: राज्यात मान्सूनचे (Monsoon 2022) दोन दिवसांपूर्वी दणक्यात आगमन झाले. यामुळे शेतकरी बांधवांसमवेतच उकाड्याने हैराण झालेली जनता मोठ्या आनंदात बघायला मिळाली.

भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दहा तारखेला मान्सून कोकणात (Monsoon Rain) दाखल झाल्याचे स्पष्ट केले होते.

दहा तारखेला कोकणात दाखल झालेला मान्सूनने अवघ्या एका दिवसात मुंबई पर्यंतचा पल्ला गाठला. हवामान विभागाने मान्सून काल मुंबईत (Monsoon News) दाखल झाल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवाय मान्सूनच्या पुढील प्रवासास पोषक वातावरण असल्याचे देखील सांगितलं आहे. यादरम्यान, हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचादेखील जून महिन्यातील मान्सूनचा अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) सार्वजनिक झाला आहे.

शेतकरी बांधवांचे देखील पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजाकडे (Panjab Dakh Weather Report) लक्ष लागून होते. अखेर काल पंजाबरावांनी 25 जून पर्यंतचा आपला मान्सून अंदाज (Panjabrao Dakh News) सार्वजनिक केला आहे.

पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांच्या मते 11 जून म्हणजेच कालपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.

11 जून पासून ते 15 जून पर्यंत राज्यातील अनेक भागात पावसाची (rain) शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. मित्रांनो 16 आणि 17 या दोन दिवशी मराठवाड्यात अति मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.

पंजाबराव डख यांच्या मते, 18 ते 22 तारखेपर्यंत राज्यातील शेतकरी बांधव आपली पेरणीची कामे उरकून घेतील म्हणजेच 22 तारखेपर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडणार असल्याचे भाकित पंजाबराव डख यांनी वर्तवले आहे. शिवाय पंजाबराव डख यांनी 25 जून पर्यंत संपूर्ण देशात मान्सूनची हजेरी बघायला मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पंजाब रावांचा शेतकऱ्यांसाठी काय आहे सल्ला :- हवामान अंदाजा बरोबर पंजाब राव यांनी काल शेतकरी बांधवांसाठी एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे.

पंजाबराव यांच्यामते, शेतकरी बांधवांनी जमिनीची ओल तपासूनच पेरणी करावी. पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी केल्यास शेतकरी बांधवांच्या अंगलट येऊ शकते आणि हजारो रुपयांचा नाहक खर्च होऊ शकतो.

याशिवाय पंजाबराव आणि शेतकरी बांधवांना चांगले दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरण्याचा सल्ला दिला आहे. विद्यापीठाचे बियाणे वापरल्यास शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले.

निश्चितच पंजाब रावांच्या या अंदाजामुळे शेतकरी बांधवात मोठे उत्साहाचे वातावरण बघायला मिळणार आहे. शिवाय आता पेरणीचा टाइम देखील जवळ आला असल्याने आगामी काही दिवसात शेत शिवार बहरलेले दिसणार आहे.