Mumbai Nagpur Expressway : मित्रांनो, महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी मुंबई नागपूर एक्सप्रेस वे तयार करण्यात येत आहे. या मुंबई नागपूर एक्सप्रेस वे म्हणजेच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा अर्थातच समृद्धी महामार्ग लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे.

मात्र सदर बहुचर्चित महामार्गावर अद्याप पर्यंत वृक्षारोपणाचे काम झालेले नाही. यामुळे काही पर्यावरणवादी लोकांनी जोपर्यंत महामार्गालगद वृक्षारोपण केलं जात नाही तोपर्यंत महामार्ग प्रवाशांसाठी खुला होऊ देणार नाही अशी चेतावणी दिली आहे. यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण अजूनच पुढे लांबण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे या पर्यावरणवादी लोकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जोवर महामार्गालगत वृक्षारोपण केलं जात नाही तोवर सदर महामार्ग सुरू होऊ नये असं साकडं घातलं आहे. आता वृक्षारोपणाचा हा मुद्दा थेट पंतप्रधान यांच्याकडे गेला असल्याने समृद्धी महामार्गाच्या वृक्षारोपणाबाबत आणि लोकार्पणबाबत आता काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, समृद्धी महामार्ग लगत तब्बल साडेसात लाख वृक्षांची लागवड करणे अपेक्षित आहे.

मात्र अद्याप समृद्धी महामार्गावर वृक्षांची लागवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे काही पर्यावरणवादी लोकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक ईमेल करून सदर वस्तुस्थिती बाबत अवगत केले आहे. यावरून वादी लोकांनी सदर ई-मेलमध्ये जोवर महामार्गालगत आवश्यक तेवढ्या वृक्षारोपणाची कामे पूर्ण होत नाही तोवर महामार्ग सुरू करू नये असे मागणी देखील केली आहे.exp

एका मीडिया रिपोर्ट मध्ये नमूद केल्याप्रमाणे, समृद्धी महामार्ग लगत मुंबईपासून नागपूरपर्यंत गॅसची पाईपलाईन प्रस्तावित असल्याने जोवर गॅस पाईपलाईन पूर्ण होत नाही तोवर वृक्षारोपण केले जाऊ शकत नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर समृद्धी महामार्गलगत बुलेट ट्रेन देखील प्रस्तावित आहे

अशा परिस्थितीत एका बाजूने गॅस पाईपलाईन आणि एका बाजूने बुलेट ट्रेन प्रस्तावित असल्याने वृक्षारोपण खोळंबले असल्याचे जाणकार लोकांनी सांगितले आहे. त्यामुळे आता यासंदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेल करण्यात आला असल्याने आता हे प्रकरण नेमक कोणत वळण घेत. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.