महिला रुग्णालय, अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटरसाठी पाठपुरावा: तांबे

संगमनेर : शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर संगमनेरकरांच्या निरोगी आरोग्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे. महिलांसाठी कॉटेज हॉस्पिटलच्या जागेत महिला रुग्णालय आणि अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर प्रस्तावित असून त्यासाठी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासमवेत बैठका झाल्याची माहिती नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी दिली. शहरातील महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय असावे, यासाठी नगरपरिषदने २०१०, २०१३ आणि २०१७ मध्ये शासनाकडे प्रस्ताव … Read more

विघ्नसंतोषींनी सीना सुशोभीकरणाचे काम बंद पाडले : संग्राम जगताप

नगर : शहरातील विद्युत पोलवरील तारा जमिनीअंतर्गत टाकून घेण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. महापौर झालो तेव्हा सीना नदीच्या सुशोभीकरणासाठी तीन कोटी रुपयांचा निधी आणला. या कामाला प्रत्यक्षात सुरुवातही झाली होती. परंतु काही विघ्नसंतोषी राजकारण्यांनी अधिकाऱ्यांना दमबाजी करून हे काम बंद पाडले. नंतर याच लोकांनी आमदार झाल्यावर सीना नदीच्या याच सुशोभीकरणाच्या कामासाठी विधानसभेमध्ये आवाज … Read more

गोळीबार प्रकरणातील दोन फरार आरोपीना अटक

नेवासे – गावठी कट्ट्यातून गोळीबार करत एकास जीवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेले दोन आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. प्रताप यल्लप्पा फुलमाळी व सचिन ऊर्फ बप्पा साहेबा फुलमाळी (दोघे घोडेगाव) अशी त्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील आरोपी भारत सोपान कापसे (कांगोणी, ता. नेवासे) याला यापूर्वीच गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे. आरोपींनी सचिन … Read more

भाजप नेता म्हणतो श्रावण-भाद्रपद महिन्यात मंदी येते!

पाटणा : देशात आर्थिक मंदीवर राजकीय वर्तुळात चौफेर चर्चा सुरू असतानाच दरवर्षी श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मंदी येतच असते, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सोमवारी केले आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यामुळे विरोधक खोडसाळपणे मंदीच्या मुद्यावरून विनाकारण गोंधळ घालत असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. सकल घरेलू उत्पादन अर्थात जीडीपी खाली घसरला … Read more

निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले?

अहमदनगर – गरज पडली की बारामतीत यायचं. साहेबांचं कौतुक करायचं. सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले? दोन्हीकडून वाजणाऱ्या ढोलासारखं राष्ट्रवादीच्या विरोधकांचं राजकारण सुरू आहे. पण आता बस्स झालं,  असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गळती सुरू … Read more

रात्री उशिरापर्यंत गाणी वाजवल्याने गुन्हा दाखल

नगर : रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात स्पिकरवर गाणी वाजवल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एका मंडळाविरूध्द गुन्हा दाखल केला. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. संजयनगर येथील गणेश मित्र मंडळाच्या गणपती मंडपासमोर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विनापरवाना स्पिकर लावून कर्णकर्कश्य आवाजात गाणी लावली. याप्रकरणी कॉन्स्टेबल तन्वीर शेख यांच्या फिर्यादीवरून देविदास तुकाराम वैराळ (भूषणनगर, केडगाव) व संदीप अरुण सूर्यवंशी (काटवन खंडोबा) … Read more

कांदा @ २७०० रूपये

राहुरी शहर : बाजार समितीच्या वांबोरी उपकेंद्रावर काल कांद्याची चार हजार ९४४ गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतीच्या कांद्यास २७०० रूपये भाव मिळाला. बाजार समितीच्या वांबोरी येथील कांद्यास प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : कांदा नं. १ – २१०० ते २७००, कांदा नं. २ – १५०० ते २०७५, कांदा नं. ३ – ५०० ते १४७५, गोल्टी – … Read more

आ. संग्राम जगतापांच्या प्रवेशाला विरोध

नगर : आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी सोडण्याच्या विचारात असून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुरू असलेली चर्चा अजूनही सुरूच आहे. आ. जगताप हे मात्र त्याचा इन्कार करतात. पण आमदार जगताप जर शिवसेनेत आले तर त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची शक्यता गृहीत धरून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासाठी शिवसैनिक सरसावले आहेत. केडगावातील हत्याकांडात दोघा शिवसैनिकांचे प्राण … Read more

शिवसेनेची उमेदवारी मलाच- लहू कानडे

श्रीरामपूर – श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेची उमेदवारी मलाच मिळेल, असा दावा ज्येष्ठ साहित्यिक व शिवसेनेचे इच्छूक उमेदवार लहु कानडे यांनी व्यक्त केली असून ते म्हणाले की , आमदार कांबळे यांनी जरी शिवसेनेत प्रवेश केला तरी उमेदवारी मलाच मिळेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्यासारख्या निष्ठावंत व जनाधार असलेल्या कार्यकर्त्यावर  अन्याय करणार नाही. सर्वशिवसैनिक व चाहते मतदार … Read more

श्रीरामपूरचा आमदार राधाकृष्ण विखेच ठरविणार!

श्रीरामपूर ;- विखे परिवार व त्यांना मानणाऱ्या संघटनेची ताकद काय आहे, हे आम्ही तीन दिवसात खा. सदाशिव लोखंडे यांना ६५ हजार मतांनी पुन्हा खासदार करून दाखवून दिले. त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी श्रीरामपूरचा आमदार कोणाला करायचे, हे विखे ना. राधाकृष्ण विखेच ठरविणार आहेत, असा सूचक इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. निघोज येथील रेशनकार्ड … Read more

पक्षप्रवेशानंतरही आ. कांबळेंची वाटचाल बिकट !

श्रीरामपूर : आमदार कांबळे यांनी नुकताच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मातोश्रीवरून त्यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. उमेदवारी लादल्यास पदाचा राजीनामा देऊ, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांनी दिला आहे. त्यामुळे आमदार कांबळे यांच्यापुढील समस्या वाढल्या आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषद … Read more

तापसी पन्नूची या बायोपीकसाठी निवड

बॉलीवूडमध्ये सध्या विविध खेळाडूंच्या जीवनावर आधारीत बायोपीकची क्रेझ आहे. महेंद्रसिंग धोनी, कपिलदेव, सायना नेहवाल यांच्या जीवनावरील बायोपीकसोबतच आता महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूच्याही बायोपीकची चर्चा आहे. यापूर्वी एका खेळाडूची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री तापसी पन्नूची या बायोपीकसाठी निवड केल्याचे बोलले जात आहे. भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या जीवनावर चित्रपट येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे, … Read more

माधुरी खऱ्या अर्थाने ‘धकधक गर्ल’ वाटत होती!

मुंबई : माधुरी दीक्षितने बॉलीवूडमधला एक काळ गाजवला. ही ‘धकधक गर्ल’ अनेकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झाली होती. लग्नानंतर माधुरीने थोडा ब्रेक घेतला. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाद्वारे तिने मराठीत पदार्पण केले. माधुरीचे सौंदर्य अजूनही कमी झालेले नाही. तिने स्वत:ला अगदी नीट जपले आहे. मध्यंतरी ती एका रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर दिसली. या वेळी माधुरीने मस्टर्ड येलो आणि पांढऱ्या … Read more

पैसे मागितल्याने टपरी चालकाचा खून

पुणे : बाणेर परिसरातील पानटपरी चालकाने सिगारेटचे पैसे मागितल्याने तिघांनी कोयता व गुप्तीने वार करून एकाचा खून केला. ही घटना बाणेरमधील डी मार्टजवळ रविवारी (दि.१) सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. संतोष नरहरी कदम (वय ३२, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) असे मृत टपरीचालकाचे नाव आहे. याप्रकरणी रामप्रभु मोटे (वय ३९, … Read more

या राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी,१ लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि सहा महिन्यांचा कारावास!

लखनौ : उत्तर प्रदेशात ५० मायक्रॉनपेक्षा पातळ असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर रविवार (१ सप्टेंबर)पासून बंदी लागू झाली आहे. राज्याच्या या आदेशानुसार बंदी असलेल्या पिशव्या खरेदी किंवा विक्री केल्याचे आढळून आल्यास १ लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो, असे राज्य सरकारने जाहीर केलेले आहे. याबाबतच्या माहितीनुसार, राज्याचे मुख्य सचिव अवनिश अवस्थी यांनी २६ ऑगस्ट … Read more

‘यावेळचा’ व्यायाम वाढवतो स्मरणशक्ती !

मेलबर्न : शाळेत शिकविलेला अभ्यास बऱ्याचदा मुले घरी पोहोचताच विसरून जातात. पण आता ही समस्या फक्त थोड्याशा व्यायामाद्वारे दूर केली जाऊ शकेल. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केलेल्या एका ताज्या संशोधनात असे दिसून आले की, नवीन काहीतरी शिकल्यानंतर थोडाफार व्यायाम केल्यास तो अभ्यास मुलांच्या खासकरून मुलीच्या जास्त काळपर्यंत लक्षात राहण्यास मदत होते. या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी २६५ लोकांची निवड … Read more

समुद्री शिंपला कर्करोगाचा धोका कमी करू शकतो

सिडनी : एका समुद्री शिंपल्याच्या प्रजातीमध्ये आढळून येणारा एक घटक कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रभावी असल्याचे एका ताज्या अध्ययनातून समोर आले आहे. या शिंपल्याच्या मोलस्क गं्रथींमध्ये आढळून येणाऱ्या खास प्रकारच्या रसायनावर सुमारे दहा वर्षे सुरू असलेल्या संशोधनानंतर शास्त्रज्ञ या निष्कर्षावर पोहोचले आहेत. त्यांच्या माहितीनुसार, समुद्री शिंपल्यातील हा घटक आतड्याच्या कर्करोगापासून बचाव करण्यात प्रभावी आहे. ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स युनिव्हर्सिटीतील … Read more

प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या

परळी : प्रेम प्रकरणातून शहरातील एका तेवीस वर्षीय तरुणाचा ब्लेडने गळ्यावर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.२) उघडकीस आली. याप्रकरणी दोन अल्पवयीन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. अनिल बसवेश्वर हालगे (२३, रा. गणेशपार, परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. शहर ठाण्याजवळील कब्रस्तानमध्ये त्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सोमवारी … Read more