अल्पवयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

श्रीरामपूर :श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर येथील करण शिवनाथ शेळके या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना काल रात्री नऊच्या सुमारास घडली .घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक संजय दुधाळ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. आत्महत्याच कारण आजून समजू शकले नाही. पोलीस पुढील … Read more

आप चा हा विद्यमान आमदार आप सोडून गेला राष्ट्रवादी कडे आणि मिळाली इतकी मते 

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 चा निकाल जवळपास आला आहे. यात आम आदमी पक्षाने 63 जागांवर आघाडी घेत तिसऱ्यांदा दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकली. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या दिमाखदार विजयानंतर अरविंद केजरीवाल राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘आम आदमी पक्षा’चा राजीनामा देऊन राष्ट्रवादीच्या … Read more

दिल्ली निवडणुकीत उतरलेल्या राष्ट्रवादीच्या त्या उमेदवारांच काय झाल ?

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 63 जागांवर आघाडी मिळवत भाजपला जोरदार धक्का दिला आहे, तर काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. दिल्ली निवडणुकांच्या रिंगणात राष्ट्रवादीचे पाच उमेदवारही उतरले होते, त्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. दिल्ली कँटॉन्मेंट – वीरेंद्रसिंह कडियान (आप)  26 हजार, तर मनिष सिंह  (भाजप)  17 हजार मतं सुरेंद्र सिंह 854 मतं … Read more

स्व. भाऊसाहेब थोरातांच्या दूरदृष्टीमुळे संगमनेरचे नाव देश पातळीवर- पोपटराव पवार

संगमनेर : सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांची दूरदृष्टी, व्हिजन व सामाजिक कार्य या त्रिसूत्रीमुळेच संगमनेरचे नाव आज खऱ्या अर्थाने देश पातळीवर पोहचले, असे प्रतिपादन हिवरेबाजारचे आदर्श सरपंच व पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जाणता राजा मैदानावर कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार लहू … Read more

अहमदनगर बाजार समिती बाजारभाव 11 फेब्रुवारी 2020

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव: पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो २०० -६००, वांगी ५०० – २०००, फ्लावर ५०० – १०००, कोबी २०० – ३००, काकडी ५०० – १०००, गवार ६००० – ८०००, घोसाळे १२०० – १५००, दोडका १००० – २०००, कारले १००० – २५००, भेंडी १००० – २५००, वाल ५०० – १०००, घेवडा … Read more

आमच्या कामांचे श्रेय विरोधकांनी लाटू नये : आ. राजळे

भाजपा सरकार सत्तेवर असताना शेवगाव – पाथर्डी तालुक्यात भरीव निधी आणून मागील पाच वर्षांत विकासकामे मार्गी लावली. विकासकांमात कधीही राजकारण न करता कामे करण्यावर भर दिला. मात्र, आम्ही मंजूर केलेल्या कामांचे श्रेय सरकार सत्तेवर आले म्हणुन विरोधकांनी श्रेय लाटू नये. भाविष्यातील सत्तेतील शासनाची वाटचाल पाहता विकासकामे करून घेण्यासाठी आंदोलने करावी लागतील, असे प्रतिपादन आ. मोनिकाताई … Read more

नगर-पुणे रोडवर शिवनेरी बसच्या धडकेत दोघे जखमी

अहमदनगर : नगर-पुणे रोडवरील चास शिवारात शिवनेरी बसने मोटारसायकलला धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात ललिता विनोद पवार व विनोद विश्वनाथ पवार (रा. कारंजी अकोला) हे दोघे जखमी झाले आहेत. ही घटना ८ फेब्रुवारीला घडून ९ फेब्रुवारी रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ललिता विनोद पवार यांनी फिर्याद दाखल केली. पवार हे मोटारसायकलवरुन … Read more

वणव्यामुळे होरपळणाऱ्या ऑस्ट्रेलियावर वरुणराजाची कृपा

सिडनी : गत काही महिन्यांत वणव्यामुळे होरपळणाऱ्या ऑस्ट्रेलियावर वरुणराजाची कृपा झाली असून, सततच्या पावसाने अनेक भागांत वणवा नियंत्रणात आला आहे. सिडनी शहरात ३० वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे दुष्काळग्रस्त पूर्व भागालाही मोठा दिलासा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियात वणव्यामुळे धुमसत असलेली भीषण आग मुसळधार पावसामुळे काही दिवसांमध्ये आटोक्यात येणार असल्याचा दावा सोमवारी स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आला … Read more

शिवीगाळ केल्याच्या वादातून एकास मारहाण

अहमदनगर : शिवीगाळ का केली म्हणून विचारणा केली असता एकास बेदम मारहाण करण्यात आली. एमआयडीसीतील सूरज दाळमील येथे ९ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. सुधीरकुमार इश्वर पासवाल (हल्ली रा. एमआयडीसी) यांनी फिर्याद दाखल केली. छोटेलाल माझी, सूरज माझी, भागिरथ माझी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मागील भांडणाच्या कारणावरुन या तिघांनी फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. … Read more

‘आरएसएस’चे नेते दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर!

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्रासह विविध राज्यांतील नेते व कार्यालये जागतिक दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर असल्याची माहिती गुप्तचर संस्थेच्या हाती लागली आहे. दहशतवादी या हल्ल्यासाठी आयईडी (इम्प्रुवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) ने भरलेल्या वाहनांचा वापर करण्याची शक्यता असल्याचा इशाराही यंत्रणेने दिला आहे. या इशाऱ्यासोबतच संबंधित राज्यांना सुरक्षा बंदोबस्त वाढविण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे समजते. दहशतवाद्यांनी महाराष्ट्र, पंजाब … Read more

घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर : माझ्या मोकळ्या जागेत असलेले पत्रे काढून घे असे म्हणल्याचा राग येवून चौघांनी एकास घरात घुसून मारहाण केली. यात सोमनाथ वाघमारे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी चौघांविरूध्द कर्जत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सव्सितर असे की, फिर्यादी वाघमारे यांनी किरण वाघमारे यास माझ्या मोकळ्या जागेत टाकलेले पत्रे काढून टाका असे … Read more

‘त्या’ अल्पवयीन मुलीसह कुटुंबीयांवर गुन्हे दाखल

नवी मुंबई : पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी अपहरण व पाठलाग केल्याचा बनाव रचणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी ऑनड्युटी असलेल्या मोरे यांच्या सरकारी गाडीवरील चालकाला धक्काबुक्की करून त्यांना धमकावल्याचा प्रकार डिसेंबर महिन्यात घडला होता. मोरे यांच्या चालकाने दीड महिन्यांनंतर या घटेनची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार खारघर पोलिसांनी मुलीसह तिचे आई-वडिल, … Read more

अजित पवारांनी घेतला अवैध दारूची खबर देणाऱ्याच्या बक्षीस रकमेत वाढ करण्याचा निर्णय

मुंबई : अवैध आणि बेकायदेशीर दारूच्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी खबऱ्यांचे जाळे भक्कम करण्यासाठी त्यांच्या बक्षीस रकमेत ५ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढ करावी. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयीन इमारती बांधताना यापुढे ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेचा आधार घेण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध कार्यालयांच्या बांधकामासंदर्भात सोमवारी मंत्रालयात सादरीकरण करण्यात … Read more

प्लास्टिकचा कचरा द्या आणि मोफत चहा, स्नॅक्स मिळवा !

वडोदरा : गुजरातच्या डोडा जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात मोफत चहा व स्नॅक्स देणारा कॅफे सुरू करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत डोडा तहसीलमध्ये सुरू केलेला हा राज्यातील पहिला कॅफे असल्याची माहिती सोमवारी एका अधिकाऱ्याने दिली. आदिवासीबहुल डोडा जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने दोन दिवसांपूर्वी तहसील कार्यालयाच्या समोर हा प्लास्टिक कॅफे सुरू करण्यात आला आहे. … Read more

देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, अडाणी डॉक्टर उपचार करत असल्याने परिस्थिती सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही, असा घणाघात करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. आत्ममग्न असलेले हे सरकार इतर कोणाचाही सल्ला घेण्यास तयार नसल्याचेही ते म्हणाले. राज्यसभेत सोमवारी अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात करताना चिदंबरम यांनी … Read more

शिर्डी विमानतळामुळे भाविकांना मोठा मनस्ताप सहन करण्याची वेळ 

शिर्डी : देश व विदेशातील साईभक्तांच्या सोयीसाठी शिर्डी येथे राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने उभारलेल्या साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँडिंग आणि टेकऑपसाठी उच्चत्तम दर्जाची यंत्रणाच अद्याप बसविण्यात आलेली नसल्याने दृष्यमानतेची (व्हीजीबीलिटी) अडचणींचा सामना विमानांना करावा लागत आहे. धुके अथवा खराब वातावरणाने विमान कंपन्यांना अचानकपणे विमानांचे लँडिंग दुसरीकडे करावे लागत असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्याने विमान … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनो व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नये

अहमदनगर :- जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनो विषाणूसंसर्गाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाढे यांच्याकडून कोरोना विषाणू संसर्गासंदर्भातील जिल्ह्यातील वस्तुस्थिती जाणून घेतली. जिल्हा रुग्णालयात दि.६ फेब्रुवारी रोजी दाखल … Read more

‘असे’ झाले त्या आरोपींचे कट रचून पलायन !

कर्जत : कर्जत पोलिसांच्या ताब्यातील पाच आरोपी काल पळून गेल्यानंतर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस महानिरिक्षक छोरिंग दोरजे यांनी आज येथे भेट देऊन पाहणी केली. आज एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते. येथील उपकारागृहातून. दि ९ फेब्रु. रोजी पाच आरोपींनी छतावरून पलायन केले. याबाबत आज या बराकीतील वस्तुस्थिती पाहिली असता, बराकीत प्लायवूडचे … Read more