file photo

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- अलीकडे अनेकदा एकाच्या चुकीची शिक्षा मात्र सर्वसामान्य माणसाला भोगावी लागत असल्याचा प्रकार समोर आहेत. असाच काहीसा प्रकार नगर शहरातील बुरुडगाव परिसरात घडला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महापालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोवर संकलित होणार्‍या कचर्‍यावर कोणतीही प्रोसेसिंग न करता संबंधित ठेकेदार कंपनीने या कचर्‍याची परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतावर तसेच जेथे जागा भेटेल तेथे विल्हेवाट लावली आहे.

बुरुडगाव हद्दीत महापालिकेचा कचरा डेपो असून, शहरातील संकलित कचरा या डेपोवर नेऊन टाकला जातो. या ठेकेदार कंपनीने केवळ २० टक्केच कचर्‍यावर प्रोसेसिंग करून इतर कचर्‍याची परिसरातील शेतीत विल्हेवाट लावल्याने अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी नापिक झाल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे.

या कचर्‍यावर कोणतीही प्रोसेसिंग न केल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. तसेच कुत्र्यांचा उपद्रव, धूर, डास यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे बुरुडगावच्या नागरिकांनी या डेपोस विरोध करत त्याविरोधात थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली होती.