file photo

प्रवरा नदी पात्रातील वाळूवर पुलाचे काम करणारे वाहनेच वाळूवर डल्ला मारत असल्याचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यातील पाचेगावात समोर आला आहे.

दरम्यान या घटनेची माहिती समजताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नदीपात्रातील अनधिकृतपणे वाळू उपसा करणारा पोकलेन पकडला आहे.

मात्र जेसीबी व वाळूने भरलेला डंपर मात्र पसार झाला. पकडलेला पोकलेन गोणेगाव येथे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. दरम्यान गेल्या अडीच वर्षांपासून पाचेगाव प्रवरा नदीवर पुलाचे काम चालू आहे, हे काम शेवटच्या टप्प्यात असून

पुलाच्या कामासाठी भाडेतत्त्वावर पोकलेन, जेसीबी व डंपर आहे. पण दिवस भरातील काम संपल्यानंतर मात्र हे वाहने प्रवरा नदीतील वाळू वर डल्ला मारत असल्याची खबर महसूल यंत्रणेला कळाली.

त्या अनुषंगाने महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी कारवाई केली. सदर वाहने हे पुलाच्या कामासाठी भाडेतत्त्वावर आणली आहे, असे पुलाच्या कॉन्ट्रॅक्टरकडून सांगण्यात येत आहे.

पण हे वाहने जरी भाडेतत्त्वावर आणली असली तरी हे वाहने नेमके कोणाची हा देखील मोठा प्रश्न निर्माण होत आहे. या वाहनांना वाळू तस्करी करण्यासाठी कोणी सांगितले, वाळू नेमकी कुठे टाकली जात आहे, असे किती निरुत्तर प्रश्न आज या ग्रामस्थांना पडले आहे.