ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव ; कोपरीत ५ फेब्रुवारी पर्यंत चिकन, मटण विक्रीला बंदी

२३ जानेवारी २०२५ ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून, ठाणे पूर्व येथील कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा १४ जानेवारीला मृत्यू झाला होता.हा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाला आहे.या पार्श्वभूमीवर कोपरी परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून कोंबडी आणि मटण विक्रीला ५ … Read more

अहिल्यानगरच्या पानवाल्याची मुलगी ‘यक नंबर’ चित्रपटात

२३ जानेवारी २०२५ नगर : अहिल्यानगर एमआयडीसी मधील पानाचे दुकान चालवणाऱ्या पंकज आकडकर या सर्वसामान्य व्यवसायिकाची मुलगी कु. श्रिशा पंकज आकडकर ही ११ वर्षीय बालकलाकार २६ जानेवारी रोजी दूरचित्रवाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या येक नंबर या चित्रपटात अभिनयाच्या माध्यमातून झळकली असून सोनी मराठी वाहिनीवरील ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत देखील कु. श्रिशा ने मालिकेच्या विविध भागांमध्ये अभिनय करून … Read more

मंत्री विखे पाटील यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने आज सन्मान

२३ जानेवारी २०२५ राहाता : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानाची पदवी देवून गुरुवारी सन्मानित करण्यात येणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या २६ वा पदवीदान समारंभ गुरुवारी रोजी संपन्न होत असून, राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. … Read more

‘आप’त्तीपासून मुक्त झाल्यास दिल्लीचा विकास – मोदी ; पराभवाच्या भीतीपोटी आपकडून घोषणांचा पाऊस

२३ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या ‘आप’ त्तीपासून मुक्तता मिळाली तरच दिल्ली ही विकसित भारताची राजधानी बनू शकेल,असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला.दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला आतापासूनच पराभवाची चाहूल लागली आहे. त्यामुळे त्यांच्याद्वारे दररोज एका नव्या लोकप्रिय घोषणेचा पाऊस पाडला जात असल्याचा टोला मोदींनी लगावला. दिल्लीला ‘आप’त्तीने संकटात लोटले. … Read more

‘लाडक्या बहिणीं ‘कडून लाभ परत घेण्याचा निर्णय नाही ; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले स्पष्ट

२३ जानेवारी २०२५ मुंबई : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’ तील अपात्र लाभार्थीकडून योजनेचे पैसे परत घेण्यात आलेले नाहीत. तसा कोणताही निर्णय शासनाने घेतला नसल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी विविध विभागांच्या मदतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

४५ हजार शेतकऱ्यांना डिजिटल ओळख ! दोन लाख ५९ हजार शेतकऱ्यांची नोंदणी : २८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीचे उद्दिष्ट

२३ जानेवारी २०२५ चंद्रपूर : शेतकऱ्यांना आधारकार्ड प्रमाणे स्वतंत्र नोंदणी क्रमांक असलेले डिजिटल ओळखपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याअंतर्गत ‘अॅग्रिस्टॅक’ या शेती क्षेत्रासाठी असलेल्या डिजिटल उपक्रमांतर्गत देशातील ११ कोटी शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत ‘फार्मर आयडी’ देण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, आतापर्यंत राज्यातील केवळ ४५ हजार … Read more

भारतीय तोफांची मारक क्षमता ६० किलोमीटरपर्यंत विस्तारणार ! मद्रास आयआयटीने विकसित केले तंत्रज्ञान

२३ जानेवारी २०२५ नाशिक : भारतीय तोफखान्याच्या भात्यातील बोफोर्स, धनुषसह अन्य १५५ मिमी तोफांमधून डागलेले तोफगोळे क्षमतेपेक्षा १५ ते २० किलोमीटर अधिक अंतरावर मारा करू शकतील,असे तंत्रज्ञान मद्रास आयआयटीने विकसित केले आहे. नियमित तोफगोळ्याच्या खालील भागात ‘रॅमजेट’ कवच बसवून तोफांची मारक क्षमता ६० किलोमीटरपर्यंत नेण्याची तयारी केली जात आहे.यासंदर्भातील माहिती देवळाली कॅम्प स्थित तोफखाना स्कूलमध्ये … Read more

नगरमधून दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवले ; अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलिस ठाण्यात पुन्हा २ गुन्हे दाखल

२३ जानेवारी २०२५ नगर : नगर शहरासह जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढतच असून अशाच आणखी दोन घटना नगर शहरात घडल्या आहेत.तारकपूर बसस्थानकातून एका १५ वर्षीय तर केडगावच्या नेप्ती रोड परिसरातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या घटना ताज्या असताना २१ जानेवारीला सकाळी काटवन खंडोबा परिसरातून १६ वर्षीय … Read more

“वाळूच्या गाड्या चालू द्या!” वक्तव्यानंतर मंत्री विखेंची सारवासारव

‘वाळूच्या गाड्या चालू द्या, थोडसं दुर्लक्ष करा. काही फरक पडत नाही. सगळे आपलेच लोक आहेत’, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते. मात्र, त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. तसेच त्यांच्या या विधानानंतर मोठी चर्चा रंगली. विरोधकांनीही टीकेची झोड उठवली. यानंतर अखेर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या … Read more

अजितदादांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना डोस ; वादग्रस्त विधाने टाळा, शासनाच्या धोरणात्मक बाबींवर बोलू नका

२३ जानेवारी २०२५ मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी शासनाच्या कोणत्याही धोरणात्मक बाबींवर बोलू नये, तसेच माध्यमांशी बोलताना काळजी घ्यावी आणि वादग्रस्त विधाने टाळावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी रात्री देवगिरी निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीत दिले. ‘शासनाच्या कुठल्याही योजनेत २-४ टक्के भ्रष्टाचार होतो,’ या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून वादळ उठले आहे. … Read more

मल्टीकॅप, ईएलएसएससह ब्लूचिप योजनांनी दिला अधिक परतावा

२३ जानेवारी २०२५ मुंबई : गेल्या काही दशकांमध्ये भारत कृषीप्रधान अर्थव्यवस्थेपासून सेवा आणि उत्पादन क्षेत्रात जागतिक शक्ती म्हणून विकसित झाला आहे. तरुण लोकसंख्या, जलद शहरीकरण, तांत्रिक प्रगती आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या विकासामुळे हे परिवर्तन घडत आहे. आर्थिक वाढीचा शेअर बाजारावर खोलवर परिणाम झाला आहे. निफ्टी ५० सारखे निर्देशांक सातत्याने नवीन उच्चांक गाठत आहेत, ज्याद्वारे देशाची … Read more

Jalgaon Train Accident : जळगावात भीषण रेल्वे दुर्घटना ! अफवांनी घेतले ११ जणांचे बळी, अनेक गंभीर जखमी

Jalgaon Train Accident : जळगावजवळ रेल्वे मार्गावर एक भयंकर दुर्घटना घडली असून यात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर २० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना तब्बल गोंधळामुळे घडली, जेव्हा पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेने घाबरून अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या, पण त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना … Read more

Central Bank of India Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 266 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Central Bank of India Bharti 2025

Central Bank of India Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “झोन बेस्ड ऑफिसर (Junior Management Grade Scale I)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 266 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 फेब्रुवारी … Read more

बिग ब्रेकिंग ! पोल्ट्री फार्मवर बिबट्याचा हल्ला 300 कोंबड्यांचा मृत्यू, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

राहाता तालुक्यातील चितळी गावात बिबट्याने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. चितळी-दिघी रोडलगत दीपक वाघ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये मंगळवारी (ता. 22) पहाटे बिबट्याने हल्ला केला, ज्यात 300 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दीपक वाघ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे चिंता चितळी परिसरात बिबट्याचा वावर गेल्या अनेक महिन्यांपासून रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरला आहे. … Read more

Ahilyanagar Politics : नेवासा, श्रीगोंद्यातील ईव्हीएम तपासणीसाठी हालचाली सुरू !

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा आणि श्रीगोंदा या मतदारसंघांतील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट तपासणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे, प्रा. राम शिंदे, शंकरराव गडाख, प्रताप ढाकणे, राहुल जगताप आणि राणी लंके यांच्या अर्जांवर काम सुरू आहे. त्यापैकी गडाख आणि जगताप यांच्या मागणीनुसार ईव्हीएम तपासणीसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. मात्र, उर्वरित चार उमेदवार … Read more

संजय राऊतांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 1 लाख रुपये ! अहिल्यानगरमधील हा नेता देणार बक्षिस…

संजय राऊत यांच्या विधानांवरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे संजय राऊत यांच्यावर शिंदे गट आक्रमक झाला असून, त्यांच्यावर जोडे मारो आंदोलन झाले आहे. यावेळी शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव यांनी मोठी घोषणा करत, “संजय राऊतांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 1 लाख रुपयांचे … Read more

कोपरगावात दुध-साखर एकत्र येणं अशक्य ? विखे पाटील आणि कोल्हे…

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी कोपरगाव तालुक्यातील राजकीय वातावरणावर भाष्य करताना, “दुध आणि साखर एकत्र येणं अवघड आहे,” असं वक्तव्य केलं आहे. या विधानामुळे कोपरगावातील राजकीय हालचालींना एक नवा रंग मिळाला आहे. विखे पाटील यांचा कोपरगाव दौरा सोमवारी कोपरगाव दौऱ्यावर आलेल्या राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वस्तीवरील भेट चर्चेत होती. यापूर्वी त्यांचे कोल्हे … Read more