कोरोनाविरोधात लढण्यासाठी खा.डॉ. सुजय विखे यांच्याकडून १ कोटी रूपयांचा निधी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी १ कोटी रूपयांचा निधीबरोबरच आपले एक महीन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता कोषात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खा. डाॅ.सुजय विखे यांनी म्हणले आहे की,कोरोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात एकजूटीने लढण्याचं आवाहन पंतप्रधान … Read more

तुमच्या ‘या’ सवयी कोरोनाचा संसर्ग वाढवू शकतात…वेळीच व्हा सावधान !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-जीवघेण्या कोरोना व्हायरसने भारतातही एन्ट्री घेतली असून लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. अशात तज्ज्ञांकडून लोकांना स्वच्छता ठेवण्याचा आणि विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी खूप सारी सावधगिरी आ पण बाळगत असलाे तरी काही सवयी वाईट असतात, त्या वाईट सवयी समजून घेतल्या पाहिजेत. ज्या कोरोनाचा संसर्ग वाढवू शकतात. नखे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मशिदीत २३ जणांना लपवले, गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीरामपूर वॉर्ड नंबर दोनमधील उमर फारूख मशिदीमधून पोलिसांनी बुधवारी २३ नागरिकांना ताब्यात घेतले. या सर्वांना होम क्वारंन्टाइन करण्यात आले आहे. या प्रकरणी तबलीक जमातीचे सचिव अब्दुल रेहमान मोहम्मद शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला. उमर फारुक मशिदीमध्ये अमरावती, पुणे, वर्धा, तसेच उत्तरप्रदेशातील २३ नागरिक थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बुधवारी तपासणी केली … Read more

बांधाचा वाद : सुनेला कुऱ्हाडीने जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नेवासे तालुक्यातील लेकुरवाडी आखाडा येथे मुलाला व सुनेला कुऱ्हाडीने व गजाने मारहाण केल्याप्रकरणी सोपान सुखदेव महारनोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊ नामदेव व वडील सुखदेव यांच्यासह सात जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोपान महारनोर यांनी जबाबात म्हटले आहे, कुटुंबात सामायिक बांधाचा वाद सुरू असून २५ मार्चला धाकटा भाऊ नामदेव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी तिघाना कोरोनाची लागण, रुग्णांचा आकडा पोहोचला 17 वर

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदगर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, गुरुवारी (दि.२) रात्री आलेल्या अहवालांमध्ये आणखी तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील तपासणीचे अहवाल गुरुवारी दिवसभरात प्राप्त झाले. दुपारी सहा रुग्णांना कोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील ‘त्या’ व्यक्तीचा अहवाल आला, वाचा सविस्तर

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  बारामती येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदा तालुक्यातील तीन व्यक्ती आले असल्याची माहिती दि.२९ मार्च रोजी समोर आल्यानंतर त्यांना तपासणीसाठी नगर येथे पाठविल्या नंतर आज दि.२ एप्रिल रोजी त्या तीन जणांचे कोरोना तपासणी अहवाल मिळाले असून तिघेही कोरोना निगेटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली. २० मार्च … Read more

ब्रेकिंग न्यूज : कार पेटवून देत ठाकरे कुटुंबियांना जीव मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशभरात लाॅकडाउन असताना राहाता तालुक्यातील निमगाव कोर्राळे गावातील शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब काळु ठाकरे यांच्या घरासमोर उभी केलेली स्विप्ट डिझायर ही चार चाकी गाडी उभी असताना सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास पेटवून कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला यात गाडीचे मोठे नुकसान झाल्यामुळे निमगाव कोर्राळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे याबाबत … Read more

कोरोना व्हायरस पासून ‘असा’ करा तुमच्या मुलांचा बचाव

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- सध्या जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे,याचा धोका लहान मुलानाही मोठ्या प्रमाणात आहे, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोरोना पासून बचाव होईल अश्या महत्वाच्या टिप्स    मुलांनी हात चांगले धुतले की नाही पाहावे. त्यांना साबण, कोमट पाणी आणि अल्कोहलयुक्त हँड सॅनिटायझरने हात स्वच्छ करायला सांगावे. तोंडाला मास्क लावावा. चांगल्या मास्कचा वापर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : संगमनेर मधील दोघांना कोरोना, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले ‘हे’ आवाहन !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी आणखी ०६ जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या चौदा झाली आहे. आज कोरोना बाधित आढळलेल्या सहा जणांमध्ये दोन परदेशी व्यक्ती असून दोन जण संगमनेर येथील तर आणखी दोन जण मूळचे कोटा (राजस्थान) आणि भोपाळ (मध्य प्रदेश) येथील असून सध्या नगर शहरातील मुकुंदनगर येथे राहात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात 6 नवे कोरोना रुग्ण आढळले !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी आणखी ०६ जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या चौदा झाली आहे. आज कोरोना बाधित आढळलेल्या सहा जणांमध्ये दोन परदेशी व्यक्ती असून दोन जण संगमनेर येथील तर आणखी दोन जण मूळचे कोटा (राजस्थान) आणि भोपाळ (मध्य प्रदेश) येथील असून सध्या नगर शहरातील मुकुंदनगर येथे … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची शक्यता

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना व्हायरसने बुधवारी महाराष्ट्रातील आणखी २ जणांचा बळी घेतला. यामुळे राज्यातील बळींचा आकडा फुगून १२ वर पोहोचला आहे. मागील २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे ३३, तर संपूर्ण देशात ३८६ नवे रुग्ण आढळलेत. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून ३३५ वर पोहोचला असून, देशाचा आकडाही तब्बल १,८७५ वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने झपाट्याने वाढणाऱ्या या … Read more

कोरोना कोपामध्ये आणखी एक चांगली बातमी …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नवी दिल्ली: कोरोना कोपामध्ये आणखी एक चांगली बातमी मिळाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून जागतिक बाजारात खनिज तेलाचा दर विक्रमी निम्न पातळीला घसरल्यामुळे स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरचा दर (१४ किलो) प्रत्येकी ६५ रुपयांनी घटवण्यात आला आहे. सरकारी तेल विपणन कंपनी ‘आयओसी’ने बुधवारी नवे दर जाहीर केले. त्यानुसार १४.२ किलोच्या … Read more

कोरोनाचा असाही परिणाम अहमदनगर – बीड जिल्ह्यातील सीमावाद सुरू !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने नगर जिल्ह्यातील लोकांना येण्यास बंदी करावी या हेतूने वृद्धेश्वरच्या घाटात दगड माती टाकून हा रस्ता काही लोकांनी बंद केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात थैमान घातलेले असताना आता या कोरेमुळे अंतर्गत सीमावाद देखील सुरू झाले आहेत. नगर व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या वृद्धेश्वर घाटच … Read more

मोहटा देवस्थानची ५१ लाखांची मदत !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर मोहटा देवस्थान समितीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे दिला. दहा दिवसांपासून शहरात रामनाथबंग मित्रमंडळाच्या वतीने गोरगरिबांना जीवनाश्यक वस्तू उपक्रम राबवून अनेक भुकेलेल्यांची भूक भागवली. शंकर महाराज मठाचे संस्थापक माधवबाबा, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब राऊत, उद्योजक संदीप काटे, नगरसेविका दिपाली बंग आदींच्या हस्ते उपक्रमाला … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावात चोरट्यांचेच झाले एप्रिल फूल !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सर्वत्र संचारबंदी असतानाही मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास कुकाण्यात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण नागरिकांच्या जागरूकपणापुढे चोरट्यांच्या टोळीला पळ काढावा लागल्याने नागरिकांच्या प्रसंगावधानपणाने चोरट्यांचे एप्रिल फुल झाले. मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास वंदेमातरम नगरात चोरटयाच्या टोळीने प्रवेश केला त्याच वेळी या नगरतील कुत्रे जोराने भुंकत असल्याने नागरिकंाना संशय आला. … Read more

प्रेयसी व तिच्या वडिलांवर इम्प्रेशन मारण्यासाठी तो झाला बीएसएफ जवान आणि अडकला पोलिसांच्या ‘जाळ्यात’

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- दिल्ली पोलिसांनी बदरपूर भागात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तोतया असिस्टंट कमांडंटला अटक केली आहे. हा आरोपी स्पर्धात्मक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेला होता. यामुळे त्याने प्रेयसी व तिच्या वडिलांवर इम्प्रेशन मारण्यासाठी बीएसएफचा गणवेश घालून तो फिरत होता. साऊथ ईस्टचे पोलिस उपायुक्त आर. एस. मीणा यांनी सांगितले, २७ मार्च रोजी पोलिस गस्तीवर असताना रात्री ९ … Read more

जाणून घ्या उपवास केल्याने होणार फायदे आणि कोणी उपवास करू नयेत ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नियमित उपवास केल्याने शरीरातील चरबी १० टक्क्यांनी कमी होते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. हृदयाच्या आजारापासून बचाव होतो. रोग प्रतिकारक क्षमता वाढते. म्हणजे अनेक प्रकारचे व्हायरस व संसर्ग जंतूपासून आपला बचाव हाेतो. इन्सुलिनचा स्राव नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. नियमित उपवास केल्याने ताजेतवाने वाटते. उपवास कोणी करू नये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पतीनेच केली पत्नीची हत्या,नंतर सांगितले ‘हे’ कारण

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अकोले तालुक्यातील चैतन्यपूर येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या मृत्यूनंतर सासरच्या लोकांनी बनाव तयार करून मृत विवाहिता ही गोठ्यात गाईचे दूध काढण्यासाठी गेली असता गाईने लाथ मारल्यानंतर ती दगडावर जाऊन आदळली व त्यातच तीचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. सविता भगवान हुलवळे असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेचे … Read more