मोठा अनर्थ टळला… शाळेच्या इमारतीची भिंत कोसळली !

पारनेर: तालुक्‍यातील आदर्श गावाकडे वाटचाल करत असलेल्या भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पश्‍चिम दिशेकडील इमारतीची भिंत काल  दुपारी तीनच्या सुमारास कोसळली. सुदैवाने रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे विद्यार्थी शाळेत नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत तसेच नवीन खोल्यांच्या मागणीचे प्रस्ताव वेळोवेळी प्रशासनाकडे दाखल करुनही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे, … Read more

निलेश लंके महाराष्ट्रात एक नवीन इतिहास तयार करतील… शरद पवारांकडून आ.लंकेंचे कौतुक !

पारनेर – के.के. रेंज प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी तब्बल पाचशे पारनेरकरांना दिल्लीत नेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहा जनपथ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून साकडे घातले. केंद्र सरकारला यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडू असे आश्‍वासन यावेळी पवार यांनी दिले. पारनेर नगर तालुक्‍यातील पाण्याचा प्रश्‍न गंभीर असून येत्या काही दिवसात … Read more

डॉ. निलेश शेळके नेमका कोठे लपून बसला ?

अहमदनगर :– शहर बॅंकेच्या बोगस कर्जप्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. निलेश शेळके याचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर तो फरार झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखासह स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके फरारी शेळकेच्या शोधातासाठी कार्यरत आहे. परंतू, शेळके हा पोलिसांना चकवा देत असून, तो पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसही हतबल झाले आहे. एम्स हॉस्पिटलची उभारणी करताना डॉ. निलेश शेळके … Read more

महसूलमंत्र्यांच्या मतदारसंघात वाळूतस्करांकडून दिवसाढवळ्या वाळू उपसा

संगमनेर: तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माती मिश्रित वाळू परवानाच्या नावाखाली साकुर येथील वाळू तस्करांनी पारनेर तालुक्‍यातील देसवडे येथील वाडेकर वस्तीजवळ असणाऱ्या पात्रात जेसीबी पोकलेनच्या साह्याने रात्रंदिवस वाळू उपसा सुरू केला आहे.त्यामुळे या अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर महसूल विभागाने कारवाई करावी अशी मागणी देसवडेचे सरपंच बाबासाहेब भोर व ग्रामस्थांनी केली आहे. दुसरीकडे यामुळे नदीपात्रात कोणत्याही … Read more

जिल्ह्यातील या 35 गावांना होतोय दूषित पाणीपुरवठा

अहमदनगर : जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांतील पाण्याचे 1305 नमुने तपासण्यात आले. त्यांत 35 गावांतील सुमारे 63 नमुने दूषित आढळून आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रयोगशाळा व वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण यांच्यातर्फे मागील महिन्यात पाण्याचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये 63 नमुने दूषित असल्याचा अहवाल आला आहे. दर महिन्याला जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासले जातात. या वर्षात … Read more

‘मी बोलतच नाही तर करूनच दाखवतो’!

जामखेड – महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत 117 कोटी रुपयांच्या जामखेड शहराच्या पाणीपुरवठा योजनेला आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासकीय मान्यता मिळाली.लवकरच या कामाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आ. पवार यांनी दिली. पाणीपुरवठा योजनेला मंजूर झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जामखेड शहरातील महिलांच्या डोक्‍यावर हंडा उतरणार आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून जामखेड तालुक्‍यात … Read more

दोन भैय्यांच्या ‘हट्टा’मुळे झाला महाविकास आघाडीचा पराभव !

अहमदनगर :-  राज्यात महाविकास आघाडी असतांना महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली. त्यामुळे महाविकास आघाडी कुठे कमी पडली याची चौकशी वरिष्ठ करणार का प्रश्न समोर आला आहे. महापालिकेच्या प्रभाग क्र. 6 “अ’ मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या पल्लवी जाधव यांनी शिवसेनेच्या अनिता दळवी यांचा दारून पराभव केला. दोन्ही भैय्यांच्या हट्टापाई महाविकास आघाडीने जागा गमावली असल्याची जोरदार चर्चा शहरात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मुलीवर बलात्कार करून वडिलांना दगडाने ठेचून मारले !

बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून पीडित मुलीच्या वडिलांची सख्या भावानेच नातेवाईकांच्या मदतीने  दगडाने ठेचुन व चाकू कुऱ्हाड अशा हत्यारांनी भोसकुन खून केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील सोनविहिर येथे शुक्रवारी घडली. वृध्देश्वर पुंजाराम काळे (वय ४०) असे मृताचे नाव असून त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन सुरेश पुंजाराम काळे रा.सोनविहीर, विकास फुलसिंग भोसले, रवि फुलसिंग भोसले (दोघे … Read more

हिंगणघाट जळीतकांड पीडितेची झुंज अपयशी

वर्ध्यातील हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला.  पिडितेनं गेल्या ७ दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. हृदयविकाराचा धक्का आल्याने पहाटे 24 वर्षीय पीडितेची प्रकृती खालावली होती, त्यानंतर … Read more

आई,पत्नीला मारहाण करणाऱ्या मुलाचा जन्मदात्या पित्यानेच काढला काटा

दारुच्या नशेत दररोज आई,पत्नीला मारहाण करणाऱ्या मुलाचा जन्मदात्या पित्यानेच काटा काढल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील गुणवरे गावात घडली. मुलगा सुभाष (३८ ) गाढ झोपेत असताना मध्यरात्री मुलाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन वडिलांनी त्याला ठार मारले. या प्रकरणी मुलाचा पिता लक्ष्मण बाळू नाळे याला फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सुभाष हा दारुच्या प्रचंड आहारी गेला … Read more

दहा वर्षांच्या मुलीचा झोका खेळताना मृत्यू

श्रीरामपूर | राहाता तालुक्यातील नांदूर येथील आकांक्षा सोनल आवारे (वय १०) या बालिकेचा झोका खेळताना मृत्यू झाला. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झोका खेळताना बेशुद्ध पडल्याने आकांक्षाला साखर कामगार रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2020/02/08/ahmednagar-breaking-corona-virus-suspected-patient-admits-to-hospital/

व्यापाऱ्याचा खून करणारी टोळी गजाआड

संगमनेरातील व्यापाऱ्याचा खून करणारी व सराफाकडील तीन किलो वजनाचे चांदीचे दागिने लांबवणारी दरोडेखोरांची टोळी गजाआड करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. संगमनेर येथे ५ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली होती. गुन्हे शाखेने गुन्ह्यातील तांत्रिक बाबींचा अभ्यास करून आरोपींना अटक केली. गणेश राजेंद्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चार खतरनाक आरोपी जेल तोडून पसार

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून चार खुणाच्या गुन्ह्यातील जेल तोडून पसार झाले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना रात्री साडेसातच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. दरम्यान फरार आरोपींचा पोलीस तपास करत आहेत. कर्जत पोलीस स्टेशनच्या जेलमधील कस्टडी क्रमांक तीन येथे असलेले चार खुणी आरोपी अक्षय रामदास राऊत, … Read more

ताणतणाव चांगला की वाईट ?

नव्या जीवनशैलीनुसार प्रचंड स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेमुळे तणावाचं साम्राज्य दरक्षणी वाढत आहे. या तणावात फक्त लहान मुलं, शाळा-कॉलेज-एखादा नवीन अभ्यासक्रम शिकणारी मुलं, नोकरदार वर्ग नाही तर गृहिणीही गुरफटल्या आहेत. वाढती प्रलोभनं हेही तणाव वाढण्याचं महत्त्वाचं कारण ठरत आहे. अशा वाढत्या ताणतणावामुळे मन अस्थिर बनतं. समर्थ रामदास स्वामींनी मनाचं वर्णन ‘अचपळ मन माझे। धावरे धाव … Read more

केंद्र आर्थिक व्यवस्थापनात अपयशी – पी. चिदंबरम

हैदराबाद : अर्थव्यवस्थेच्या घसरगुंडीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर कडवट टीका केली आहे. ‘केंद्रातील भाजपप्रणीत रालोआ सरकारने अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन करण्याची आपली योग्यता नसून, याविषयी आपण असाहाय्य बनल्याचे सिद्ध केले आहे,’ असे ते म्हणालेत. ‘मोदी सरकारची अवस्था रुग्णाचा आजार शोधून त्यावर प्रभावी उपचार करण्यात अपयशी ठरलेल्या … Read more

बहुप्रतीक्षित केजीएफ 2 मध्ये रवीना टंडन

अभिनेते यश यांचा बहुचर्चीत आणि बहुप्रतीक्षित केजीएफ 2 म्हणजेच कोलार गोल्ड फिल्डस् या चित्रपटाबाबत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केजीएफ 2 चित्रपटात अभिनेत्री रवीना टंडन महत्वाची भूमिका बजावणार आहे. अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर याबाबत चित्रपटाच्या निर्मिती चमूने ट्विटर द्वारे माहिती दिली. रवीना टंडन यांनी केजीएफ 2 च्या चित्रीकरणासाठी सुरवात केलेली आहे.  अभिनेते संजय दत्त यांच्यानंतर … Read more

राज्य सरकारने फुकटचा धंदा करू नये – अजित पवार

पुणे :- दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दहमहा शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीजपुरवठा करण्याच्या योजनेवर सरकार विचार करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असा फुकटचा धंदा राज्य सरकारने करू नये असा सल्ला त्यांनी पुण्यात दिला. दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शंभर युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांना मोफत वीज … Read more

अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचा धक्कादायक प्रकार वाघोली परिसरात उघड झाला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधमाने लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ तयार केला असून हा प्रकार कोणाला सांगितल्यास तो व्हायरल करण्याची धमकीही पीडितेला दिली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात बाल … Read more