Jaggery Tea : गुळाचा चहा आरोग्यासाठी वरदान! ‘या’ 5 समस्या होतील दूर…

Jaggery Tea

Jaggery Tea : भारतातील जवळ-जवळ सर्वच लोक आपल्या सकाळची सुरुवात चहाने करतात, पण रिकाम्या पोटी चहाचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. पण काहींना चहाची इतकी सवयी झालेली असते, की त्यांना ती सोडवत नाही, अशास्थितीत तुम्ही दिवसाची सुरुवात गुळाच्या चहाने करू शकता. गुळाचा चहा प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. तसेच याच्या सेवनाने तुमच्या आरोग्यावर कोणतेही परिणाम होत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरकारी जागेत अनधिकृत गाळे बांधण्यावरुन उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यात मारहाण

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : टाकळीभान गावठाण हद्दीतील संस्था, शाळा व शासकीय कार्यालयांच्या जागेकडे गाळा माफियांनी मोर्चा वळवून तेथे थेट अनधिकृत गाळे बांधायला सुरवात केली. त्यात ग्रामपंचायत सदस्यच पुढे असल्याने अतिक्रमणावरून उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यामध्ये मंगळवारी सकाळी हाणामारी झाली. यात दोघे जखमी झाले. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. येथील कृषी विभागाच्या कृषी मंडळ कार्यालयासाठी … Read more

Loksabha Elections : ह्या तारखेला होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

Loksabha Elections

Loksabha Elections : देशात १३ किंवा १४ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल, तर २० एप्रिलला महाराष्ट्रात मतदान होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दोन टप्प्यांत ही निवडणूक होण्याचा अंदाज आहे. हे पाहता लोकसभा निवडणुकीत आजपासून मतदानासाठी फक्त ४५ दिवस बाकी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागावे, अशा सूचना राष्ट्रवादी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! तर शून्य टक्के व्याजदर…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून, चालु वर्षों आज अखेर अल्पमुदत शेतीकर्जा करिता ३२११ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्पमुदत कर्ज वाटप करणारी आपली बँक एकमेव आहे. दि.३१ मार्च २०२४ अखेर वसूलास पात्र कर्ज रक्कम कर्जदार शेतकऱ्यांनी वेळेत भरणा करुन ३ लाखापर्यंतच्या पिक कर्जास … Read more

Ahmednagar Politics : स्वाभिमानाची ‘तुतारी’ वाजवा खा.कोल्हेंचे आ. लंकेंना साकडे !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजावी, अशी अपेक्षा करीत खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी आ. नीलेश लंके यांना शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी साकडे घातले. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या शेवटच्या प्रयोगानंतर खा. कोल्हे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मा. आ. राहुल जगताप, प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब … Read more

Rahu Mars Sun Conjunction 2024 : वर्षांनंतर, मीन राशीत सूर्य, मंगळ आणि राहूचा महासंयोग, 4 राशींचे चमकेल नशीब !

Rahu Mars Sun Conjunction 2024

Rahu Mars Sun Conjunction 2024 : ज्योतिषशास्त्रात सूर्य, ग्रहांचा राजा, ग्रहांचा सेनापती आणि पापी ग्रह राहूची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सूर्य हा सन्मान, उच्च स्थान आणि नेतृत्व क्षमतेचा कारक मानला जातो. तर मंगळ हा शौर्य आणि धैर्याचा कारक मानला जातो.  राहू हा मायावी ग्रह मानला जातो जो नेहमी मागे फिरतो. सूर्य आणि मंगळ हे … Read more

Maharashtra Politics : विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्त्या लांबणीवर

Maharashtra Politics : विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीचे घोंगडे भिजत पडले आहे. वर्षे लोटली तरी या जनहित याचिकेच्या सुनावणीला मुहूर्त मिळत नसल्याने केवळ तारीख पे तारीख हा खेळ सुरू आहे. आता न्यायालयाने १९ मार्च ही तारीख निश्चित केली आहे. विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुक्त्या गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने नावांची शिफारस करून … Read more

Mangal Gochar 2024 : मंगळाचे मेष राशीत संक्रमण, ‘या’ राशींवर होईल सकारात्मक परिणाम !

Mangal Gochar 2024

Mangal Gochar 2024 : ग्रहांचा सेनापती मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. मंगळ जूनमध्ये आपल्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे “रुचक” नावाचा शुभ योग तयार होत आहे. मंगळाच्या या संक्रमणाचा नकारात्मक आणि सकारात्मक अशा सर्व राशींवर प्रभाव पडेल. या काळात यश आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होईल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. ऊर्जा … Read more

Vijaya Ekadashi 2024 : आज विजया एकादशीच्या दिवशी खुलेल ‘या’ 5 राशींचे भाग्य, करा हे उपाय !

Vijaya Ekadashi 2024

Vijaya Ekadashi 2024 : एकादशीला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला “विजया एकादशी” असे म्हणतात. बुधवार, 6 मार्च रोजी विजया एकादशीचे व्रत केले जात आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा दिवस खूप खास असणार आहे. या काळात ग्रह आणि नक्षत्रांचा विशेष संयोग होणार आहे. ज्याचा काही राशींना खूप फायदा होईल. ‘या’ राशींना … Read more

Ahmednagar News : सोयाबीन दराचा निच्चांक, साधा हमीभावही मिळेना ! शेतकरी हवालदिल

Ahmednagar News

Ahmednagar News : सोयाबीन दराने यंदाची निच्चांकी पातळी गाठली आहे. नगरसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गत दोन महिन्यांपासून सोयाबीनला प्रतिक्विंटल अगदी चार हजार रुपये इतकाच दर मिळत आहे. सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ६०० रुपये आहे. आता त्याच्याही खाली हे दर पोहोचले आहेत. जवळपास मागील दोन महिन्यांपासून सोयाबीन दरात सुधारणा झाली नसून पीक विम्याचाही लाभ मिळत नसल्याने … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये गॅंगवार ! गोळीबार..मारहाण..एकाचा मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शेवगाव गेवराई रस्त्यावर गोळीबार व मारहाणीचा प्रकार घडला. ही घटना रविवारी घडली होती. यातील मारहाण करण्यात आलेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अर्जुन पवार (रा. पुसद, जि.यवतमाळ), असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी राजेश गणेश राठोड (रा. बजरंगनगर, ता पुसद, जि. यवतमाळ) याच्या फिर्यादीवरून सुरेश उर्फ पिन्या कापसेसह १० ते १२ अनोळखी व्यक्तींवर … Read more

Ahmednagar Politics : मतदान केंद्रावर बाळासाठी असणार पाळणाघरही ! मिळणार ‘या’ सुविधा

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आगामी लोकसभा निवडणूक आता अगदीच तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत ५ किंवा ५ पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या बूथवर लहान बाळांसाठी पाळणाघराची सोय करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. साधारण पुढील आठवड्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. त्या … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड; रोहित पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, काय म्हटलेत रोहित ?

Maharashtra Politics

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये अशा काही घडामोडी घडल्या आहेत ज्यामुळे राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येणे कठीण आहे. अशातच आता शरद पवार यांच्या गटातील रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार असे संकेत मिळू लागले आहेत. … Read more

निलेश लंके यांच्याबाबत राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोललेत; म्हटलेत की, निवडणूक लढवणे हे…

Radhakrishna Vikhe Patil On Nilesh Lanke

Radhakrishna Vikhe Patil On Nilesh Lanke : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभेच्या निवडणुकींचे पडसाद उमटू लागले आहेत. राजकीय पक्षांच्या माध्यमातून आगामी लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. राजकीय नेते देखील आता आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारी करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. … Read more

नगर दक्षिण मतदारसंघात शरद पवार की अजित दादा कोणाचा पक्ष अधिक वजनदार ? निलेश लंके यांनी बाजी पलटली तर कोणाकडे किती आमदार ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची घडामोडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली उभी फूट. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर नगर दक्षिणमध्ये अजित दादा यांच्या गटात दोन आमदार आणि शरद पवार यांच्या गटात दोन आमदार आहेत. दरम्यान लोकसभेच्या निवडणुका अगदी बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर येऊन ठेपल्या … Read more

बातमी कामाची ! एसबीआयने लॉन्च केली ‘ही’ नवीन एफडी योजना, गुंतवणूकदारांना मिळणार ‘इतके’ व्याज

SBI New FD Scheme

SBI New FD Scheme : एसबीआय ही देशातील एक प्रमुख पब्लिक सेक्टर बँक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेकडून नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. अलीकडेच या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन एफडी स्कीम लॉन्च केली आहे. यामुळे जर तुम्ही ही एसबीआय बँकेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत … Read more

Post Office ची ‘ही’ बचत योजना महिलांसाठी ठरणार फायदेशीर ! मिळणार 7.5 टक्के व्याज

Post Office Scheme

Post Office Scheme : तुम्हीही तुमचा कष्टाचा पैसा कुठं गुंतवण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची राहणार आहे. ही बातमी महिलांसाठी अधिक उपयोगाची ठरणार आहे. खरेतर आधी महिला वर्ग गुंतवणुकीसाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला विशेष प्राधान्य देत असत. आता, मात्र सोन्याऐवजी इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याला महत्त्व दिले जाऊ लागले आहे. बँकेची … Read more

अर्बन बँक घोटाळा प्रकरणी उद्योजकाला अटक, पाण्याच्या टाकीत बसला होता लपून

नगर अर्बन घोटाळाप्रकरणी आणखी एकाला आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी (दि. ४) पहाटे अटक केली. अविनाश प्रभाकर वैकर (वय ६३, रा. सोनानगर चौक, सावेडी, अहमदनगर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अटक केलेल्या कर्जदार उद्योजकाने बँकेकडून कर्ज घेतलेल्या रकमेतून काही रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची … Read more