Post Office ची ‘ही’ बचत योजना महिलांसाठी ठरणार फायदेशीर ! मिळणार 7.5 टक्के व्याज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : तुम्हीही तुमचा कष्टाचा पैसा कुठं गुंतवण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची राहणार आहे. ही बातमी महिलांसाठी अधिक उपयोगाची ठरणार आहे.

खरेतर आधी महिला वर्ग गुंतवणुकीसाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला विशेष प्राधान्य देत असत. आता, मात्र सोन्याऐवजी इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याला महत्त्व दिले जाऊ लागले आहे.

बँकेची एफडी योजना पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे.

दरम्यान, आज आपण अशाच एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण पोस्ट ऑफिसच्या महिला सन्मान बचत पत्र योजनेची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

पोस्ट ऑफिसची ही एक सरकारी योजना आहे. यामध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते. विशेष म्हणजे यातून महिलांना चांगला परतावा देखील मिळू लागला आहे. या योजनेचा लॉक इन पिरियड दोन वर्षांचा असतो.

अर्थातच ही योजना दोन वर्षात परिपक्व होते. म्हणजेच आता एखाद्या महिला गुंतवणूकदाराने या योजनेत जर गुंतवणूक केली तर दोन वर्षांनी सदर महिलेला या योजनेचा पैसा परत मिळणार आहे.

या योजनेत महिलांना किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते. तसेच या योजनेत कमाल दोन लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. अर्थातच दोन लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम या योजनेत गुंतवता येत नाही.

किती व्याजदर मिळते ?

पोस्ट ऑफिस कडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेत गुंतवणूक केलेल्या महिलांना 7.5% या व्याजदराने रिटर्न दिले जातात.

अर्थातच जर या योजनेत एखाद्या महिला गुंतवणूकदाराने आता दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर दोन वर्षांनी अर्थात जेव्हा ही योजना परिपक्व होईल तेव्हा त्या सदर महिला गुंतवणूकदाराला दोन लाख 32 हजार 44 रुपयांची रक्कम मिळणार आहे.

यामध्ये दोन लाख रुपये ही सदर महिला गुंतवणूकदाराने गुंतवलेली रक्कम राहणार आहे आणि 32 हजार 44 रुपये हे त्यावरील व्याज राहणार आहे.