अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- भाजप खासदार सुजय विखेंसह भाजपच्या नेत्यांनी नुकतेच एक दिवसाचे उपोषण आंदोलन केले होते.

त्यावेळी खा.विखे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर, सध्या पालकमंत्री जिल्ह्यात किती पैसे आले आणि कुठे गेले याचे बॅलन्सशीट चेक करत आहेत असा आरोप केला होता.

यावर बोलताना तनपुरे यांनी भाजप मध्ये गेलेल्या नेत्यांना आता शांत झोप लागतेय, त्यामुळे त्यांना अशी खुमखुमी सुटत आहे.

मात्र आम्हीही तुमचे बॅलन्सशीट चेक करू. हसन मुश्रीफ यांच्या सारख्या जेष्ठ नेत्यांवर अशी टीका आणि आरोप करणे कितपत योग्य आहे, असा प्रतिप्रश्नही तनपुरे यांनी खा.विखेंना यानिमित्ताने विचारला.

तसेच विखेंच्या उपोषण आंदोलनाची खिल्ली उडवताना, सकाळी नाश्ता करून आले आणि संध्याकाळी जेवायला घरी गेले, हे कसले उपोषण अशी खोचक कोपरखळी तनपुरे यांनी यावेळी मारली.

मी सुद्धा उपोषण आंदोलने केली. पण राहुरी तालुक्यातील विविध प्रश्नांवर दिवस-रात्र उपोषण आंदोलन केली. पावसात उपाशी भिजत राहिलो,

पण आंदोलनाचा स्टंट म्हणून वापर न करता जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकी साठी प्रश्न सुटे पर्यंत उपाशी राहिलो. विखेंचे उपोषण म्हणजे एक स्टंट होता. खाऊन आले आणि काही तासानंतर जेवायला गेले असे तनपुरे म्हणाले.