कोरोना उपाययोजनांसाठी ग्राम निधीतून खर्च करावा – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 20 – जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या गावातील व्यक्तीसाठी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येते त्यासाठी खर्च करण्यात येणार निधी ग्रामपंचायतींनी ग्राम निधीमधून करावा, ग्रामपंचयतींना हा निधी खर्च करताना अडचण निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून तसे आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.   कणकवली तहसिलदार कार्यालयामध्ये सरपंच आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याच्या … Read more

ठाणे जिल्ह्यात सेंद्रिय शेतीस प्राधान्य द्यावे – कृषिमंत्री दादाजी भुसे

ठाणे  दि. 20- कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रत्येक क्षेत्रात गरज लक्षात घेऊन बदल करणे आवश्यक आहे. ठाणे  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  पारंपरिक शेतीबरोबरच सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यात यावे व त्यासाठी प्रवृत्त करावे  अशी  सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात … Read more

७ लाख ६७ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख रुपये जमा

मुंबई, दि.२०: कोविड – १९ या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी रू.२०००/- एवढे अर्थसहाय्यत्यांच्या बँक खात्यात थेट DBT पध्दतीने जमा करण्याचा निर्णयराज्य शासनाने घेतला होता. यानुसार ७ लाख ६७ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख अर्थसहाय्य जमा झाल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिली. राज्य शासनाच्या निर्णयानुसार दि. २० … Read more

कोविड संदर्भात उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई दि.२०- कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने उत्तमोत्तम आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न शासन करत आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज झूम ॲपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत असलेल्या खाजगी दवाखान्यातील ८०% बेड नव्वद दिवसासाठी ताब्यात घेतले असून त्याचा कोविड, नॉन … Read more

घनकचरामुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

नवी दिल्ली, 20 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशातील 141 शहरांना तारांकित मानांकन मिळाले असून एकट्या महाराष्ट्रातील 76 शहरांचा यात समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला पंचतारांकित तर 34 शहरांना तीन आणि 41 शहरांना एक तारांकित शहराचा बहुमान मिळाला आहे. केंद्र शासनाच्या नागरी विकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मूलन मंत्रालयाकडून देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत … Read more

राजभवन येथील कोरोनाविषयक बैठकीस मुख्यमंत्र्यांच्या वतीने मुख्य सचिव उपस्थित

मुंबई दि २०: कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी राजभवन येथे आयोजित बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. या बैठकीत यावेळी मुंबई मनपा आयुक्त आय एस चहल तसेच अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीताराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर व प्रदीप व्यास, पोलीस … Read more

शेतकरी पुन्हा संकटात … कांद्याचे दर घसरले !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  राहुरी बाजार समितीत एक नंबर कांद्याला ५०० ते ६५० रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत मंगळवारी दुपारी झालेल्या लिलावात कांदा बाजारभाव क्विंटल मागे ७५ रुपयांनी घसरले. दोन नंबर कांद्याला २९० ते ४९५ रुपये, तीन नंबर कांद्याला १०० ते २८५ रुपये, तर गोल्टी कांद्याला २०० ते ४०० रुपये क्विंटलचा मातीमोल … Read more

कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना राज्य सरकार निष्क्रीय

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करून करोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन सुरू आहे. राज्यातील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे. या राज्यव्यापी आंदोलनात भाजपाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकारी, तहसिलदारांना यांना निवेदन देण्याची मोहीम राबविण्यात … Read more

पारनेर मध्ये जिवंत बॉम्ब आढळला !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी काळकूप परिसरात जिवंत बॉम्ब आढळून आला. स्थानिक महसूल व पोलिस प्रशासनाने पाहणी केल्यानंतर सायंकाळी नगरच्या लष्करी तुकडीने घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास डॉ. संजय बांडे व त्यांच्या पत्नी वर्षा बांडे हे डोंगरावरून परतत असताना जमिनीमध्ये अर्धवट … Read more

वाहनचालकांना अडवून लुटमार करणारी गुन्हेगारांची टोळी गजाआड

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-वाहनचालकांना अडवून लुटमार करणारी गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली. आरोपींनी शिर्डीजवळील रांजणगाव देशमुख येथे महिंद्रा पिकअपचालकाला अडवून लुटमार केली होती. उमेश तान्हाजी वायदंडे (गणेशनगर), आकाश दीपक गायकवाड (लक्ष्मीनगर, शिर्डी), संदीप दिलीप रजपूत (बाभळेश्वर) व आणखी एक अल्पवयीन अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी साकीर जाकिर इनामदार हा सोनू नजीर … Read more

क्रिकेटपट्टू अजिंक्य राहणे यांच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य राहाणे (रा. संगमनेर) यांचे मामा संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील शेतकरी राजेद्रं राधाकृष्ण गायकवाड  यांचे मंगळवार दि. 19 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास विहिरीत पाय घसरुन पडल्याने दुर्दैवी निधन झाले आहे. ही घटना घडल्यामुळे त्यांच्या परिवारासह संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आढळले आणखी दोन कोरोना बाधीत

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ४८ पैकी ४५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल संगमनेर शहरातील रहमत नगर येथील बाधीत व्यक्तीची पत्नी आणि नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील एक रिक्षाचालक यांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील कोरोना बाधीत … Read more

राज्यात आरोग्य सुविधांचा अभाव, महाराष्ट्र शासन पूर्णत: अपयशी ठरले

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटात सर्व राज्यांना मोठया प्रमाणात आर्थिक सहकार्य केले. कर्नाटक, हरियाणा,गुजरात,दिल्ली,केरळ आदी राज्यांनी ज्या प्रमाणाने पॅकेज जाहीर केले, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील कोविडसाठी पॅकेज जाहीर करावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन कोपरगाव शहर व तालुका भाजपच्या वतीने माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना … Read more

कार्यालयांच्या ठिकाणी थुंकल्यास शिक्षेसह आर्थिक दंड !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास शिक्षेसह दंडही ठोठावला जाणार आहे. इतकेच नाही तर सार्वजनिक तसेच कार्यालयांच्या ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय दिशा- निर्देशांचा हवाला देत कार्मिक मंत्रालयाने सर्व विभागांना निर्देशांचे कठोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारच्या सर्व विभागांना … Read more

‘या’ धोरणानुसार श्रीरामपुरातील बाजारपेठ आणि व्यवहार चालू होणार !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  श्रीरामपूरची बाजारपेठ पुन्हा सुरळीत होण्याकरिता आज प्राशकीय कार्यालयात लोकप्रतिनिधींची महत्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानुसार शहरात विशिष्ट दिवशी विशिष्ट रोड खुले करावेत या धोरणानुसार श्रीरामपुरातील व्यवहार चालू होणार असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यावेळी बैठकीस खा.सदाशिवराव लोखंडे,आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रांताधिकारी अनिल पवार, … Read more

महाराष्ट्रातील जनतेला मृत्यूशय्येवर नेणाऱ्या सरकारला आता जाब विचारायची गरज !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- कोविड १९ च्या महामारीवर प्रभावी उपाययोजना आणि प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरल्याने राज्यात आरोग्य अराजक पसरले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा राज्यात वाढत चालला आहे. कोरोनाचा विषाणू अकार्यक्षम, सुस्त सरकारी यंत्रणेला पोखरून काढत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भाजपाचा एक एक कार्यकर्ता दिवसरात्र जनसेवा करत … Read more

धक्कादायक : 14 क्वॉरंटाईन सदस्यांनी ठोकली धूम !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  एकिकडे कोरोनाची लढाई प्रशासन शर्थीने लढत असून, दुसरीकडे मात्र क्वॉरंटाईन केलेल्या दोन कुटूंबातील तब्बल १२ ते १४ सदस्यांनी अक्षरश: धूम ठोकल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात दोन ठिकाणी घडल्या. या दोन्ही घटना मंगळवारी (दि.१९) उघडकीस आल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. तालुक्यातील केंदळ खुर्द येथील क्वॉरंटाईन एक जोडपे दुसऱ्याची मोटारसायकल … Read more

सालई खुर्द येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते कापूस संकलन केंद्राचा शुभारंभ

नागपूर, दि.20 :  निर्मल जिनिंग अँड प्रेसिंग सालई खुर्द कोंढाळी येथे आज महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कापूस संकलन केंद्राचा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शुभारंभाचा वजनकाटा सावळी खुर्द ता. काटोल येथील शेतकरी सुमन गुलाब परबत यांच्या कापसाचा करण्यात आला. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी आमदार गिरीश … Read more