बद्रीनाथ महाराजांच्या हस्ते आदर्श अभियंता व आदर्श कर्मचारी पुरस्काराचे वितरण

अहमदनगर : बांधकाम खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी सेवा संस्था, अहमदनगर यांच्यातर्फे आदर्श अभियंता व आदर्श कर्मचारी पूरसाकाराचे मा. बद्रीनाथ महाराज तनपुरे व जंगले महाराज यांच्या हस्ते नुकतेच  दि. १७/०९/२०१९ रोजी सावेडीतील माउली संकुलामध्ये  वितरण करण्यात आले. यावेळी आदर्श अभियंता म्हणून श्री. अंकुश अशोकराव पालवे व श्री श्रीनिवास वर्पे यांचेसह श्री अनिल लाटणे,  श्री. पी. जे. … Read more

शेतकरी महिलेने मागितले इच्छामरण !

नेवासा : खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने मिळावा यासाठी गेली अडीच ते तीन महिने राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, सबंधित मंत्रालय, जिल्हा व तालुका प्रशासनासह संबंधित महावितरण तालुका व जिल्हा कार्यालय यांच्याकडे एकूण आठ वेळा मेल, रजिस्टर्ड पत्रव्यवहार, प्रत्यक्ष कार्यालयात पाठपुरावा, विनंत्या केल्या. मात्र, अद्यापही वीजपुरठा सुरळीत न झाल्याने अखेर हताश होवून नेवासा बुद्रुक येथील प्रयोगशील … Read more

आ. कर्डिलेंनी विधानसभेत पाच वर्षांत फक्त दोन वेळा तोंड उघडले !

राहुरी, नगर व पाथर्डी ही तालुक्याची गावे मतदारसंघात असताना दहा वर्षांत एकही नवीन पाणी योजना कार्यान्वित करता आली नाही. पालिकेच्या सुधारित पाणी योजनेत व मंजुरीत ज्यांचे काडीचेही योगदान नाही, असे नि्क्रिरय आमदार शिवाजी कर्डिले शहरात फलकबाजी करून स्वत:चा सत्कार घडवून आणत आहेत. योजनेचे श्रेय घेण्याचा हास्यास्पद व केविलवाणा आटापिटा करीत आहेत. योजनेविषयी समोरासमोर चर्चा करण्याची … Read more

देशभरात ई-सिगारेटवर बंदी!

दिल्ली : आरोग्यास हानिकारक आहे की नाही याबाबत वाद असलेल्या ई-सिगारेटवर बंदी घालण्याचा निर्णय अखेर केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केला. त्यानुसार देशात ई-सिगारेटचे उत्पादन व विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बुधवरी पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. तसेच धूम्रपानाची समस्या सोडवण्यात ई-सिगारेट अपयशी ठरले असून, शाळकरी मुलांमध्ये त्याचे वेड … Read more

आपण पक्षाला काय दिले, याचा विचार करावा

नागपूर : भारतीय जनता पक्ष हा ‘बायोडाटा’वाला पक्ष नाही. तिकिटासाठी कार्यकर्ता केवळ आपल्या दोन डोळ्यांनी नेत्यांकडे पाहतो. तर कार्यकर्त्यांचा ‘डाटा’ पाहण्यासाठी पक्षात अनेक डोळे असतात, असे सांगत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी समर्पित भावनेने पक्षाचे काम करा, असे आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.बुधवारी भाजपाचा विदर्भ विभागीय विजय संकल्प मेळावा रेशीमबाग येथील … Read more

विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज !

अहमदनगर : विधानसभेची निवडणूक प्रक्रिया अवघ्या एक ते दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. आयोगाकडून निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या दिशानिर्देशात जिल्हा निवडणूकशाखेमार्फत निवडणूक आयोगाच्या आदेश बरहुकूम सतर्कतेने सज्जता करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या बारा मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रियेसाठी तब्बल २८ … Read more

एलईडी टीव्ही होणार स्वस्त !

नवी दिल्ली : देशांतर्गत टीव्ही उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एलईडी टीव्ही उत्पादनात वापरात येणाऱ्या ओपन सेल टीव्ही पॅनेलवरील ५ टक्के आयात शुल्क हटवले आहे. यामुळे ओपन सेल टीव्ही पॅनेल आयातीवर यापुढे कोणतेही आयात शुल्क भरावे लागणार नाही. अर्थमंर्त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा अधिसूचनेच्या माध्यमातून हे शुल्क हटवले आहे.. ओपन सेल टीव्ही पॅनेलचा उपयोग एलईडी आणि … Read more

रोहित पवार मंत्री राम शिंदे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार !

कर्जत – रोहित पवार कर्जत – जामखेड मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्यापासून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवारांचा चांगलाच धसका घेतला आहे. राम शिंदे गेल्या १० वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात सर्वात कमी मताधिक्य मिळाले. त्यामुळे शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.  … Read more

धक्कादायक! राज्यातील तब्बल ३२२ तरुणी करत होत्या दहशतवादी संघटनांना फॉलो

दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी ‘एसटीएस’कडून ठोस पावले उचलली जात आहेत. त्यातूनच गेल्या तीन वर्षांपासून दहशतवादी संघटनांना फॉलो करणाऱ्या किंवा त्यांच्या संपर्कात असलेल्या तरुण-तरुणींना शोधून त्यांचे समुपदेशन केले जात आहे. औरंगाबादसह राज्यातील काही शहरांत दहशतवादी संघटना तरुणांबरोबरच तरुणींनादेखील जाळ्यात ओढून दहशतवादी कृत्य करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. यात इस्लामिक संघटनांसह हिंदुत्ववादी संघटनांचा देखील सहभाग असल्याचे समोर आले आहे. … Read more

कांद्याला मिळाला ‘३९०५’ भाव

नाशिक : गेल्या आठवड्याभरापासून कांदा बाजारभाव वधारला असून, बुधवारी (दि.१८) पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याने ३९०५ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळवून उच्चांक गाठला आहे. कमीत-कमी २ हजार रुपये भाव मिळाला, तर कांद्याने सरासरी ३५०१ रुपये प्रतिक्विंटल भाव गाठल्याने कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.  कांद्याला देशांतर्गत मागणी वाढली असून, पिंपळगाव बाजार समितीत बुधवारी (दि.१८) उन्हाळ कांद्यास जास्तीत … Read more

नगरला बदनाम करणाऱ्यांना जागा दाखवा : आ.जगताप

नगर शहरातील प्रत्येक नागरिकाने शहराबद्दल प्रेमाची भावना दाखविणे गरजेचे आहे. राजकीय स्वार्थासाठी नगर शहराला बदनाम करणाऱ्यांच्या पाठीमागे जावू नका, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन आ.संग्राम जगताप यांनी नगरकरांना केले.. प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक संपत बारस्कर, डॉ.सागर बोरुडे, नगरसेविका दिपाली बारस्कर, मिनाताई चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुर झालेल्या सुमारे ५ कोटी रुपये खर्चाच्या विविध … Read more

मधुकर पिछड यांच्या परिवाराने 1500 कोटीचा भ्रष्टाचार केला !

बीड :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी होमग्राऊंड बीडमध्ये तुफान फटकेबाजी केली.“जे कावळे होते ते गेले. मात्र पवारसाहेब तुमच्यावर प्रेम करणारे मावळे सोबत आहेत. छत्रपती उदयनराजे गेल्यानंतर धक्का बसला. छत्रपती पंताला शरण गेले”, असं म्हणत धनंजय मुंडेंनी उदयनराजेंवर सडकून टीका केली. मधुकर पिछड यांच्या दुसऱ्या पत्नी आदिवासी नाहीत, ज्यांनी बोगस आदिवासीचं प्रमाणपत्र काढून 1500 … Read more

शिंदे साहेब मागील दहा वर्षात किती महीला सक्षमीकरण कार्यक्रम केले ?

कर्जत :- पालकमंत्री राम शिंदे यांच्या तर्फे  “गाठूया शिखर नवे” हा कार्यक्रम बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०१९ रोजी कर्जत तालुक्यातील जिजाऊ मंगल कार्यालय चिलवडी रोड राशिन येथे आयोजित करण्यात आला होता . ऐन विधानसभा निवडणुकांच्या काळातच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने महिला मतदारांना खुश करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचा संदेश मतदारांत गेला,आणि यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांना … Read more

आम्हाला मतदान करा घरे बांधून देतो – खा.सुजय विखेंचे पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य !

अहमदनगर :- विधानसभा निवडणुका जवळ येताच खा.डॉ सुजय विखे चर्चेत रहाण्याच्या प्रयत्नांत दिसत आहेत. वादग्रस्त विधाने करून माध्यमांसह जनतेच लक्ष वेधून घेण्याचे काम ते करताना दिसत आहेत  अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यावरील आक्षेपार्ह विधान त्यानंतर वीस वर्ष मीच दक्षिणेचा खासदार रहाणार असल्याच्या वक्तव्यानंतर उत्तरेचा खासदार ही मीच आहे असे विधान त्यांनी जाहीर कार्यक्रमात केले आहे. याच कार्यक्रमात … Read more

आदिवासींच्या आरोग्यविषयक संशोधना संदर्भात पहिलीच राष्ट्रीय परिषद – ट्रायबेकॉन.

प्रवरानगर :-  प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(अभिमत विद्यापीठ)च्या सेंटर फॉर सोशल मेडिसिन आणि सेंटर फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरुवारपासून दि. १९ ते २१ सप्टेंबर २०१९ या कालावधी मध्ये लोणी येथे ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. आदिवासींच्या संस्कृती व परंपरां संदर्भात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात … Read more

रोडरोमिओंकडून शिक्षकांवर दगडफेक

अहमदनगर :- विद्यार्थिनींची छेडछाड का करता, असे विचारल्याचा राग आल्यामुळे ८ ते १० रोडरोमिओंनी शिक्षकांवरच दगडफेक केली. हा प्रकार बुधवारी दुपारी रेसिडेंशिअल हायस्कूल व कॉलेजच्या परिसरात घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांना पाहून रोडरोमिओंनी पळ काढला. रेसिडेंशिअल शाळेसमोर रस्त्याने ये-जा करणाऱ्या मुलींना काही टारगट मुले छेडछाड करत होते. एक मुलगा यात अग्रभागी … Read more

मुळा नदीत तरूणाचा मृतदेह आढळला

राहुरी :- तालुक्यातील कोंढवड येथे आज सकाळी एका तरूणाचा मृतदेह मुळा नदीपात्रात आढळून आला. शुभम किशोर बनसोडे (वय २०) असे या तरूणाचे नाव आहे. शुभमचे मुळगाव सलाबतपूर (ता. नेवासा) असून तो आई व बहिणीसह मामाच्या घरी कोंढवडला राहत होता. तो राहुरी महाविद्यालयात बी. कॉमच्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होता. आज सकाळी साडेसहा वाजता शुभमचा मृतदेह … Read more

होय आमचं ठरलयं पुन्हा एकदा राम शिंदे !

कर्जत :- कोणाचीही येऊ द्या हवा…. आम्ही हजारो भगिनी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत भावा असे सांगत कर्जत तालुक्यातील हजारो महिलांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना पाठिंबा दर्शवला. बुधवारी गाठूया शिखर नवे……. महिला विकास सोहळा जिजाऊ मंगल कार्यालय,राशिन महिलांच्या भरगच्च उपस्थितीत व दणदणीत प्रतिसादातं संपन्न. त्यावेळी होय आमचं ठरलयं पुन्हा एकदा राम शिंदे अशा घोषणाही … Read more