file photo

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- बॉलिवूड गायक यो यो हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने हनीवर कौटुंबिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. यात तिने आपला मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचा सुद्धा म्हटलं आहे.

शालिनीनी म्हटलं आहे, की हनीसिंग, त्याचे आईवडील आणि त्याच्या लहान बहिणीने आपलं शोषण केलं आहे. तिने या चौघांविरोधात दिल्लीच्या तीन हजारी कोर्टात याचिका दाखल केली आहे. १६० पानांच्या या याचिकेत शालिनीने १० वर्षांपूर्वी आपल्या हनिमूनच्या वेळेचा एक किस्सा सांगितला आहे,

यामध्ये हनीने आपल्याला मारहाण केल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. ‘हनी आणि ती शाळेत एकत्र शिकायला होते. त्यावेळीचं त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं होतं. तब्बल १० वर्षांच्या अफेयरनंतर १४ मार्च २०१० मध्ये या दोघांनी आपल्या कुटुंबांच्या समंतीने साखरपुडा केला होता.

त्यांनतर २३ जानेवारी २०११ मध्ये त्यांनी कुटुंबियांच्या उपस्थित लग्नदेखील केलं. हृदेश म्हणजेच हनीसिंगला सुरुवातीपासूनचं म्युझिकवर प्रेम होतं. त्याचं हे म्युझिकवर असणारं प्रेम पाहून शालिनीने प्रत्येकवेळी त्याची साथ दिली’. याचिकेमध्ये पुढे शालिनीने म्हटलं आहे, जेव्हा लग्नानंतर आम्ही मॉरिशसला गेलो.

तिथे गेल्यानंतर हनी शांत शांत राहू लागला. त्याच्या वागण्यात खूप बदल झाला होता. हॉटेलमध्ये एकवेळ मी त्याला विचारलं काय झालं आहे. त्याला राग आला.

यावेळी हनीने मला खुपचं जोरदार धक्का देत बेडवर ढकललं, आणि किंचाळू लागला, मला म्हटलं तू मला प्रश्न कसं विचारलंस, हनीसिंगला प्रश्न विचारायची हिम्मत कोणाची नाहीय. तर तूसुद्धा मला प्रश्न विचारू नकोस. अशापद्धतीने हनीच्या पत्नीने म्हणजेच शालिनीने दिल्ली कोर्टात याचिका करत, त्याच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.