दिलासादायक! प्लाझ्मा थेरपीने ६५ वर्षांची वृद्धा कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- लखनऊ कोरोनाच्या उद्रेकानंतर जगभरात लस शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इतर काही वेगळे प्रयोगही केले जात आहेत, भारतात प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रभावी ठरताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्धनगर जिल्ह्यात प्रथमच, ६५ वर्षांच्या महिलेवर प्लाझ्मा थेरपीद्वारे यशस्वीरित्या उपचार केले गेले. त्यामुळे ती ठणठणीत बरीही झाली. विशेष म्हणजे या महिलेला आधीच … Read more

६० तास उपाशी राहून प्रवास करणाऱ्या मजुराचे निधन

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील मछलीशहर या आपल्या गावी श्रमिक रेल्वेद्वारे निघालेल्या मजुराचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रवासात आम्हाला खायला – प्यायला काहीच मिळाले नसल्याने त्यांचा मृत्यूझाल्याचा आरोप मृताचा पुतण्या रवीश यादव याने केला आहे. रवीश यादव म्हणतो, माझ्या काकांना प्रवासात काहीही न मिळाल्याचा त्रास होत होता. त्यांना … Read more

लाखो रुपयांच्या नोकरीवर पाणी सोडून ‘ती’ झाली न्यायाधीश, अशी केली तयारी

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-जमशेदपूर झारखंडच्या जमशेदपूर येथील हिना यांनी लाखो रुपयांची नोकरी सोडली. आणि न्यायाधीश होण्याचं स्वप्न साकार केलं. हिना यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले. हिना एका नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी करत त्यांनी न्यायाधीश होण्याच स्वप्न उराशी बाळगळ. अखेर तिनं नोकरी सोडली आणि न्यायाधीशाच्या परीक्षेसाठी तयारी सुरू केली. यूपी पीसीएस … Read more

WHO ने थांबवलं तरी भारतात हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा वापर; जाणून घ्या..

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-कोरोनाच्या विरोधात अनेक तज्ज्ञ लढत आहेत. परंतु त्यांना अजूनही लस शोधण्यास म्हणावे असे यश आलेले नाही. हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा मध्यंतरी वापर करण्याचा प्रयत्न केले गेला. परंतु या औषधाचे कोरोना रुग्णांवर होणारे दुष्परिणाम पाहता जागतिक आरोग्य संघटनेनं या औषधाचं ट्रायल थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने आरोग्य कर्मचाऱ्यांवर या … Read more

कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोरोनाचा शिरकाव ; मोठा अधिकारी कोरोनाग्रस्त

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- कल्‍याण मुंबई, ठाण्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता कोरोनाने कल्याण-डोंबिवलीतही वेग घेतले आहे. आता तर कल्याण-डोंबिवलीत आरोग्य विभागातील अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे चिंताजनक वातावरण झाले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासकीय इमारत, अल्पबचत भवन व सचिव कार्यालयाची इमारत सॅनेटाईज करण्यात येणार आहे. यासाठी बुधवारी कार्यालयीन कामकाज बंद ठेवण्यात … Read more

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये तरुण-तरुणींची न्यूड पार्टी

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- मिसौरी सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले आहे. परंतु या सर्वांना तिलांजली देत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत अमेरिकेतील सेंट्रल मिसौरी येथे तब्बल 11 हजार लोक एकत्र येत न्यूड पूल पार्टी करणाऱ्या तरूणांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जगप्रसिद्ध लेक … Read more

‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहताची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- गेल्या काही दिवसांपासून सिनेइंडस्ट्रीमधील कलाकार आत्महत्या करण्याचे सत्र सुरू आहे. दोन कलाकारांची आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना एकानंतर एक कलाकारांच्या निधनाचे वृत्त समोर येत आहेत. आता ‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलेल्या पोस्टवरून स्पष्ट होत … Read more

‘किरीट सोमैया सोशल मीडियावर फेक न्यूज पसरवतात’

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया हे सोशल मीडियावर फेक न्यूज पसरवतात असा आरोप करत त्यांना अटक करावी अशी मागणी मनसेने केली आहे. किरीट सोमैया यांनी सोमवारी ट्वीट करून ग्रँट रोड येथे एक महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ ट्वीट करून ती कोरोना त्रस्त असल्याचे आणि अँम्ब्युलन्सची प्रतीक्षा करत असल्याचे म्हटले होते. तर मुंबई … Read more

धक्कादायक! रेल्वे प्रवासात अन्न-पाण्यावाचून 7 मजुर मृत्युमुखी

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-पाटणा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. या काळात अनेक मजूर देशभरात विविध ठिकाणी अडकून पडले. त्यांना त्यांच्या ठिकाणी पोहोच करण्यासाठी श्रमिक रेल्वेही सुरु करण्यात आल्या. परंतु मजुरांचे त्या ठिकाणीही हाल झाले. अपघातात मृत्यूमुखी पडल्याच्या घटना ताज्या असतानाच सोमवारी श्रमिक विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्या सात प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला आहे. … Read more

काहीही न खाता पिता 75 वर्षे जगलेल्या ‘या’अवलियाचे निधन

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- गुजरातच्या अहमदाबाद येथील प्रल्हाद जानी उर्फ चुंदरीवाले माताजी यांचे मंगळवारी ९० व्या वर्षी निधन झाले. प्रल्हाद जानी यांनी 75 वर्षे काहीच खाल्ले नव्हते किंवा पाणीही पिले नव्हते. विज्ञानासाठी एक कोडे होते. गेले काही दिवस त्यांची तब्येत बिघडली होती. मंगळवारी गांधीनगरमध्ये त्यांचे निधन झाले. एखादा माणून न खाता पिता, मलमूत्र … Read more

या तीन पायांच्या सरकारचा निषेध – माजी आमदार वैभव पिचड

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- तीन पायांच्या या राज्य सरकारचा कोरोना महामारीच्या संकटात नियोजनशून्य काम केल्यामुळे सर्वच पातळीवर ते अयशस्वी ठरले. राज्यातील आदिवासी खावटी वाटपात दुजाभाव केल्याने आज ग्रामीण आदिवासी, शेतकरी, शेतमजूर जनतेला उपासमारी सारख्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. भाजपच्यावतीने आम्ही काळे मास्क व काळे झेंडे दाखवून या तीन पायांच्या सरकारचा निषेध करत … Read more

लग्नाची परवानगी मागताना खोटी माहिती दिल्याने त्या परिवारासोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- मुलीच्या लग्नासाठी महसूल खात्याकडून परवानगी काढताना वर पक्ष कोपरगावातील असल्याचे खोटे सांगितले. मुर्शतपूर येथे मंगळवारी लग्नाच्या ठिकाणी छापा टाकला असता वऱ्हाड मुंबईहून आल्याचे समजताच वधू-वरांसह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीचे वडील उत्तम नबाजी भालेराव यांनी खोटी माहिती देऊन लग्नाची परवानगी मिळवली. लग्नस्थळी अनेकांच्या तोंडाला मास्कही नव्हते.परवानगी काढताना … Read more

गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील सुरेखा संजय वाघचौरे (वय ५०) या महिलेने मंगळवारी सकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय वाघचौरे हे आपल्या मुलासह सलूनमध्ये नेहमीप्रमाणे काम करत होते. पत्नी सुरेखा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पती संजय यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास … Read more

कोरोना रुग्ण सापडल्याने श्रीगोंदा तालुक्यातील हा भाग सील

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- पुणे जिल्ह्यातील कोरोना संक्रमित भागातून श्रीगोंदे फॅक्टरी परिसरात परतलेल्या व्यक्तीचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगोंदे स्टेशन गेट ते ढोकराई फाट्यापर्यंतचा परिसर सोमवारी मध्यरात्रीपासून प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आला, अशी माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली. २२ मे रोजी ही व्यक्ती गावी आल्यावर तिला श्वसनाचा त्रास जाणवत … Read more

ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा

मुंबई, दि २६ : ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाच्या पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणावर करुन येत्या शैक्षणिक वर्षातील शिक्षणास सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, सर्वांना शिक्षण ही संकल्पना घेऊन आता आपण पुढे जाऊ. संपूर्ण साक्षरतेचा विचार करू. शिक्षणासाठी मोबाईल … Read more

आतापर्यंत ३ लाख ८३ हजार ३८३ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

मुंबई, दि. २६ : 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. 15 मे 2020 ते 26 मे 2020 या काळात 3  लाख 83 हजार 383 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली.  आज दिवसभरात 51 हजार 728 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 28 हजार 566 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य … Read more

मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची बातमी खोडसाळ

मुंबई, दि.२६ :  मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवार पासून १० दिवसांसाठी पूर्णत: लष्कराच्या लॉकडाऊनमध्ये असणार अशी सावध करणारी एक बातमी सध्या व्हॉटसएप ग्रुप्समध्ये फिरते आहे. यात महाराष्ट्र सरकारची एक बैठक सध्या सुरु असून कोणत्याही क्षणी पूर्णपणे बंदचा निर्णय घेतला जाईल असे या पोस्टमध्ये म्हणले आहे. सदरहू पोस्ट पूर्णपणे खोडसाळ असून अफवा पसरविण्याच्या उद्देशाने ती टाकली आहे असे … Read more

राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुग्णांवर उपचार सुरु

मुंबई, दि.२६ : राज्यात आज कोरोनाच्या 2091 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 36 हजार 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज 1168 रुग्ण बरे होवून घरी गेले असून आतापर्यंत 16 हजार 954 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आत्तापर्यंतच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 54 हजार 758 एवढी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज … Read more