आठवडे बाजारात पैसे लांबवणाऱ्या तीन महिलांना चोप !

राहुरी :- आठवडे बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलांचे पैसे चोरणाऱ्या श्रीरामपूर येथील भामट्या महिलांना नागरिकांनी रंगेहात पकडून चोप दिला. फटके बसताच चोरलेले पैसे काढून देत या महिलांनी बाजारातून काढता पाय घेतला. गुरूवारी दुपारी राहुरीच्या आठवडे बाजारात ही घटना घडली. तालुक्याचा बाजार असल्याने भाजीपाला व इतर खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. गर्दीचा फायदा घेऊन ३ भामट्या महिलांनी … Read more

आता ‘या’ नेत्याला लढवायचीय नगर दक्षिण लोकसभा…

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ दोन्ही काँग्रेसच्या दृष्टीने हळूहळू प्रतिष्ठेचा होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. काँग्रेसने डॉ. सुजय विखेंसाठी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे मागितला आहे, पण राष्ट्रवादीने स्पष्ट नकार दिल्याने काँग्रेसला ही जागा सोडण्याची राष्ट्रवादीची इच्छा नसल्याचे दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून लढण्यास इच्छुकांची संख्याही वाढू लागली आहे. सुरुवातीला असलेले आमदार अरुण जगतापांचे … Read more

मुंडे साहेब यांचा अपघात आहे की घात हे सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही.

अहमदनगर :- अमेरिकेच्या हॅकरने ईव्हीएमसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची हत्या झाल्याचा दावा केला. मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या एकाही व्यक्तीने सत्तेला लाथ मारत या घातपाताच्या दाव्याची चौकशी करण्यास सांगितले नाही. आम्ही मात्र हा अपघात आहे की घात हे सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही असा घणाघात करत धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारसह पंकजा मुंडेना धारेवर धरले. … Read more

….अशा नोटिशींना घाबरत नाही – माजी आमदार अनिल राठोड

अहमदनगर :- नगर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा विषय गंभीर झाला आहे. केडगाव शिवसैनिकांच्या हत्याकांडाचा तपास तसेच माझ्या संदर्भात हद्दपारीच्या काढलेल्या नोटीसीचा जाब विचारण्यासाठी लवकरच विधानभवनासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी दिला आहे. राठोड म्हणाले की, दरवेळी शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकारणामध्ये तसेच समाजकारणामध्ये पंचवीस वर्षापासून आमदार तसेच तीन … Read more

बदलती जीवनशैली मधुमेहाला कारणीभूत -मिलिंद सरदार

अहमदनगर :- बदलती जीवनशैली मधुमेह आजाराला कारणीभूत ठरत आहे. मधुमेह हा सायलंट किलर आजार असून, त्या आजाराने शरीरातील सर्व अवयव हळूहळू निकामी होतात. तर मधुमेहाबद्दल असणार्‍या अज्ञानाने हा आजार देशात मोठ्या गतीने वाढत असल्याची भावना नॅचेरोपॅथी तज्ञ मिलिंद सरदार यांनी व्यक्त केली. प्रेमदान चौक येथील माधवबाग कार्डियाक केअर युनिटच्या वतीने मधुमेह निर्मुलनसाठी रावसाहेब पटवर्धन स्मारक … Read more

पेट्रोलियम पाईपलाईन कामासाठी जमीन अधिग्रहणाला शेतकर्‍यांचा विरोध.

अहमदनगर :- दोन ते चार हजार रुपये प्रति गुंठा या कवडीमोल भावाने इंडियन ऑइल पेट्रोलियम पाईपलाईनच्या कामासाठी चालू असलेले जमीन अधिग्रहण तातडीने थांबविण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने केली. जमीन अधिग्रहण कायदा 2013 प्रमाणे जास्तीत जास्त मोबदला मिळण्याबरोबर शेतकर्‍यांना विश्‍वासात घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देऊन … Read more

वांबोरी ते देहरे रस्त्याचे ‘भाग्य’ उजळले!

अहमदनगर :- दोन तालुक्यांना जोडणार्‍या वांबोरी ते देहरे रस्त्याचे ‘भाग्य’ उजळले आहे! वांबोरीतील तरुणांच्या पुढाकाराने श्रमदान करत रस्त्याची डागडुजी करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले असून, त्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचे वास्तव आहे. दरम्यान, या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण मंजूर झाले असून, लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, … Read more

शिर्डी – नाशिक महामार्गावर भीषण अपघात.

कोपरगाव :- साई दर्शन करून घराकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला समोरून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. यात 13 साई भक्त जखमी झाले असून यात 2 पुरुष व 11 महिला यांचा समावेश आहे. हा अपघात शिर्डी नाशिक महामार्गावर खडकी नाला येथील वळणावर झाला. सर्व साई भक्त रत्नागिरी सावंतवाडी येथील आहेत. या सर्वांना उपचारासाठी शिर्डी येथील साई स्पेशालिटी … Read more

मटनात विष कालवून नवऱ्याची हत्या करणाऱ्या बायकोला अटक !

राहाता :- सतत चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नवर्याच्या त्रासाला कंटाळून संतप्त बायकोने जेवनात विष कालवून त्याला मारल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील साकुरी गावात घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,साकुरी गावातील सुनिल बंन्सी बनसोडे व पत्नी मिना सुनिल बनसोडे हे दोघे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र सुनिल नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याचाच राग … Read more

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शहर काँग्रेसतर्फे अभिवादन.

अहमदनगर :- वाडिया पार्क जिल्हा क्रिडा संकुलातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन महात्मा गांधी यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. अहमदनगर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सत्य, अहिंसेचे पुजारी म्हणजे महात्मा गांधी. गांधीजींनी ब्रिटीशांच्या पोलादी ताकदीला अहिंसेने उत्तर दिले. स्वातंत्र्य प्राप्तीत महात्मा गांधीजींचे योगदान म्हणजे ज्या सुर्याने आपल्याला … Read more

सरकारकडून पुन्हा एकदा राज्यातील शेतकर्‍यांवर मोठा अन्याय !

श्रीरामपूर :- केंद्राने महाराष्ट्रासाठी जाहीर केलेली दुष्काळी मदत अत्यंत तोकडी असून भाजप व सेनेच्या सरकारने पुन्हा एकदा राज्यातील शेतकर्‍यांवर मोठा अन्याय केल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय. केंद्र सरकारची दुष्काळी मदत जाहीर झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, मुळातच राज्य सरकारने केंद्राकडे मागितलेली 7 हजार कोटींची मदत अत्यंत … Read more

माजी आमदार अनिल राठोड यांची नगर शहरातून तडीपारी ?

अहमदनगर :- माजी आमदार अनिल राठोड यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. त्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्यासमोर सुनावणी झाली आहे. राठोड यांच्यावर दगडफेक, सरकारी कामात अडथळा आणण्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. राठोड यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात यावे, असा प्रस्ताव पोलिसांने तयार केला आहे. राठोड यांच्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.शहराची शांतता धोक्यात … Read more

…म्हणून झाला आमचा पराभव : माजीमंत्री बबनराव पाचपुते.

श्रीगोंदे :- नगरपालिका निवडणुकीत झालेला भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा पराभव आम्ही स्वीकारला. विरोधकांनी प्रभाग सात व नऊमध्ये अमाप पैसा वापरल्याने आमच्या उमेदवाराचा पराभव झाला. पालिकेत भाजपचे ११ नगरसेवक निवडून आले असल्याने मनमानी कारभार होऊ देणार नाही. गावाच्या विकासासाठी व चांगल्या कामाला सहकार्यच करू, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. … Read more

श्रीगोंदा तालुक्यात ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार.

श्रीगोंदे :- तालुक्यातील अजनुज गावात अकरा वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी राहुल दत्तू रोकडे याच्यावर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दुपारी एकच्या सुमारास ही मुलगी जेवणाच्या सुटीत घरी आली होती. जेवण करून पुन्हा शाळेत जात असताना जुन्या इंग्लिश शाळेजवळ रोकडे ऊर्फ बोंबल्या (२२) याने तिला अडवले. बळजबरीने मोटारसायकलीवरून शाळेच्या आवारात … Read more

‘या’ गावाने घेतला खा. गांधी यांना गावात पाय ठेऊ न देण्याचा निर्णय !

राहुरी :- तालुक्यातील देसवंडी येथील ग्रामसभेत खा. दिलीप गांधी यांनी 15 वर्ष गावाकडे केलेल्या दुर्लक्षित भूमिकेमुळे संताप व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांनी खा. गांधी यांना गावात पाय ठेऊ न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. देसवंडी गावामध्ये सरपंच दीपक खेवरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसेवक व्ही. आर. जगताप यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करीत प्रास्ताविक … Read more

भीषण अपघातात नगर जिल्ह्यातील चार तरुण ठार.

अहमदनगर :- नाशिक महामार्गावर शुक्रवारी ( दि . २५ ) रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील पांगरी शिवारात बाबा ढाब्यासमोरील वळणावर एसटी बस व मारूती आय २० कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील चारही युवक जागीच ठार झाले. अपघतानंतर बसने पेट घेतल्याने तीच्यातील १० ते १२ प्रवासी जखमी झाल्याचे समजते. शिर्डी – … Read more

सरपंचासह ग्रामसेवकाविरूद्ध अपहाराचा गुन्हा.

संगमनेर :- तालुक्याच्या पठार भागावरील सावरगाव घुले येथील सरपंच तान्हाजी मारुती घुले व ग्रामसेवक सुनील शंकर शेळके या दोघांनी संगनमताने शासकीय योजनांचे बनावट बिले, तसेच मजुरांचे खोटे अंगठे घेवून शासकीय रकमेचा अपहार केल्याची घटना सन २०१५ ते २०१७ या कालावधीमध्ये घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, … Read more

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नगरमध्ये गारठा.

अहमदनगर :- गेल्या तीन दिवसांपासून नगरमध्ये किमान तापमान ८ ते ९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जात आहे, तर कमाल तापमान २८ ते ३० च्या दरम्यान आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून नगरमध्ये गारठा चांगलाच जाणवत आहे. हवामान ढगाळ असल्याने सूर्यप्रकाशही कमी पडत असल्याने दिवसभर थंडी जाणवत आहे. आणखी एक-दोन दिवस थंडी राहण्याचा अंदाज … Read more