…तर कोणत्याही पक्षाकडून आपण निवडणूक लढवू – काकडे

निंबेनांदूर : तालुक्यातील नवीन नेतृत्व देण्याची हर्षदा काकडे यांची तयारी आहे. परंतु तुमची साथ हवी असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे प्रमुख ॲड शिवाजीराव काकडे यांनी शहरटाकळी येथे केले. काल शहर टाकळी येथे जनशक्ती विकास आघाडी जनसंपर्क दौरा वेळी दहिगाव गणाची बैठक शहरटाकळी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण गोरे हे होते. यावेळी … Read more

राजा गेलाय पण प्रजा आमच्यासोबतच आहे!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट झाली असून दोघांमध्ये बंद दाराच्या आड चर्चा झाली. या वेळी समीर भुजबळही उपस्थित होते. छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी भुजबळ यांची मनधरणी केल्याचे समजते. मात्र जागावाटपाबाबत आपण शरद पवारांशी चर्चा केल्­याचे … Read more

आ.राजळे यांचा मतदारसंघात विकासकामांचा डोंगर !

शेवगाव :- जलसंधारणसह रस्ते विकास व इतर कामांकरिता आमदार मोनिकाताई राजळे यांनी शासनाच्या विविध योजनेतून विकासकामाला भरीव निधी देण्याचे काम केले. अल्पावधीत शेवगाव पाथर्डी मतदार संघातील विकासाची गती वाढवुन विकास कामाचा डोंगर उभा केला. तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात सर्वाधिक विकास कामे झाल्याने हा संपूर्ण परिसर जात, पात, धर्म भेद विसरून आमदार राजळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा … Read more

आ. कर्डिले यांच्या प्रयत्नांना यश !

करंजी : पाथर्डी व नगर तालुक्यातील चौदा कामांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारी टप्पा दोनसाठी राज्य सरकारकडून शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने करंजीसह चौदा गावांचे भाग्य या नवीन योजनेच्या कामामुळे उजळणार आहे. वांबोरी चारीचे पाणी डोंगराच्या कडेकडेने यावे. अशी अनेक दिवसांची मागणी पाथर्डी व … Read more

कर्जत-जामखेडचा पाणीप्रश्न कायमचा सोडवू : रोहित पवार

कर्जत : राज्यात सर्वात विकसित मतदारसंघ म्हणून कर्जत-जामखेडची वेगळी ओळख निर्माण होईल. या भागातील प्रश्न सोडवायचे आहेत. शिक्षण, रोजगारा बरोबरच सर्वात जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न पुढील काळात कायमचा सोडवला जाईल. असे मत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी व्यक्त केले. दूरगाव (ता.कर्जत)येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुबारक शेख हे होते. प्रास्ताविकात दूरगावचे … Read more

राष्ट्रवादीच्या बांधणीसाठी शरद पवार नगर मुक्कामी

अहमदनगर: नेते, खासदार व आमदार सोडून चालल्यामुळे राजकीय अस्तित्व संकटात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या मंगळवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असून शुक्रवारी (दि.२०) ते नगरला मुक्कामी येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मंगळवार (दि.१७) पासून शरद पवार दौऱ्यावर निघणार … Read more

धोनीच्या यशस्वी नेतृत्वाचे बारा वर्षे पूर्ण

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी भारताचाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. माजी कर्णधाराच्याच नेतृत्वाखाली भारताने आयसीसीच्या पहिल्या ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पाठोपाठ आयसीसी चॅम्पियन्स करंडकही पटकावला. २०११ साली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उत्तुंग षटकार ठोकून धोनीने भारताला आयसीसी एकदिवसीय विश्वचषक मिळवून दिला. आयसीसीचे तिन्ही करंडक जिंकणारा महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेट जगतातील एकमेव … Read more

आदिवासी समाजातील महिलेवर घर बांधून देण्याचे आमिष दाखवून अत्याचार

कोपरगाव : तालुक्यातील शहापूर येथील गरीब आदिवासी समाजातील महिलेवर घर बांधून देण्याचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की ही महिला पतीपासुन दोन लहान मुलांसह विभक्त राहाते. संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील दत्तात्रय बादशहा वाळे (वय ५२) याने तीला ‘तुला एक गुंठा जागा देऊन घर बांधून देतो, तुझ्या लहान … Read more

समाजसेवेचे व्रत हाती घेतलेय राजकारणात मी कधीही येणार नाही -निवृत्ती महाराज इंदोरीकर

संगमनेर : शहरात पोहोचलेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त जाणता राजा मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंचावर मुख्यमंर्त्यांशी हितगुज साधताना प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यामुळे आता महाराज आमदार थोरात यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संगमनेर विधानसभा … Read more

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर ‘एकच वादा… अजितदादा’ च्या नावाने घोषणाबाजी करणार्या कार्यकर्त्यांसोबत पोलिसांनी केले हे कृत्य !

बारामती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील भाषणानंतर काही अंतरावर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी समर्थक युवकांनी ‘एकच वादा–. अजितदादा…’ अशी घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांनी काही युवकांवर सौम्य लाठीमार करत त्यांना ताब्यात घेतले. मुख्यमंर्त्यांच्या महाजनादेश यात्रेचे आगमन बारामती शहरात दुपारी साडेतीन वाजता झाले. या वेळी मुख्यमंर्त्यांच्या सभेपूर्वी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे भाषण झाले. यानंतर … Read more

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार

बारामती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील भाषणानंतर काही अंतरावर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी समर्थक युवकांनी ‘एकच वादा– अजितदादा…’ अशी घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांनी काही युवकांवर सौम्य लाठीमार करत त्यांना ताब्यात घेतले. मुख्यमंर्त्यांच्या महाजनादेश यात्रेचे आगमन बारामती शहरात दुपारी साडेतीन वाजता झाले. या वेळी मुख्यमंर्त्यांच्या सभेपूर्वी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे भाषण झाले. यानंतर … Read more

सुतगिरणीच्या माध्यमातून सुमारे १५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार – पालकमंत्री राम शिंदे

कर्जत : तालुक्यात सुतगिरणी उभारण्यात येणार असून त्यासाठी 100 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सुतगिरणीच्या माध्यमातून सुमारे १५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली. कर्जत तालुक्यातील कुळधरण गणातील रुईगव्हाण येथे झालेल्या बैठकीत ना. शिंदे बोलत होते. ना. शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदार संघात केेलेल्या विकास कामांचा आढावाच सादर केला. ना. … Read more

ह्या कारणामुळे उदयनराजे यांनी केला भाजप प्रवेश !

सातारा – भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर छ. उदयनराजे भोसले यांच्यावर राष्­ट्रवादी काँग्रेसने टीकास्­त्र सोडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनींच्या विक्रीसाठी सरकारकडून परवानगी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी शनिवारी येथे केला. सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव होईल, … Read more

८ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

पारनेर: तालुक्यातील सुपा येथील जि.प. प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या ८ वर्षीय शाळकरी मुलीवर प्रमोद मच्छिंद्र कदम, वय ३८ रा.सुपा याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील नागरिक व महिलांच्या लक्षात ही बाब आल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना दि.१३ रोजी घडली. याबाबत सविस्तर असे की, कदम याने तिसरीत शिकणाऱ्या एका चिमुरडीस येथील न्यू … Read more

२९ हजार गुंतवणूकदारांचे अडीचशे कोटी अडकले!

चंद्रपूर : दामदुप्पटीचे आमिष दाखवून राज्यभरात गुंतवणूकदारांकडून लाखोंच्या रकमा गोळा करून मैत्र कंपनीने हात गुंडाळले आहे. या कंपनीत जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांचे तब्बल अडीचशे कोटी रुपये अडून असून, ही रक्कम ग्राहक, अभिकर्ता यांना परत मिळावी यासाठी अभिकर्ता, गुंतवणूकदार १९ सप्टेंबर रोजी चंद्रपुरात महामोर्चा काढणार आहे. यावेळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानाला घेराव घालणार असल्याची माहिती … Read more

ट्रकवर लावला साडे सहा लाखांचा दंड!

भुवनेश्वर : १ सप्टेंबरपासून देशात नवीन मोटार वाहन कायदा आल्यानंतर मोठमोठ्या रकमांचे चलन फाडले जात असल्याचे वृत्त दररोज देशाच्या कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळत आहे. ओडिसामधील संभलपूर येथे शनिवारी एक नवीन प्रकरण समोर आले असून, वाहतुकीचे नियम तोडल्याच्या कारणावरून नागालँडच्या एका ट्रकमालकाला ६ लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही देशातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे … Read more

पाकिस्तानचा कांदा खरेदी करणार नाही

नवी दिल्ली : देशातील बाजारात कांदा पुरवण्यासाठी पाकिस्तानचा कांदा खरेदी करणार नसल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील बाजारात कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रणासाठी सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारातून दोन हजार टन कांदा खरेदी करण्याची निविदा जारी केली होती. ही निविदा ५ सप्टेंबरला काढण्यात आली असून २४ सप्टेंबरपर्यंत भरली जाऊ शकते. याव्यतिरिक्त सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्यही ८५० डॉलर … Read more

सरकारी नोकरीत ८२ टक्के आरक्षण !

छत्तीसगड :- राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारने नोकरीतील आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून ८२ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, कोर्टाने सरकारला १० दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने चार सप्टेंबर रोजी एक वटहुकूम जारी केला. ‘छत्तीसगड लोकसेवा (अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय आरक्षण) दुरुस्ती वटहुकूम २०१९’नुसार … Read more