file photo

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- राज्य सरकारने काही दिवसापूर्वी शासकीय कार्यालयात ड्रेस कोड कसा असावा याचे नियम जारी केले होते. सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर शासकीय कार्यालयात आता मोबाईलचा वापर कसा करायचा या संदर्भात राज्य सरकारने परिपत्रक काढून नियम जारी केले आहेत.

सुलभ व वेगवान संपर्क माध्यम म्हणून शासकीय कामकाजात भ्रमणध्वनीचा वापर अपरिहार्य बनला आहे. तथापि भ्रमणध्वनीच्या वापराबाबत संबंधित अधिकारी / कर्मचार्‍यांकडून अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाहीत.

अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलीन होते. सबब शासकीय कामकाज करताना भ्रमणध्वनीच्या वापराबाबत पाळावयाच्या शिष्टाचाराबाबत सूचना सामान्य प्रशासनाच्यवतीने देण्यात आल्या आहेत.

मोबाईल वापरण्याच्या संदर्भात असा आहे नवा नियम

 • 1)कार्यालयीन कामकाजासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्रथम कार्यालयातील दूरध्वनीचा वापर करावा.
 • 2)कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामकाजासाठीच आवश्यक असेल तर मोबाईलचा वापर करावा.
 • 3)मोबाईल बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा.बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी.
 • 4)मोबाईलवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे,वाद घालू नये.व असंसदीय भाषा वापरु नये.
 • 5)कार्यालयीन कामासाठी मोबाईलचा वापर करताना टेक्स मेसज शक्यतो वापर करावा.तसेच मोबाईलवर बोलताना कमीत कमी संवाद साधावा.
 • 6)लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयीन कॉल्सना तात्काळ उत्तर द्यावे.
 • 7)मोबाईल कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमांचा वापर करताना वेळेचे व भाषेचे तारतम्य पाळावे.
 • 8)अत्यावश्यक वैयक्तिक कॉल कक्षाचे बाहेर जाऊन घ्यावे.
 • 9)मीटिंगच्या वेळी मोबाईल सायलेंट किंवा व्हायब्रेटवर ठेवावा.
 • 10)मीटिंगचालू असताना मोबाईलचा वापर करु नका.
 • 11)कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना मोबाईल बंद ठेऊ नये.