Nashik Pune Expressway : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक सुखद बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता कोणत्याही विकसित राष्ट्राच्या विकासात त्या राष्ट्राची दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाकडून राज्यात जिल्हा जिल्ह्यातील अंतर कमी करण्यासाठी रस्त्यांचे जाळे तयार केले जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देखील देशात भारतमाला परियोजना अंतर्गत रस्त्यांचे कामकाज सुरू आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळकडून 701 किमी लांबीचा मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग अर्थातच समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. हा महामार्ग सध्या आपल्या अंतिम टप्प्यात आहे. समृद्धी महामार्ग हा फक्त महाराष्ट्राची राजधानी स्वप्ननगरी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांसाठीच महत्त्वाचा आहे असे नाही तर समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणाचा विकास साधता येणे शक्य होणार आहे.

या बहुचर्चित समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला आणि उद्योग क्षेत्राला एक वेगळे वळण लाभणार आहे. दरम्यान आता समृद्धी महामार्ग अंतिम टप्प्यात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य सरकार राज्यात आणखी एक द्रुतगती मार्ग तयार करणार असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यानुसार पुणे आणि नागपूरला जोडणारा नासिक पुणे महामार्ग लवकरच राज्यात विकसित केला जाणार आहे.

हा नियोजित द्रुतगती मार्ग सुमारे 180 किमी लांबीचा असेल जो चिंबळीजवळील प्रस्तावित पुणे रिंग रोडपासून सुरू होईल आणि राष्ट्रीय महामार्ग-60 वर शिंदे येथे संपेल. मुंबई आणि पुणे आधीच द्रुतगती मार्गाने जोडलेले असताना, बांधकामाधीन मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग मुंबईला नाशिकशी जोडतो. अशा प्रकारे पुणे-नाशिक एक्स्प्रेस वे मुंबई, नाशिक आणि पुणे दरम्यान वेगाने विकसित होत असलेल्या ‘सुवर्ण त्रिकोण’ प्रदेशातील उर्वरित मार्ग पूर्ण करणार आहे. पुणे-नाशिक एक्स्प्रेस वेचे अलाइनमेंट पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधून जाणार आहे.

सदर महामार्ग हा दहा पदरी एक्स्प्रेस वे म्हणून विकसित करण्याची योजना असल्याचे सदर मीडिया रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे. “एक्स्प्रेसवेवर फ्लाइट लँडिंग आणि टेकऑफ सुविधा असेल आणि प्रत्येक 5 किमीवर आपत्कालीन टेलिफोन, पार्किंग आणि ट्रक बे, रुग्णवाहिका आणि टोइंग सुविधा, क्विक रिस्पॉन्स वेहिकलं, प्रत्येक 50 किमीवर विश्रांती क्षेत्र, फूड प्लाझा, ट्रॉमा सेंटर, आयटी पार्क देखील राहणार आहेत. एक्स्प्रेस वेच्या बाजूला शैक्षणिक संस्था देखील राहणार आहे.

माहिती तंत्रज्ञान सेवांमध्ये मोफत वाय-फाय प्रवेश, वाहतूक देखरेख आणि अंमलबजावणी, सीसीटीव्ही इत्यादींचा समावेश असेल. नियोजित एक्स्प्रेस वेच्या बाजूला, महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच पुणे आणि नाशिक दरम्यान सेमी-हायस्पीड रेल्वे सुरू केली आहे.bमहाराष्ट्र सरकारने 2021-22 च्या वार्षिक अर्थसंकल्पात प्रलंबित पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची प्रस्तावित लांबी सुमारे 235 किमी आहे आणि मार्गावर 24 स्थानके नियोजित आहेत. ट्रेनचा वेग ताशी 200 किमी असेल आणि प्रकल्पाचा अपेक्षित खर्च, ज्यामध्ये 18 बोगदे बांधणे समाविष्ट आहे, 16,039 कोटी रुपये आहे. पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वे लाईन महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतून जाणार आहे.