बैल पोळ्यावर दुष्काळाचे सावट

अहमदनगर : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून पोळा सणाकडे पाहिले जाते. सध्या जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सततच्या दृष्काळामुळे हातात पैसा नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे, तर दुसरीकडे चारा पाण्याची टंचाई असल्याने जिल्ह्यातील लाखभर पशुधनाची दावन अजूनही छावणीतच उभी आहे. दृष्काळाचे भीषण सावट जिल्ह्यातील शिवारावर अणि बैल पोळ्याच्या सणावर पडलेले आहे. . … Read more

तोतयागिरी करणारा पोलिसांकडून गजाआड

श्रीगोंदा : शासकीय अधिकारी असल्याचे भासवून तोतयागिरी करणाऱ्या व बनावट शासकीय ओळखपत्र बनवून त्याचा गैरवापर करणाऱ्या प्रसादकुमार बापूराव जठार, रा. लोणी व्यंकनाथ यास श्रीगोंदे पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याने अनेक ठिकाणी लोकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांना वर्तविली. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रसादकुमार जठार याच्यावर श्रीगोंदा न्यायालयाने पकड वारंट काढले होते. प्रसादकुमार जठार हा आकुर्डी (पुणे) … Read more

कॉलेज परिसरात हाणामारी

अहमदनगर : पाथर्डी येथील एमएम निऱ्हाळी कॉलेज परिसरात २७ ऑगस्टला विद्यार्थ्यांमध्येच राडा झाला. मागील भांडणाचा राग मनात धरून एका विद्याथ्र्यास मारहाण करण्यात आली. तसेच भांडणात मधे पडणाऱ्या शिक्षकालाही शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्गात खळबळ उडाली आहे. . २७ ऑगस्ट रोजी फिर्यादी मुलगा … Read more

आंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये शिक्षकांना ‘अच्छे दिन’

पगार कमी आणि काम जास्त अशी ओरड देशातील शिक्षक करताना दिसून येतात. तुटपुंज्या मानधनावर विद्यादानाबरोबरच निवडणुकीचंही काम शिक्षकांना करावं लागतं; परंतु आता शिक्षकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. बंगळुरूमधील काही खासगी शाळांतील शिक्षकांना ७.५ ते १८ लाख वार्षिक पॅकेज दिलं जात आहे, तर इंटरनॅशनल स्कूलमधील मुख्याध्यापकांना १.५ कोटी रुपयांचे घसघशीत वार्षिक पॅकेज मिळत आहेत. समाजात शिक्षकांकडे … Read more

राज्यातील साखर कामगारांचा पुणे साखर आयुक्त कार्यालयावर धडकला मोर्चा

अहमदनगर – महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील साखर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर बुधवार दि. 28 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला. नगर जिल्ह्यासह राज्यातील 15 हजारपेक्षा जास्त साखर कामगार या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व महासंघाचे सहचिटणीस कॉ.आनंदराव वायकर, प्रतिनिधी मंडळाचे … Read more

अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या वतीने बेवारस तरूणीचे कौटुबिक पुनर्वसन

अहमदनगर (प्रतिनिधी)- मध्यप्रदेश राज्यातील धामणी कटोरा (ता. रानापूर, जि. झाबुआ) येथील एका आदिवासी समाजातील अतिशय गरीब कुटुंबातील तरूणी सुमित्रा रालू अटल भुरिया (अंदाजित वय 26 वर्ष) मानसिक भान हरवून रस्तावरच जीवन जगत होती. कौटुंबिक परिस्थिती अतिशय हालाकीची असल्यामुळे तीला कोणतेही उपचार घेता आले नाही. व सभोवतालचे वातावरण पोषक नसल्याने ऑक्टोबर 2018 ला रस्त्याने फिरत फिरत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात भाजप जिल्हा सरचिटणीस ठार

नेवासा :- औरंगाबादहून अहमदनगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ईरटीगा (क्र. एमएच २१ एएक्स ११०) या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कारने नेवासा फाटा येथील स्टेट बँकेसमोरील दुभाजकाला जोरदार धडक दिली. यानंतर कारने तीन ते चार पलटी खाल्ल्याने गाडीतील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.  अपघात इतका भीषण होता की यात इरटिगा गाडीचा पूर्णपणे चक्काचूर … Read more

#Vidhansabha2019 काय होणार राहुरी मतदार संघात?

राहुरी :- २००९ मध्ये माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचा पराभव करून शिवाजी कर्डिले भाजपकडून विजयी झाले हाेते. या विजयानंतर राहुरीचे राजकीय समीकरण बदलले. यंदाच्या निवडणुकीत भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यापुढे राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांचे कडवे आव्हान आहे. ह्या वेळी शिवाजी कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे यांच्यात सरळसरळ लढत होणार असली तरी ऐनवेळी वंचित आघाडीकडून माजी उपनगराध्यक्ष … Read more

#Vidhansabha2019 काय होणार कोपरगाव मतदार संघात?

कोपरगाव मतदारसंघात प्रत्येक विधानसभेची निवडणूक ही पाण्याच्या प्रश्नावर लढली जाते. यंदाच्या निवडणुकीत आमदार स्नेहलता कोल्हे या मैदानात असतीलच. परंतु प्रमुख विरोधक राष्ट्रवादीचे आशुतोष काळे असले तरी वहाडणेंची भूमिका महत्त्वाची ठरेल. नगराध्यक्ष विजय वहाडणे विधानसभा लढवू शकतात त्यांना शिवसेनेचा छुपा पाठिंबा अपेक्षित आहे.  कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नावर मध्यंतरी भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे, राष्ट्रवादीचे आशुतोष काळे व … Read more

आझाद ठुबे व सहकाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा दाखल

पारनेर :- अपहारप्रकरणी कान्हूर पठारच्या तत्कालीन सरपंच, जि. प. सदस्य उज्ज्वला ठुबे यांचे पती माजी जि. प. सदस्य आझाद प्रभाकर ठुबे, विद्यमान सरपंच अलंकार अहिलाजी काकडे, माजी सरपंच कलम लक्ष्मण शेळके यांच्यासह पाच ग्रामसेवकांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहितार्थ याचिकेत कान्हूर पठार ग्रामपंचायतीमध्ये १९९९ ते २०१२ या कालावधीत स्थानिक लेखापरीक्षणात एकूण … Read more

रोहित पवार यांच्याकडून कर्जत – जामखेड परिसरातील तरुणांसाठी नोकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्या संकल्पनेतून दुष्काळी भागातील कर्जत- जामखेड या तालुक्यांमधील युवक- युवतींसाठी येत्या ३० ऑगस्ट, २०१९ रोजी भव्य सृजन नोकरी मार्गदर्शन व कौशल्य विकास मेळावा होणार असून या मेळाव्यात राज्यातील नामवंत बड्या कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात कंपन्याचे अधिकारी थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करणार आहेत. रोहित पवार हे … Read more

इंग्रजी बोलून जोडप्याने दुकानदारास फसविले

नेवासा  – ऑनलाईन खरेदीत तसेच ऑनलाईन व्यवहारात तसेच मोबाईलवरील व्यवहारात फसवणूक होण्याचे प्रकार आपण पहातो. एटीएम कार्डद्वारेही फसविण्याचे प्रकार घडले आहेत. आता तर नवीनच प्रकार समोर आला असून इंग्रजी फाडफाड बोलून एका दुकानदाराला महिलेने व त्याच्याबरोबरील पुरुषाने ३६ हजार रुपयाला फसविले, ‘टोपी’ घातली. याप्रकरणी नेवासा तालुक्यातील सोनई येथील स्वाती कृषी सेवा केंद्र येथे असलेले दुकानचालक … Read more

राष्ट्रवादीच्या शिवराज्य यात्रेत सोन्याची चैन चोरी

नगर – नगर जिल्ह्यातील जामखेड शहरात बाजारतळ भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवराज्य यात्रा सभेचा कार्यक्रम असताना कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवरुन खाली उतरत असलेले जामखेड येथील व्यापारी सुनील मनसुखलाल कोठारी यांना कोणीतरी धक्का मारला. ते गर्दीत खाली पडल्याने राहुल नावाच्या तरुणाने त्यांना हात देवून उठविण्याचा बहाणा करुन त्यांच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन गळ्यात्न … Read more

भाजपाची ‘स्वबळाची’ तयारी?

उस्मानाबाद : एकीकडे राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात, मात्र दुसरीकडे भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचं समजतं. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्व जागांची चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने २८८ विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेचे आमदार … Read more

भावाला घरासह दिले पेटवून

श्रीगोंदा – तालुक्यातील शेडगाव येथे किरकोळ भांडणातून स्वतः च्या भावाला घरासह पेटवून दिले. या आगीत दाम्पत्य जखमी झाले आहे. बुधवार (दि.२८) सकाळी ही घटना घडली. गोरख भदे, त्यांंची पत्नी सुरेखा भदे ही दोघे जखमी झाले आहेत. दोघांवर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती अशी की, गाेरख भदे यांचे शरद भदे याच्यासोबत भांडण झाले … Read more

आ. कर्डिलेंना आ. राजळेंचे पाठबळ !

नगर दक्षिणेच्या राजकारणात भाजपा अंतर्गत पुन्हा एकदा नव्याने फेर जुळण्याचे प्रयत्न होत असून, आमदार शिवाजीराव कर्डिले व आमदार मोनिकाताई राजळे यांच्याभोवती भाजपचे राजकारण आगामी काळात फिरण्याची चिन्हे आहेत. भाजपासह सत्तेचे प्रमुख शक्तीकेंद्र बनलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच महाजनादेश यात्रेच्यानिमिताने पाथर्डीत आमदार मोनिका राजळे यांनी आ. कर्डिले यांच्या लोकसभा निवडणुकीतील योगदानाबद्दल भरभरून कौतुक केले. या कौतुकामागील … Read more

हातात पैसा नसल्याने शेतकरी हवालदिल !

जिल्ह्यात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सध्या चांगलीच वाढ झालेली आहे. असे जरी असले म्हणावा तसा अद्यापही पाऊस झालेला नाही. मोठा पाऊस झाला नसल्याने विहिरीची पाणी पातळी अजूनही खालावलेली आहे. खरिपाची पिके जोरदार आली होती, मात्र पाण्याअभावी ती सुकू लागली आहेत. त्यामुळे पेरणी केलेला खर्च निघेन की नाही, या चिंतेत शेतकरी आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांची वाताहात झाली आहे. … Read more

कांदा कडाडला @ 2600

कोपरगाव : बाजार समितीत कांद्याने अचानक उचल खाल्ली असून, क्विंटलला तब्बल मागील सात महिन्याच्या कालावधीनंतर अडीच हजाराहून अधिक म्हणजे २५६० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. आवकेत झालेली मोठी घट व परराज्यात कांद्याचा हंगाम संपल्याने बाजारभावाने ही उसळी घेतली आहे.कांद्याच्या दरात झळाळी आली असून, या आठवड्यात कांद्याने अडीच हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील आठवड्याच्या … Read more