..तर 10 वी व 12 वीचे निकालही लांबण्याची शक्यता

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याकरिता निर्धारित स्थळी पोहोचविण्यासाठी लॉक डाऊन मध्ये सूट मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले असल्याची माहिती शिक्षक … Read more

कोरोनाच्या अदृश्य शत्रूशी लढा देण्यासाठी पोलीसांसह जिल्ह्यातील माजी सैनिक देखील सज्ज !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या अदृश्य शत्रूशी लढा देण्यासाठी पोलीसांच्या खांद्याला खांदा लाऊन उभे राहण्यासाठी माजी सैनिकांनी देखील पुढाकार घेतला आहे. सिमेवर व संकट काळात देश रक्षणाचे कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झालेले जिल्ह्यातील 219 माजी सैनिकांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली. … Read more

बिअर बारमालकाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  औरंगाबादच्या पुंडलिकनगरातील रहिवासी प्रसिध्द बिअर बार मालकाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. पोटाच्या आजारास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलसांनी व्यक्त केला आहे. गारखेडा परिसरातील पुंडलिकनगरमधील शैलेश बिअर बारचे मालक अशोक पांडुरंग जाधव (५९) यांनी रविवारी रात्री परिवारासह जेवण घेतले. त्यानंतर त्यांनी रात्री दोनच्या सुमारास … Read more

आता पोल्ट्री व्यवसायिकांना सुगीचे दिवस येणार ! 

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- चिकन तसेच अंड्डयांना मागणी वाढत चालली आहे. सध्या उत्पादन कमी असल्याने हे दर अधिक वाढण्याची शक्­यता आहे. चिकनमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होतो, या गैरसमजाचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला. भीतीपोटी चिकन खाणाऱ्यांची संख्या रोडावली होती परिणामी विक्रेत्यांनी दर कमी करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही केला परंतू तो निष्फळ ठरला. सोशल … Read more

कोरोनाच्या संकटातच या आजाराचा झाला शिरकाव!

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  कोरोनाच्या संकटामुळे देश त्रस्त असताना आसाममध्ये आफ्रिकन स्वाइन फ्लूमुळे जवळपास २५०० डुकरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आसाम राज्यातील सात जिल्ह्यांच्या तब्बल ३०६ गावांमध्ये रविवारपर्यंत इतक्या डुकरांचा मृत्यू झाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे; पण यामुळे मानवाला धोका नसल्याचा दावा करण्यात आला आहे. देशात आफ्रिकन स्वाइन फ्लूचा शिरकाव … Read more

अजानला परवानगी कशी दिली? शिवसेना-भाजपने प्रशासनाला केला सवाल

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  रमजानच्या काळात अजानला परवानगी देण्यात आली. यामुळे कोरोनाच्या संसर्ग वाढू शकतो. काही समाजातील सण घरात साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मशिदीतून अजान करण्यास परवानगी का दिली. मात्र या निर्णयामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, असा नगर शहरातील शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात शिवसेनेचे … Read more

राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी

मुंबई, दि. 5: लॉकडाऊन कालावधीत करण्यात आलेल्या वाढीच्या अनुषंगाने राज्य शासनाने राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र (एमएमआर), मालेगाव महानगरपालिका, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयातील उपस्थिती 5 टक्क्यांपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 22 एप्रिल 2020 च्या शासन निर्णयानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र (एमएमआर) … Read more

धक्कादायक : गुटखा न दिल्याने ‘त्याने’दुकानदारासोबत केले असे काही !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा येथे गुटखा दिला नाही म्हणून चार ते पाच अज्ञात तरुणांच्या टोळक्याने दुकानदारावर चाकूने हल्ला केला. ही घटना काल सोमवार दि.4 मे रोजी सकाळी 12 वाजेच्या दरम्यान घडली. मात्र, सुदैवाने या दुकानदाराने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचविला. हा वाद मिटविण्यासाठी तेथीलच दत्तात्रय धनवटे हा तरुण गेला … Read more

राज्यात कोरोनाचे २४६५ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई, दि.४: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात आज नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आयसीएमआर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात आज  ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी … Read more

धनंजय मुंडेंचे बीड जिल्ह्यासाठी मिशन १००% ग्रीन झोन!

बीड, दि. 4 : बीड जिल्हा केंद्र सरकारच्या निकषानुसार जरी सध्या ‘ऑरेंज झोन’ मध्ये असला तरी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाला बीड जिल्ह्याच्या हद्दीपासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेला मदत करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या 550 होमगार्ड्सच्या पुनर्नियुक्तीचा प्रश्न श्री. मुंडे यांनी … Read more

अहमदनगरमध्ये वाईन शॉपसमोर लागल्‍या रांगा!

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात वाईन शॉप आणि बिअर शॉप सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर तळीरामांनी दुकाने सुरू होण्याआधीच दुकानांसमोर गर्दी केली आहे. नगरमध्ये विविध दुकानांसमोर आधीच रांगा लागलेल्या आहेत. विशिष्ट अंतर सोडून अनेकांनी दुकानांसमोर गर्दी केली आहे . तसेच अनेकजण आजुबाजुला उभे आहेत. अहमदनगर जिल्ह्यात दारुची दुकाने सुरू करण्यास परवानगी … Read more

लॉकडॉऊनच्या काळातही जनतेला नागरी सेवा उपलब्ध करुन देणार – डॉ.नितीन राऊत

नागपूर, दि.4 :  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात तसेच जिल्हयातही लॉकडाऊन सुरु असून तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. प्रशासनातर्फे विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून जनतेचेही सहकार्य मिळत आहे. या काळात जनतेला अत्यावश्यक सेवेसोबतच नागरी सेवा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली लॉकडाउनच्या तिसऱ्या … Read more

पवार घराण्याला विरोधासाठी राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी ?

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- राम शिंदे मंत्री असताना जिल्ह्यात भाजपचे पारडे जड होते. आता पक्षाचे तीन आमदार आहेत, परंतु राज्यातील सत्ता जाताच जिल्ह्यातील भाजप दिसेनाशी झाली आहे. जिल्ह्यात भाजपला ऊर्जितावस्था आणण्यासाठी व पवार घराण्याला प्रबळ विरोधासाठी राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्यांची जुळवाजुळव सुरू आहे. शिंदे यांच्यासह … Read more

अहमदनगरकरांसाठी गुड न्यूज : ‘या’ भागातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील आणखी नऊ जणांचे अहवाल सोमवारी निगेटिव्ह आले. रविवारी ३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला होता. अजून ११ अहवालांची प्रतीक्षा आहे. जामखेड, नेवासे, संगमनेर आणि पाथर्डी तालुक्यातील रुग्ण सध्या उपचार घेत असून उर्वरित तालुके कोरोनामुक्त आहेत. गेल्या आठवड्यात शनिवार वगळता एकही रुग्ण आढळून आला नाही. शनिवारी … Read more

अनैतिक संबंधात त्रास झाल्याने केली हत्या, नंतर अंत्यसंस्कारातही आला, शेवटी पोलिसांनी तपास लावलाच !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे मुकुंद जयसिंग वाकडे या युवकाच्या निर्घृण खूनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दत्तात्रय अंकुश पठाडे (रा. आढळगाव) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे मयताच्या मोठ्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरुन मयत मुकुंद भावजयीला त्रास देत असल्यामुळे काटा काढल्याची कबुली आरोपीने दिली … Read more

जिल्ह्याबाहेर अडकलेल्या ३ हजार ५५३ नागरिकांना जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी

जळगाव, दि.3 – लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी केंद्र शासनाने अटी शर्तीवर परवानगी  दिली आहे. त्यानुसार आता राज्य शासनानेही अडकलेल्या नागरिकांना बाहेरील राज्यातून, जिल्ह्यातून त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी दिल्याने परराज्य, जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांनी दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तब्बल 3 हजार 553 जणांना जिल्ह्यात येण्याचे परवाने  देण्यात आले आहे. … Read more

नाशिक शहरातील मद्य विक्रीची दुकाने बंदच; आदेशाचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द

नाशिक दि. 4 मे 2020 (जिमाका): सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये मद्य विक्रीस शासनाने परिपत्रकाद्वारे 3 मे 2020 रोजी परवानगी दिली. नाशिक शहर रेड झोनमध्ये असूनही मद्यविक्री दुकाने सुरू करण्यात आली. परंतु बऱ्याच मद्य विक्री दुकानांवर सुरक्षित वावराच्या नियमांना पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलिसांना … Read more

पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर

पुणे, दि.4 : पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्राकरिता प्राधिकृत अधिकारी असणारे पुणे व पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त यांनी दिनांक 3 मे 2020 रोजी रात्री 12 वाजल्यापासून आदेशात नमूद महापालिका क्षेत्र हे हॉटस्पॉट/ कंन्टेटमेंट झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. तसेच कोरोना प्रभावग्रस्त व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 7 तालुके प्रतिबंधित … Read more