file photo

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- आज राज्यात 6 हजार 695 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात आज 120 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात दिवसभरात 7 हजार 120 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात आत्तापर्यंत एकूण 61 लाख 24 हजार 278 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.66 टक्के एवढं झालं आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,89,62,106 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,36,220 (12.94 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 4,46,501 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 2,776 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात 324 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

तर गेल्या 24 तासात 315 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,13,476 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे.

गेल्या 24 तासात मुंबई 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 4529 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1591 दिवसांवर गेला आहे.