file photo

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- श्रीरामपूर शहरातील एका कोवीड सेंटरने अव्वाच्या सव्वा बिल कोरोना पेशंटकडुन आकारल्याबाबत तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या.

त्यामध्ये श्रीरामपूर येथील एका महिलेने देखील जिल्हाधिकारी व आरोग्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती.शासनाच्या नियमापेक्षा जास्त बील आकारलेबाबत या तक्रारी होत्या. या सर्व तक्रारी च्या अनुषंगाने नगरचे जिल्हाधिकारी यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे.

या सेंटरने लाखोंचे बिल वसूल केल्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून तक्रारदारांची संख्या वाढत असल्याने हे कोवीड सेंटर आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.