file photo

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-खरंतर हा चौदावा वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकार देते. मात्र सध्या तो निधी कोरोनाच्या नावाखाली (व्याज) राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान पुणे यांच्याकडे जमा केला.

त्यातून अर्सनिक गोळ्या व रुग्णवाहिका घेतल्या आहेत. पण या रुग्णवाहिका खरंच जिथे गरज आहे त्या ठिकाणीच द्या, नाहीतर ” बळी तो कान पिळी ”असे बाकीच्या विकासकामाच्या वाटपात झाले तसे व्हायला नको.

असे मत जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी व्यक्त केले. ते पूढे म्हणाले की, याच चौदावा वित्त आयोगाच्या व्याजाचे अजून २० ते२२ कोटी शिल्लक आहेत. ते या कोरोना महामारीत वापरायला हवे.

संपूर्ण ग्रामीण भागातील आरोग्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदेची आहे. पण ग्रामीण भागातील रुग्णाचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आजही आरोग्य विभागातील सर्व लोक खूप चांगले काम करतात.

पण बऱ्याच ठिकाणी त्यांना अडचणीला सामोरे जावा लागते. अनेक ठिकाणी पुरेसा औषधसाठा नाही वाहने नाही, लस नाही, तपासणी किट नाही, उपचाराचे संसाधन नाही, ग्रामीण भागातील रुग्णाला रेमडेसीव्हीर मिळत नाही.

यावर तरी हा निधी वापरावा, आपले बरेच जि प सदस्य जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. मागच्याही कोरोना काळात जिल्हा नियोजनाला ७२ कोटी मिळाले, त्यातले ३२ कोटी खर्च झाले बाकी निधी पडून आहे.

झालेला खर्च किती झाला कुठे झाला किती नियोजन समिती सदस्यांना डिपीओ सांगितला. आता ही तीस टक्के निधी कोरोनासाठी वापरायचा आहे. तो वापरालाही पाहिजे कारण संकट मोठेच आहे.

परंतु आमच्या अकोल्यात कोविड सेंटर चालु आहे आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधे तेथे देतात ते पण कमी पडतात मग तेथे लोकवर्गणी काढून औषधे घावे लागतात. मग हा कोरोनासाठी नियोजन समितीचा निधी ग्रामीण भागात का दिला जात नाही.

सगळा निधी सिव्हीलला वर्ग केला जातो, तिथे पण द्या ती आपलीच माणसे आहेत. पण ग्रामिण भागात पण द्या आज योगा योगाने पालकमंत्री जिल्ह्यात आहे त्यांना कोणी तरी अवगत करावे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|