अभिमानास्पद! पारनेर तालुक्यातील नारीशक्ती कोविड योद्धे म्हणून कार्यरत

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :सध्या जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या परिस्थितीशी लढा देण्यासाठी पोलीस यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, शिक्षक, शासकीय यंत्रणेतील इतर घटक हे सर्वजण देशसेवा म्हणून कोविड योद्धे म्हणून कार्यरत आहेत. यात पारनेर तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. पारनेर तालुक्यातील शिरापूर येथील लेकी व … Read more

रविंद्र कळमकर पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील रहिवासी रविंद्र भानुदास कळमकर यांची पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. 2009 मध्ये रवींद्र कळमकर यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली होती. त्यांची नेमणूक मुंबई येथे पार्कसाईट पोलिस ठाणे विक्रोली येथे झाली. नंतर त्यांनी माहिम, बांद्रा पोलिस स्टेशन … Read more

नगरमध्ये कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रशासन करणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत चालले आहे. या वाढत्या संक्रमणाच्या आकडेवारीने प्रशासनाची चिंता वाढली आहे. अहमदनगरमधील बाधितांच्या संख्येने आठशेचा टप्पा पार केला आहे. रुग्णवाढीचा वेग असाच कायम राहिल्यास येत्या दोन ते तीन दिवसात नगर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एक हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. रुग्ण संख्या … Read more

महिना झाला तरी चिमुरडीच्या मृत्यूचे कारण समजेना; आईवडिलांचा आत्मदहनाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :मुंबई व पुणे येथून आलेल्यांना गावात संस्थात्मक क्वारंटाईन केले जाते. क्वारंटाइन केलेल्या अशाच एका कुटुंबाबाबत ह्रदय हेलावून टाकणारी घटना अकोले तालुक्यात घडली. मुलीचा मृत्यू तर झालाच परंतु तिच्या मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठीही तिच्या पालकांना रूग्णालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. आज महिना लोटला तरी मुलीचा मृत्यू कशाने झाला हेच त्यांना सांगितलेले … Read more

शरद पवारांचा फडणवीसांबद्दल गौप्यस्फोट

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ला सविस्तर मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. त्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेलं राजकीय नाट्य यावरही भाष्य केले. शिवसेनेआधी शरद पवार यांनी भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी चर्चा केली होती, असा आरोप भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी … Read more

कोरोना दैनंदिन जीवनाचाच एक भाग, खा.शरद पवार म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : प्रत्येक नागरिकाची कोरोनासह जगायच्या संबंधीची तयारी असली पाहिजे. कोरोना हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होतोय, अशी भूमिका तज्ज्ञांकडून मांडली गेली आहे. ती गृहीत धरून पुढे जाण्याच्या संबंधीचा विचार करावा लागेल असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची एक खास … Read more

जिल्ह्यात पुन्हा राजकीय नाट्य ! ‘ह्या’ सभापतींचा राजीनामा

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : पारनेरच्या नगरसेवकांचे पक्षांतरनाचे राजकीय नाट्य संपते न संपते तोच श्रीगोंदा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती धनसिंग विठ्ठल भोइटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या कार्यालयकडे सोपवल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. मागील साडेतीन वर्षांपासून नामधारी पद व सह्यांचे अधिकार नसल्याने हा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. या कृषिउत्पन्न बाजार … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ३९ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज ३९ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे .यामुळे जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ५६८ झाली आहे.  यामध्ये नगर मनपा १५, राहाता ०३,श्रीरामपूर ०३, पाथर्डी, कोपरगाव,अकोले प्रत्येकी ०२,पारनेर ०६, शेवगाव, नेवासा, संगमनेर, राहुरी, बीड, भिंगार प्रत्येकी ०१ रुग्ण.यांचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या:५६८ उपचार सुरू:२५४ अहमदनगर … Read more

वैयक्तिक रागातून फेसबुकवर केली महिलेची बदनामी

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  एका तरुणाने एका महिलेचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. या अकाऊंटवरून त्या महिलेची बदनामी या तरुणाने केली. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून तरुणाला अटक केली आहे. वैयक्तिक रागापोटी त्याने हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. गणेश पांडुरंग गायकवाड (वय-30, रा. सिद्धार्थनगर, नगर) असे आरोपीचे नाव आहे. गायकवाड याने फिर्यादी … Read more

जिल्हा परिषदेतील ‘ह्या’ सभापतींचा स्त्राव पाठविला तपासणीला

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  सोनई मधील ‘त्या’ अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संपार्गातील १० लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता सोनईकरांचे धाबे दणाणले आहेत. आता जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख हे सोनईतील बाधितांच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी स्वत:हून कोरोना चाचणीसाठी स्त्राव दिला. आज हा अहवाल येणार असून याकडे जिल्हा … Read more

धक्कादायक ! कोरोना संशयितांना निकृष्ट जेवण

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  प्रशासनाने कोरोनाच्या प्रसारास आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभे केले आहेत. परंतु बऱ्याचदा या ठिकाणावरून अनेकदा विविध तक्रारी येत असतात. आता श्रीगोंदे शहरातील समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहमध्ये सुरु केलेल्या कोविड-19 या विभागात दिले जाणारे जेवण अत्यंत निकृष्ठ असल्याची तक्रार युवक काँग्रेसचे स्मितल वाबळे यांनी केली असून या बाबत … Read more

‘तो’ तलाठी वाळू माफियांकडून हप्ते घेतो; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  अवैध वाळू उपसा, वाळू वहातूक, वाळू माफिया हे शब्द जिल्ह्याला काही नवीन राहिले नाही. जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि त्यावरील कारवाई असे प्रकार बऱ्याचदा घडलेले आहेत. या लोकांशी महसूल मधील काही लोकांचे लागेबांधे असल्याचे आरोप अनेकदा केले जातात. आता कर्जत तालुक्यातील येसवडी येथील बळीराम अंकुश कांबळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना … Read more

‘तो’ ठेकेदार कोरोना पॉझिटिव्ह;नुकताच झाला होता मुलीचा विवाह…

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. काल आलेल्या अहवालानुसार श्रीरामपूर शहरात पुन्हा एका ठेकेदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अद्याप 24 जणांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे आता श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा 43 वर जावून पोहोचला आहे. … Read more

पारनेरच्या ‘त्या’ नगरसेवकांसह महिला पदाधिकारी क्वारंटाईन

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :पारनेरच्या नगरसेवकांचे पक्षांतरनाचे सत्तानाट्य महाराष्ट्रभर चर्चेचा विषय झाले. परंतु आता या नगरसेवकांना व शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुखांना सात दिवस होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. कारण यांनी कोरोनाच्या काळात प्रवास केला असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. पक्षांतरनाच्या राजकीय नाट्यवेळी या सर्वांनी मुंबई येथे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. … Read more

धक्कादायक बातमी : आधी निगेटिव्ह, नंतर पॉझिटिव्ह…

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  श्रीरामपूर तालुक्यात एका रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या कुटुंबातील काही जणांचे स्त्राव निगेटिव्ह आले. काही दिवसांनी त्यांना त्रास होऊ लागल्याने पुन्हा तपासणी केल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे निगेटिव्ह अहवाल आला, तरी अशांनी घराबाहेर पडणे धोक्याचे ठरणार आहे. ३० जूनला शहरातील एका अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या कुटुंबातील बारा … Read more

इंदोरीकरांवरील गुन्हा मागे न घेतल्यास साधू, संत रस्त्यावर…

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :   घातक रूढी, परंपरांवर आसूड ओढून समाजजागृतीचे काम करणारे निवृत्ती महराज देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा तत्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा सर्व साधु, संत, वारकरी संप्रदायातील लोक व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा महंत योगी केशवबाबा चौधरी वीरगावकर यांनी दिला आहे. वीरगावकर यांनी तहसीलदार मुकेश … Read more

कुटुंबातील २२ जणांपैकी १० जणांना कोरोनाची लागण,गाव हॉटस्पॉट म्हणून घोषित

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :   सोनईतील दहाजणांना कोरोनाची लागण झाल्याने गाव हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहे. गावात जाणारे सर्व रस्ते अडवण्यात आले आहेत. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी गावात फिरून उपाययोजनेची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथून सोनईत आलेल्या संशयित रुग्णाचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबातील २२ जणांपैकी १० … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आठवीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाईचे येथे गुरुवारी सायंकाळी इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. इमामपूर येथील नीलेश संतोष आवारे (वय १३) हा विद्यार्थी जेऊर येथे आपल्या मामाकडे राहत होता. त्याने गुरुवारी सायंकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजले नाही. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more