Mosambi Bajarbhav : पुणे मार्केट यार्ड मधून अहमदनगर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाचे बातमी समोर येत आहे.

मित्रांनो सध्या पुणे मार्केट यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबीची आवक होत आहे. सध्या होत असलेली आवक अहमदनगर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून सर्वाधिक होत आहे. मित्रांनो खरं पाहता गेल्यावर्षी राज्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड केली होती.

अहमदनगर औरंगाबाद आणि जालना या तीन जिल्ह्यात मोसंबीची सर्वाधिक लागवड पाहायला मिळाली. परतीच्या पावसामुळे मोसंबी पिकाला मोठा फटका बसला. दरम्यान यावर्षी मोसंबीला आवक सुरू होताच चांगला बाजार भाव मिळू लागला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी मोसंबीला चांगला बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी बांधवांच्या अशा पल्लवीत झाल्या असून त्यांना मोसंबी पिकातून चांगले कमाई होण्याची आशा आहे.

दरम्यान मार्केट यार्ड मध्ये मोसंबीला चांगला उठाव आहे यामुळे शेतकरी बांधव समाधानी असल्याचे चित्र आहे. मित्रांनो आम्ही आपल्या त्यासाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्या बाजारात आवक होत नसलेली मोसंबी आंबिया बहारातील आहे.

आंबीया बहारातील मोसंबीची आवक ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होते. ही आवक जानेवारी महिन्यापर्यंत कायम राहते. मित्रांनो आंबीया बहारामध्ये उत्पादित होणारी मोसंबी चवीला अतिशय उत्कृष्ट असते. याशिवाय या बहारातील मोसंबी आकाराने मोठी आणि पिवळसर असते. तसेच या बहरातील मोसंबी अधिक रसाळ असल्याने या मोसंबीला बाजारात मोठी मागणी असते.

दरम्यान जानेवारी महिन्यापासून मृग बहारातील मोसंबीची आवक सुरू होणार आहे. विशेष म्हणजे या मोसंबीला देखील बाजारात चांगली मागणी असते आणि यातून शेतकऱ्यांना चांगले कमाई होत असल्याचे जाणकार लोकांनी नमूद केले आहे. मित्रांनो पुणे मार्केट यार्ड मधील व्यापाऱ्यांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, सध्या पुणे मार्केट यार्ड अहमदनगर औरंगाबाद आणि जालना या तीन जिल्ह्यातून मोसंबीची मोठी आवक होत आहे. या तीन जिल्ह्यातून दररोज 50 ते 60 टन मोसंबीची आवक नमूद केली जात आहे.

खरं पाहता या वर्षी परतीच्या पावसामुळे मोसंबी पिकाला मोठा फटका बसला आहे. मात्र बाजारात अधिक दर मिळत असल्याने मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांचे झालेले नुकसान वाढीव दराने भरून निघत आहे. खरं पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोसंबीची आवक वाढली आहे मात्र असे असले तरी पुणे मार्केट यार्ड मध्ये मोसंबीचे भाव चांगलेच वधारले आहेत.

मित्रांनो सध्या गावक बाजारात मोसंबी ला 40 रुपये प्रति किलो ते 60 रुपये प्रति किलो पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. तसेच किरकोळ बाजारात मोसंबी तब्बल 80 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. निश्चितच सध्या मिळत असलेला बाजार भाव मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांसाठी फायद्याचा ठरत आहे.