अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- सध्या अवैध व्यावसाय करणारे कोणत्या पद्धतीने हा व्यवसाय करतील ते सांगता येत नाही. आता तर चक्क कारमधून अवैधपणे गोमांसाची वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या प्रकरणी बेलवंडी पोलिसांनी धडक कारवाई करत ही कार ताब्यात घेत तब्बल १ लाख ६५ हजार रूपये किमतीचे ५५० किलो गोमांस व कार जप्त केली करत या प्रकरणी दोघावर कारवाई करत अटक केली आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील नगर- पुणे महामार्गावरील गव्हाणेवाडी शिवारात केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, बेलवंडी पोलिसांकडून सध्या पोलिस रेकॉर्डवरील फरारी आरोपी पकडण्यासाठी नाकाबंदी करत विशेष मोहीम चालू आहे.

या दरम्यान पोलिस निरिक्षक संपतराव शिंदे हे अवैध धंद्याची माहिती घेत असताना त्यांना एका कारमध्ये अवैधपणे गोमांस वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नगर- पुणे मुख्य रस्त्यावर गव्हाणेवाडी येथे नाकाबंदी केली.

यादरम्यान  (एम.एच. सी.आर. ४१६६) ही महिंद्रा कंपनीची मांझा कार थांबवत पाहणी केली असता, त्यात १ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे ५५० किलो गोमांस आढळुन आले. याप्रकरणी पोलिसांनी गाडीचा चालक योगेश रोहिदास गोरडे  व रोशन मधुकर गुरसाळे  यांना अटक करत  त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.