अजित पवार यांच्या निकटवर्तीयाच्या भावाची निर्घृण हत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- खटाव येथील राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे ते भाऊ होते. गावातील शेतातून घरी परतत असताना त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या आनंदराव पाटील यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात … Read more

धक्कादायक: सीएएफच्या जवानांचा एकमेकांवर गोळीबार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/रायपूर :  सशस्त्र दलाच्या तीन जवानांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमध्ये घडला. या गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला असून  दोघे गंभीर जखमी झाले आहेत.  याबद्दल सविस्तर माहिती अशी की, बीजापूरच्या फरेसगड येथील सीएएफच्या छावणीत तीन जवानांनी एकमेकांवर गोळीबार केला. जवान दयाशंकर शुक्ला, रविरंजन आणि मोहम्मद शरीफ यांनी एकमेकांवर गोळीबार केला. गोळीबारात … Read more

अहमदनगर जिल्ह्यात शासकीय आरोग्य संस्थांनी कोरोनाचा घेतला ‘धसका’

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : भारतात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात या आजाराचा फारसा धोका दिसत नसला, तरी आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य विभागांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.  दिवसंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने दक्षता म्हणून जिल्हा रुग्णालयात यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील शिर्डी … Read more

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने आजी आणि नातीचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील ५५ वर्षीय महिलेसह साडेतीन वर्षांची मुलगी ठार झाल्याची घटना नगर-पुणे रोडवरील कामरगाव शिवारातील स्माईल स्टोन जवळ शुक्रवारी (३१ जानेवारी) रात्री आठच्या सुमारास घडली. मधुकर ठोकळ (वय ५८, कामरगाव, ता.नगर) हे त्यांची पत्नी आशा मधुकर ठोकळ व त्यांची नात ईशा अमोल ठोकळ यांच्यासह त्यांच्या दुचाकीवरून नगरकडून … Read more

दिशाहीन अर्थशून्य संकल्प – ना. बाळासाहेब थोरात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थ संकल्प सदर केला. सर्व स्थरावरून  सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत उलट सुलट सूर ऐकायला मिळत आहेत. दिशाहीन अर्थशून्य संकल्प असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.  केंद्र सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसली असून आजचा अर्थसंकल्प म्हणजे दिशाहीन अर्थशून्य संकल्प आहे, अशी … Read more

पुलाच्या बांधकामास धडकून दुचाकीस्वार जागीच ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम: ओढ्यावरील पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामास धडकून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात कुकाणे -तरवडी मार्गावर कुकाणे शिवारात झाला. त्यात राहुल राजू सरोदे (वय २४, तेलकुडगाव, ता. नेवासे) असे मृताचे नाव आहे. सुरू असलेल्या पुलाच्या कामाजवळ कसलाही सूचना फलक, परावर्तीत पट्ट्या नसल्याने ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा राहुल बळी ठरला. संबंधित … Read more

पाणीपट्टीच्या आकारणीत दुप्पट करवाढ ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : नगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नगरकरांना पाणीपुरवठा केला जातो, ही योजना चालवण्यासाठी मनपाला वर्षभरात २४ ते २५ कोटी खर्च येतो. त्यातुलनेत वसुलही अपुराच होत असल्याने योजनेवरील खर्च भागवणे मनपासाठी अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने पाणीपट्टीच्या आकारणीत दुप्पट करवाढ स्थायीकडे सुचवली आहे. मनपाच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात ही वाढ अपेक्षित … Read more

८३ रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : शहरातील प्रमुख ८३ रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. महापालिकेने या रस्त्यांच्या कामाचा विकास आराखडा तयार केला आहे. तो लवकरच शासनाकडे पाठवला जाणार आहे. सुमारे ७०० कोटी रुपयांचा हा आराखडा आहे. टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध होईल, यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. महापालिका … Read more

अडचणीच्या काळात पंकजा मुंडे यांना साथ देऊ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :राजकीय अडीअडचणीच्या काळात आमच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मनापासून साथ देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहू. त्यांनी बहीण मानले आहे. त्यामुळे बहिणीचा तालुका प्रेमात व विश्वासात कधीही अंतर पडू देणार नाही, २०१४ ची निवडणूक मी प्रथमच लढवली. या भागातील मतदारांनी भरभरून मते दिले. मात्र, त्या तुलनेत या भागात विविध … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बैलाचे पैसे न दिल्याने एकाचा खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : विकलेल्या बैलाचे पैसे दिले नाही म्हणून एकाचा दगडाने व काठी डोक्यात घालून खून करण्याचा प्रकार मठपिंप्री, जि.नगर येथे घडला आहे. याबाबत लक्ष्मण बाबुराव घाडगे, वय ५५, धंदा मजुरी, रा. टाकळसीन, ता. आष्टी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. की, प्रशांत उर्फ परसराम पंडित रोकडे व अर्चना प्रशांत रोकडे दोघे रा. मठपिंप्री, … Read more

या सरकारने केलं तरुणांना आवाहन लग्नापूर्वी SEX करू नका !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ब्राझील मध्ये गेल्या काही वर्षात एचआयव्ही एड्सच्या रुग्णांची संख्या वाढल्याने आणि लग्नाआधी गर्भधारणा होण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या घटनांमुळे सरकार हैराण झाल्याने सरकारला एक विचित्र आवाहन करावे लागलेय.  या देशातील तरूणांच्या शारीरिक संबंधाच्या सवयीमुळे सरकार हैराण झालं असून त्यांनी तरूणांना ‘लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवू नका’ असं आवाहन केलंय. … Read more

म्हणून अहमदनगर जिल्हा विभाजन प्रलंबितच राहणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एक नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी सुमारे ७०० ते हजार कोटी रुपये लागतात. नवा जिल्हा निर्मिती करणे सोपे नसते. नवीन जिल्हा बनवण्याची कुठलीच माहिती आमच्याकडे नाही. त्यामुळे कुठलाही जिल्हा होण्याचा प्रश्नच नाही, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हा विभाजनाबाबत स्पष्ट मत मांडल्याने नगर जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांचे विभाजन पुन्हा … Read more

Budget 2020: सामान्य माणसाला समर्पित असा अर्थसंकल्प- आ.विखे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : “सबका साथ सबका विकास”  या घोषणेला अनुसरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सामान्य माणसाला समर्पित झालेला असून, शेती, शिक्षण तसेच  आरोग्य यासाठी अर्थसंकल्पात केलेल्या भरीव आर्थिक तरतूदीतून सामाजिक सुरक्षा देण्याच्या केलेल्या प्रयत्नांचे स्वागतच करायला हवे अशी प्रतिक्रीया माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्प … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- येसगाव ग्रामपंचायत हद्दीत गारदा नदीच्या पुलाजवळ एका अज्ञात इसमास अज्ञात वाहनाने जोराची धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत होऊन तो बेपत्ता झाला असल्याची खबर कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील रुग्णवाहिका चालक अमित साहेबराव खोकले यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. खोकले मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास … Read more

Budget 2020: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) लोकसभेत आर्थिक वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. यात सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी 16 सूत्रीय कार्यक्रम जाहीर केला. मॉर्डन अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅक्टला राज्य सरकारकडून लागू करण्यात येईल. पाणी टंचाई असलेल्या 100 जिल्ह्यांचा … Read more

माजीमंत्री मधुकर पिचड म्हणाले त्या प्रकरणाशी माझा काहीही सबंध नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- राजूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सन २००४ ते २००९ या कालावधीत विविध विकास योजना राबविताना अधिकाऱ्यांनी अपहार केल्याचे उघड झाल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल झाले. याच्याशी आपला काहीही संबंध नाही, असे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी सांगितले. राजूर प्रकल्प कार्यालयातील अपहारप्रकरणी पिचड यांना विचारले असता … Read more

तरुणाने काढली अल्पवयीन मुलीची छेड, मुलीने केली आत्महत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने तिने आत्महत्या केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील वडाळी येथे ३० जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी आजोबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. मृत मुलीच्या आजोबाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची नात ही … Read more

अहमदनगरमध्ये चारा छावणीत गैरव्यवहार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळात राज्य सरकारने सुरू केलेल्या चारा छावणीत जनावरांची संख्या खोटी दाखवून गैरव्यवहार करण्यात आला आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. तक्रारी आलेल्या चारा छावण्यांची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त पातळीवरील समिती गठित करण्यात आली असून, समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री … Read more